Find the Latest Status about माझ्या कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्या कविता.
Yogesh Hiwrale
"सासरवाशीन पोरीं वाणी ,माझ्या, या कविता रंगमंचावर कधी, बागडल्याच नाही. नट्टा पट्टा करून, विरमल्या होत्या लेकी माझ्या, पण आरशांच्या काचा कधी, सापडल्याच नाही. पेन, कागद ,आणि मी, एवढीच त्यांची दुनिया, व्यक्त होण्यासाठी या, कधी नडल्याच नाही भावनेचा आत्मा ,शब्दांचा देह, घेऊन अवतरल्या तरी का? त्या कधी, घडल्याच नाही (क्रमश:) माझ्या कविता
अनंत पाटील
काव्य लेखन उपक्रम विषय- नाही क्षणाचा भरवसा प्रत्येकाची लढाई येथे फक्त जगण्यासाठी जाण असूनही काही क्षणांचा भरवसा नाही पाप पुंण्याचें हिशोब सगळे व्यर्थ येथे धावपळीच्या चुरसी खेळात जराही उसासा नाही जीवनात सकर्मक माणसाची नियती दाखले देते प्रतिबिंब बदलेल असा जगात कोठे आरसा नाही कर्माचे भोग जरी देती दृष्टान्त वेळोवेळी मरणानंतर त्याचा कुठेही खुलासा नाही अपव्यय भावनांचा सदा नात्यात स्थिरावतो आप्तेष्टांना वर्तनी थोडासा ही दिलासा नाही परित्याग केला जरी या सुखाचा निःसंकोचपणे दुःखाला सामोरे जावे तिळमात्र भरोसा नाही श्री अनंत पांडुरंग पाटील उमरोळी पालघर 8446819452 ©अनंत पाटील माझ्या कविता
Mahesh Desale
मी सुकत जातो माझ्या कविता पिकत जातात लोंबलेल्या गालावर नकळत हसू पेरत जातात फुल फळ काळ सार काही सोडत जातात अंतरंगातला आनंद पुन्हा पुन्हा भरत जातात कल्पतरू मनाचा आशामय आभाळ भरत जातात अन् नकळत कित्येक कवितेच्या प्रेमात पडत जातात - महेश 8806646250 ©Mahesh Desale माझ्या कविता