Find the Latest Status about गारद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गारद.
Subodh Joshi
गारदी तेंव्हा ही होते गारदी आज ही आहेत शासना पासुन दूर मोकाट सुटलेले " ध " चा " मा " केलेला खलिता हाती पडताच उसळले, उधळले ,धावले कृतांत काळ होते गारदी ते कोवळी पोर ती आनंद, माय-बापा अन् जनास एकटीच खेळे अंगणी निरागस, निष्पाप कळी एक नवथर पोरवयीन पोर ते खेळण्या बागडण्यात दंग पाहूनी कृतांत त्या गारद्यांस धाव घेई महालात कळीस त्या काय कळे निरागस हास्य मुखी विराजे गारद्यांसी काय कवतूक त्याचे बळे उचलती कवे घेती लिलया पाहूनी काळकराल गारद्यांस " काका मला वाचवा " धावे सैरावैरा दाही दिशा दुमदुमे आर्त टाहो महाली कळीस कळले, उमजले हैवान हे तर सारे कळवळून, जोडूनी दोन्ही कर म्हणे सोडा नं मला, " दादा, भाऊ, काका " धावले गारदी, धरिले त्यास एकाच घावात, छेदीले शिरास तुटूनी पडती, सैतान, शीलभ्रष्ट क्षणात अचकट, विचकट हास्य त्यांचे आसमंतात नवथर पोर ते रक्ताच्या थारोळ्यात कळी तीही उमलण्या आधी रक्तरंजित, रक्तबंबाळ गारदी तेंव्हा ही होते गारदी आज ही आहेत शासना पासुन दूर मोकाट सुटलेले ©Subodh Joshi गारदी Santosh Kumar Pooja Udeshi pinky masrani Sonika Pal सपना मीना