Nojoto: Largest Storytelling Platform

New स्फूर्ती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्फूर्ती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्फूर्ती.

    LatestPopularVideo

Rajendrakumar Jagannath Bhosale

आंतरराष्ट्रीय महिला दिन स्फूर्ती गीत #मराठीकविता

read more
आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त प्रबोधन गीत

सोसूनी शिक्षा आजवर रुढीची 
ठेच विषमता अमानवी फडीची 
चालवले तूच संसाराचे जग रहाट 
स्त्रीस्वातंत्र्याची उजळ तू पहाट || धृ।।

मैत्रिय गार्गी विदुषी केंद्र स्त्री शक्तीचे
 शूर रजियाने उघडले दार स्त्री मुक्तीचे
 पारतंत्र्यात महिलांची झाली बंद वाट || 1||

सती प्रथा, स्त्री दास्यत्व लादले रुढीने 
झाकला स्वाभिमान दास्यत्व बुरख्याने 
बेगडी चौकटित बांधले गुलामीची गाठ || 211

जिजाऊ, मनीकर्णीका, अहिल्या, साहू 
दुष्ट चालीरीती तोडण्या उसळले बाहू
 फोडीले झुगारूनी कुप्रथेचे अमानवी माठ ॥ 3||

इंदिराजी, मायाबहेन, धगधगती तलवार 
स्त्री शक्ती पुन्हा उठा लावोनी ज्ञान धार 
जमू लागलेत पुन्हा गुलामीचे ढग दाट || 4||

सोसूनी शिक्षा आजवर रुढीची 
ठेच विषमता अमानवी फडीची 
भेकड गिधाडांना फोड आता दहाड ll 5ll 

कवी गायक संगीत श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले

Rajendrakumar Jagannath Bhosale

©Rajendrakumar Jagannath Bhosale आंतरराष्ट्रीय महिला दिन स्फूर्ती गीत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile