Nojoto: Largest Storytelling Platform
sudhakarphalke4638
  • 21Stories
  • 201Followers
  • 227Love
    191Views

सुधाकर फाळके

प्रेम कविता, स्पर्श

  • Popular
  • Latest
  • Video
f2b558dab008e8c0a1467aeab7b4b6a9

सुधाकर फाळके

When a woman's freedom is restricted in the name of rites, she cannot prove her uniqueness. #

#

14 Love

f2b558dab008e8c0a1467aeab7b4b6a9

सुधाकर फाळके

जर तुमच्याकडे दोन रुपये असतील,
 तर एक रुपयांची भाकरी घ्या आणि एक रुपयांचे पुस्तक घ्या
भाकरी तुम्हाला जिवंत राहण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं व कसं
वागायचं हे शिकवेल.
-डॉ.बी .आर .आंबेडकर








जागतिक पुस्तक दिनाच्या सर्व पुस्तक प्रेमींना हार्दिक शुभेच्छा....📚📚📚

10 Love

f2b558dab008e8c0a1467aeab7b4b6a9

सुधाकर फाळके

मैत्रीण

     स्वप्नांनी मंतरलेल्या 
        अनोळखी वाटेवर..,  
तू भेटलीस मला
                       एका निसरड्या वळणावर...

                         माझ्या अधीर, अशांत मनाला
                      शांततेचा किनारा लाभला..,
             निखळले बंध सारे अन्
.                                     तुझ्या माझ्या मैत्रीचा उत्सव सजला..

                          तुझं आभाळाएवढं स्मित हास्य
.                   जणू ऊर्जेचा वाहता झरा..,
                              गर्दीत माणसांच्या एकटा उभा मी
.                        तुझ्या दोस्तीने दिला सहारा...

                                  भासता मृगजळ रणरणत्या उन्हात
                                      तूच माझा आधार अन् तूच विसावा..,
             तुझा अबोला असा की
                                               जणू माझ्या काळजाचा ठोकाच चुकावा...

                               प्रामाणिकतेचं वरदान लाभलेल्या
                                            आरशासारख मला तुझ्या नजरेनं पाहिलं
                     माझ्या खोडकर चुकांना तू 
                     सहजतेने माफही केलं......

           मी तुझ्या सोबत आहे
                           असं तू जेव्हां जेव्हां म्हणतेस..
                      जग जिकल्यासारख वाटतं 
.                                   तेव्हा तू माझ्या सोबतच असतेस...

                                         आनंद, सहवास, विश्वास आणि आदर
                                               सारं काही जपलसं मर्यादेच्या अलीकडे..
                                           आता माझी हृदस्पंदने बोलू लागलीयेत
                                                      जाऊया का थोडं मैत्रीच्याही पलीकडे...???
                                                      जाऊया का थोडं मैत्रीच्याही पलीकडे...???


~~                                                                सुधाकर फाळके #मैत्रीण
f2b558dab008e8c0a1467aeab7b4b6a9

सुधाकर फाळके

.             अनोळखी नाती झाली ओळखीची;
     नाळ जुळली ऋणानुबंधाची,
धर्म,जात, वर्णाला भेदून;
     भिंत बांधली माणुसकीची..!

     जरी आज काळ सोकवला ;
   प्रत्येकाचा श्वास गुदमरला,
प्रार्थनेतून देवच हरपला;
.              जेव्हा माणूसच देवमाणूस बनला..!


#COVID-19
#HOME QUARANTINE प्रेरणादायी विचार...

प्रेरणादायी विचार... #Home #COVID

11 Love

f2b558dab008e8c0a1467aeab7b4b6a9

सुधाकर फाळके

तिच्या बोलण्याचं ऐस...

तिच्या बोलण्याचं ऐस, काय सांगाव तंतर,
मन मोहूनिया जाई, काय घालती मंतर ||1||

तिच बोलणं मधाळ, जशी श्रावणी बरसात,
मोर नाचावा बनात, तस हासणं गालात ||2||

तिच्या मोकळ्या केसात, सार चांदणं गुततं,
बट वाऱ्यान हालती, मन गुततं गुततं ||3||

तिच्या रुपाची उपमा, काय चांदाला देवावी,
सारी नजर गोठती, मन वळूनिया पाही ||4||

तिच्या सोंदर्याची कळी अशी मोर्चात खुलावी...
जातीअंताची घोषणा तिची मूठ वळावी...||5||

तिच्या कोमल कंठातून बॉम्ब बारुद निघावं.
लाल निळ्या ह्या ठिणग्या गाणं मुक्तिच फुलाव्ं...
लाल निळ्या ह्या ठिणग्या गाणं समतेच फुलाव्ं. ||6||

तिनं चाकोरी मोडूनं, नवा पायंडा पाडावा,
मला सोबती घेऊन, जिर्ण पहाड फोडावा ||7||

तिनं मालक शाहीचं, अस्स कंबरड मोडाव,
तिनं हूकम शाहीचं, अस्स कंबरड मोडाव,
तिंन हिटलर शाहीच, अस्स कंबरड मोडाव,
तिनं सैनिका सारखं, हाती हत्यार घेवावं
मानवमुक्तीच्या दिशेनं नाजूक पाऊलं पडावं ||8||
                               -कवी शांतनू कांबळे

9 Love

f2b558dab008e8c0a1467aeab7b4b6a9

सुधाकर फाळके

तू थांबलास कारण तुला लांबचा पल्ला गाठायचाय...,
जे आजही चालतायत त्यांच्या पावलांचे 
ठसेही मिटून जातील त्यांच्या अस्तित्वासहित .....!


                        
#covid-19 Quarantine

11 Love

f2b558dab008e8c0a1467aeab7b4b6a9

सुधाकर फाळके

चश्मा

ज्याला चश्मा लागलाय त्याला ,
चश्म्याशिवाय सारं कसं
धूसर आणि अस्पष्ट दिसू लागतं ,
आगीतून निघणारा धूर पहिला तरी धुक्यासम वाटतं..!


जसा काचेचा रंग बदलू ,
तशी दृष्टीच बदलून जाते....
जवळचा कोण? लांबचा कोण?
काही कळण्याआधीच वेळ निघून जाते..!


आपल्याच आवडीची ती फ्रेम आणि ,
चेहऱ्याला साजेसा आकारही आपणच निवडलेला..
आता त्याच चौकटीतून धुंडाळत राहतो...
तीच जुनी पायवाट आणि तोच रस्ता मळकटलेला..!

दिसणं आणि असणं यातला फरक ,
बहुधा त्यालाच असतो माहीत..
चश्म्याशिवाय त्याला जागेपणीच नाही 
तर रात्रीचीही स्वप्नं नीट पडत नाहीत.....!!!

                                   सुधाकर फाळके चश्मा....

चश्मा....

9 Love

f2b558dab008e8c0a1467aeab7b4b6a9

सुधाकर फाळके

पाळून शासनाचे नियम,
आपण घरीच सुरक्षित राहू..
स्वयंशिस्त अंगी बाणवून,
कोरोनाला हरताना पाहू...!
                   
                  - सुधाकर फाळके be safe

be safe

7 Love

f2b558dab008e8c0a1467aeab7b4b6a9

सुधाकर फाळके

घट्ट मिठीत लाडिक होऊन जेव्हा ती म्हणायची
मला तुझ्या कवितेच पान व्हायचंय...,
माझ्या  स्पंदनाना तुझ्या गीतांचे स्वर व्हायचंय..

तेव्हा मीही तिला कुरवाळत म्हणायचो,
माझ्या अबोल भावनांना तूच बोलक केलंस,
मरगळलेल्या स्वप्नांना तूच जिवंत केलंस....


आता माझ्या जगण्याला तूच बळं देतेस..,
निराशेच्या गर्तेतून अलगदपणे बाजूला नेतेस..,
कधि कवितेचं पान होऊन..तर कधी कविताच होऊन..!! #International_Day_Of_Happiness
f2b558dab008e8c0a1467aeab7b4b6a9

सुधाकर फाळके

He who is not ready to work hard has no right to live Nature's rule...

Nature's rule...

10 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile