Nojoto: Largest Storytelling Platform

New जुना दासबोध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जुना दासबोध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जुना दासबोध.

    PopularLatestVideo

roshan

स्वर्ग आहे जुना

read more
नवलाई नवी पण गंध आहे जुना
नाव माझे जिथे  मी बसू का पुन्हा
वर्ग मित्र सारे अनोळखे इथे झाले
प्रश्न मनी त्याच्या तू आलास का रे?

अलगत उतरतो त्या मी वर्गात जुन्या
मिसळून जातो जणू स्वर्गात पुन्हा
                              स्वर्गात पुन्हा

कविता नवी पण ताल आहे जुना
होऊनि पुढे मी हि म्हणू का पुन्हा
शब्द मात्र सारे इथे अनोळखे झाले
प्रश्न मनी त्याच्या तू आलास का रे?

चाळतो सर्व पाने त्या मी वर्गात  जुन्या
मिसळून जातो जणू स्वर्गात पुन्हा
                           स्वर्गात पुन्हा

आठवेल तुलाही हि सोडशील जागा
खंतावेल उद्या हा आजचा तुझा त्रागा
तितक्यात जाग येते अंधार  दूर होते
प्रश्न मनी माझ्या मी इथे नव्हतो का रे?

आठवतो सर्व रस्ते जायचे त्या वर्गात जुन्या
मिसळून जातो जणू स्वर्गात पुन्हा
                        स्वर्गात पुन्हा
रोशन देसाई 
29।03।20 स्वर्ग आहे जुना

प्रकाश साळवी

तोच जुना रस्ता !

read more
तोच जुना रस्ता
आता दिसतो गजबजलेला
ना ती भयाण शांतता
ना ती सुखद त्या वट वृक्षाची सावली
ना कुणाची वाट पहायची
जिथे कुणी चिट पाखरू
पण फिरकत नव्हते !
आता भरून वाहतोय
माणसांनी ! पण खरा माणूस
तोच कुठेतरी हरवलाय !
शोधतोय माणूस
याच रस्त्यावर जो येता जाता
राम राम करणारा ! प्रेमाचे दोन शब्द
विचारणारा ! आपला माणूस
मायेने चौकशी करणारा !
तोच जुना रस्ता झालाय अनोळखी
येथे आता कोणी कुणाला
विचारत नाही जो तो फक्त
आपल्याच विचारात मग्न
असणारा ! तोच जुना रस्ता
जिथे शपथा घेतल्या
चोरून आलिंगने दिली घेतली
प्रेमात आकंठ बुडालो
तोच जुना रस्ता
आता कुठेतरी हरवलाय !!!
***
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ तोच जुना रस्ता !

nilesh

जुना पेडगाव वरील खड्डे #nojotophoto

read more
 जुना पेडगाव वरील खड्डे

vishwas Desai

🌹जुना काळं जुनी गीत 🌺 #मराठीशायरी

read more
mute video

vishwas Desai

🌹जुना काळं जुने सूर - ताल 🌹 #मराठीशायरी

read more
mute video

vishnu thore

हा घाव जुना अन गाव सुना जखमा जीवाला जरतारी उजाड झाल्या घरट्यावरती कधी परतून येतील घारी - विष्णू

read more
हा घाव जुना अन गाव सुना
जखमा जीवाला जरतारी
उजाड झाल्या घरट्यावरती
कधी परतून येतील घारी
- विष्णू

©vishnu thore हा घाव जुना अन गाव सुना
जखमा जीवाला जरतारी
उजाड झाल्या घरट्यावरती
कधी परतून येतील घारी
- विष्णू

Prerana Jalgaonkar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात आजचं कोलँब आहे. तीच वाट जुनी तोच रस्ता जुना... चला तर मग लिहा पटापट. तोचरस्ता१ तोचरस्ता

read more
आठवणींचं 
असंच असतं...
त्या सहसा 
चुकत नाहीत रस्ता
--प्रेरणा
 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात
आजचं कोलँब आहे.
तीच वाट जुनी
तोच रस्ता जुना...
चला तर मग लिहा पटापट.
#तोचरस्ता१
#तोचरस्ता

Kunal Salve

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात आजचं कोलँब आहे. तीच वाट जुनी तोच रस्ता जुना... चला तर मग लिहा पटापट. #तोचरस्ता१ #तोचरस्ता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माणसं गेले बदलुनी 
मी तरीही तोच राहिलो 
हाच झाला माझा गुन्हा 
तीच वाट जुनी 
तोच रस्ता जुना 
मी अजूनही चालत आहे 
तोच रस्ता नव्याने पुन्हा !  प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात
आजचं कोलँब आहे.
तीच वाट जुनी
तोच रस्ता जुना...
चला तर मग लिहा पटापट.
#तोचरस्ता१
#तोचरस्ता

Atul Waghade

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात आजचं कोलँब आहे. तीच वाट जुनी तोच रस्ता जुना... चला तर मग लिहा पटापट. #तोचरस्ता१ #तोचरस्ता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एकांतातला रस्ता तो ,आठवणीतल्या 
हिंदोळ्यावरचा माझा तो..
कधी वाटे उदास कधी फुलेलेला तो
कधी प्रितीची झुळूक घेऊन येणारा तो
स्पर्श आपुलकीचा आठवणीला साद तो..

दुःख वेदना जाणणारा एकांतातला
ओरडून सांग म्हणणारा 
तीच वाट तोच रस्ता माझा तो...

 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात
आजचं कोलँब आहे.
तीच वाट जुनी
तोच रस्ता जुना...
चला तर मग लिहा पटापट.
#तोचरस्ता१
#तोचरस्ता

Atul waghade

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात आजचं कोलँब आहे. तीच वाट जुनी तोच रस्ता जुना... चला तर मग लिहा पटापट. #तोचरस्ता१ #तोचरस्ता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एकांतातला रस्ता तो ,आठवणीतल्या 
हिंदोळ्यावरचा माझा तो..
कधी वाटे उदास कधी फुलेलेला तो
कधी प्रितीची झुळूक घेऊन येणारा तो
स्पर्श आपुलकीचा आठवणीला साद तो..

दुःख वेदना जाणणारा एकांतातला
ओरडून सांग म्हणणारा 
तीच वाट तोच रस्ता माझा तो...

 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात
आजचं कोलँब आहे.
तीच वाट जुनी
तोच रस्ता जुना...
चला तर मग लिहा पटापट.
#तोचरस्ता१
#तोचरस्ता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile