Nojoto: Largest Storytelling Platform

New निळा सावळा नाथ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निळा सावळा नाथ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निळा सावळा नाथ.

    PopularLatestVideo

Jai Bhim

शब्द निळा नाद निळा या जीवनाचा आधार निळा 💙 🙏 #समाज

read more
mute video

snehal chandanshive

निळा रंग........ #कविता

read more
mute video

सुमन

घन सावळा....

read more
घन सावळे दाटून येता
राधा का व्याकूळ होते,
संभार सरींचा झेलत
क्रुष्ण रंगाने न्हाते...

कर धारांचे होऊन
क्रुष्ण अलिंगन देतो,
आषाढ अंगोपांगी
क्रुष्णमय होऊन जातो... घन सावळा....

Archana Pol

मेघ सावळा #मराठीकविता

read more
भाळावरुनी मेघ सावळा,
कृष्णनभाच्या आला.
क्षण भेटूनी मनास माझ्या,
मृदगंधाचा गेला.

तरारलेला थेंब टपोरा,
विसावलेला भाळी,
स्पर्शासाठी आतुरलेली,
अधीर धरणी काळी.

प्रणय सुखाच्या आठवणींनी,
रोमांचित तन ओले.
स्पर्श लाजरा मनात दाटे,
अधर गुलाबी झाले.

मेघ सावळे उतरुन रानी,
सुगंध पसरत  गेले.
धुंद मोहरुन आली काया,
भिजले तनमन ओले.

अवघ्या देही रुतली माया,
कृतार्थ जीवन झाले.
गर्भातुन कोवळे धरेच्या,
कोंब तरारुन आले.

©Archana Pol मेघ सावळा

Sunil Zarikar

रंग तुझा सावळा ...

read more

रंग तुझा सावळा ...
  तुझ्या रूपाचे
    नयनी काजळ..!!
करिते अर्पण तुला..
  मुग्ध मनाची
    करुनी ओंजळ..!!! 
रंग तुझा सावळा ...

Deepali Ghoge

सखा सावळा..
कधी इंद्रायणी काठी 
कधी यमुनेच्या तीरी..
कधी होऊन सावळा घनी
बरसतो मनोमनी... #कृष्णसखा #सावळा #विठ्ठलविठ्ठल

shivani dhote.

सावळा श्री हरी.‌..😇 #Janamashtmi2020

read more
मोरपीस डोक्यावरी डौलत भारी...
आला अंगणी कृष्ण मुरारी.

यमुनेच्या तीरी घेऊन बांसरी..
साद घालीत असे बांवरी.
लावण्या वेड आला अंगणी कृष्ण मुरारी.

कारुण्य मनी जपण्यास,
राधेचं प्रेम मनी अनुभवण्यास..
जोडण्या सावळ्या रेशीमगाठी..
आला अंगणी कृष्ण मुरारी.

करुनी कृष्णलीला अगाध..
घेतो सवंगड्यांची साथ.
गोकुळ सारे त्याच्याच प्रतिती..
मज शामसुख मिळाले भारी
आला अंगणी कृष्ण मुरारी..
                                                                                               -शिवानी...💖 सावळा श्री हरी.‌..😇

#Janamashtmi2020

divya bisht

#नाथों के नाथ भोले नाथ #पौराणिककथा

read more
mute video

Deepa Jio

आदि नाथ शंकरा भोले नाथ शंकरा

read more
mute video

Shankar kamble

आसावला जीव।ओसंडला भाव।
अंतरीचा ठाव।सावळ्या तू।।१।।

कातर मनाला।आठवं क्षणाला।
काकडा ओवला।देहरूपी।।२।।

मनं ओढावते।दर्शनांते आस।
जीवां रात्रंदिस।ध्यास तूझा।।३।।

तोडीयले बंध।पाश मायारुपी।
अंतरी स्वरूपी।तूच सदा।।४।।

काय करू सांग।चित्त उसवले।
पाहतो वाटुले।पंढरीची।।५।।

अंतरी उमाळा।तोची घननीळा।
सांगू लडिवाळा।गूज मनीं।।६।।

नाद प्रसवला।परब्रह्म देहीं।
मनाचियां डोही।नाद रंगे।।७।।

देहादेही एक।भाव समरूप।
पापांचे कळप।सुटती बां।।८।।

मागणें न दुजें।आतां उरे काही।
मनीं वसे ठायी।पांडुरंगे।।९।।

श्री. शंकर नागनाथ कांबळे

©Shankar kamble #वारी 
#विठ्ठल 
#पंढरपूर 
#माऊली 
#वारी_जांऊ 
#पांडुरंग 
#विठ्ठल_रखुमाई 
#सावळा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile