Find the Latest Status about rain wallpaper hd from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, rain wallpaper hd.
Anagha Ukaskar
White छतावर अंदाधुंद नाचणारा पाऊस झाडांमधून कानामध्ये कुजबूजणारा पाऊस पक्षांसवे मधुर गीत गाणारा पाऊस पाकळ्यांवर मोत्यासारखा चमकणारा पाऊस इंद्रधनु सप्तरंगी रंगवणारा पाऊस काळोखात दिव्यांसवे लुकलुकणारा पाऊस रात्री ती शांतता पसरविणारा पाऊस आकाशात चंद्रासारखा झळकणारा पाऊस जगाला निश्चिंत निजविणारा पाऊस खिडकीवर थाप मारत उठवणारा पाऊस एकाकी, बेफिकीर राहणारा पाऊस जिवलगांच्या भेटीसाठी तळमळणारा पाऊस इकडे तिकडे... चोहीकडे पाऊस कोणीही न टिपलेला, असाच तो पाऊस ©Anagha Ukaskar #wallpaper #rain #Nature #Nojoto
#wallpaper #rain #Nature #Poetry
read more