Find the Latest Status about देवही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देवही.
ज्ञानेश्वर मुसळे
अरे लेकरसारखी जपलेली जनावर आज नुसती हंबरत राहिली, बघता बघता पाण्यात नुसती तरंगत राहिली, जगणारी तरी कशी कारण आज मालकच देत होता झुंज अडचणींशी. ताटातल तु आज पार सारं हिसकवून नेलं, तूच सांग ना पावसा आम्ही असं कुठलं पाप केलं, डोळ्या देखत आयुष्य भराची पुंजी तु घेऊन गेलास, अस चुकली तरी काय रे आमचं की आ वासुन आलास. घर तर उध्वस्त झालं ते तर मी कसही सावरील, पण घरातली माझी माणसं, जनावरं, तुच सांग ती परत कशी आणू, अनं डोळ उघडलं की अख्ख गावच नाय हे कसं मानु. अरे शेतात तर आता चिटपाखरू ही नाही, बांधवरती होती धिप्पाड पर्वताहुनही उंच वाटायची अशी झाडे, पहायची माझ्याकडे अनं हसायची, आता तूच सांग मातीविना मी जमीन तरी कशी कसायची. तु आला अन गेला याचंही आता राजकारण होईल, आता कुटका भर भाकरीचही कुणीतरी क्रेडिट घेईल. पण आता या राजकारण्यांचा कधी येईल का भरून ऊर, ते तर मस्तपैकी हेलिकॉप्टर मधून पाहतात महापूर, आज अनं उद्या ते येतील नुकसान भरपाईच गाजर देईन निघुन जातील. जाऊद्या हे सगळं पणं मी आता देवाकडेही तर काहीच मागणार नाही, कारण या सगळ्यात देवही चिडीचीप बसला होता, म्हणूनच अनेकांना वाचवणारा देव काल माणसात मला दिसला होता. अरे लेकरसारखी जपलेली जनावर आज नुसती हंबरत राहिली, बघता बघता पाण्यात नुसती तरंगत राहिली, जगणारी तरी कशी कारण आज मालकच देत होता झुंज अडचणींश