Find the Latest Status about वलय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वलय.
राजाराम कंटे
माझ्यापासून असं दूर- दूर राहणं तुला भारी जमतं मग मी ही समजवतो माझ्या मनाला..... पण मन माझं वेडच ते------- ते तुझ्याशिवाय तरी कुठे रमतं ? राजाराम कंटे जुनी स नवं वलय
राजाराम कंटे
बहरुनी आला मनी वसंत फुटे चैत्राची पालवी साद घालीते वनी प्रियाला कोकिळा मी हळवी नवं प्रेमाचे बीज अंकुरले नवा हर्ष हा मनी ध्यास नवा हा, गंध नवा हा सुर नवे जीवनी वैशाख सरला हर्ष हा भरला मेघ दाटले अंबरी आतुरली मनी वसुंधरा ती बरसूनी घेण्या उरी इंद्रधनूची कमान पसरे फुले बहरली वनी स्वागत करण्या मज प्रियाचे हर्ष वाटे हा मनी बरसूनी घे आता हवे तेवढे प्रसन्न होऊदे जीवनी आभाळ भरले मेघ पांघरले तृप्त झाली अवनी @राजाराम कंटे जुनी सय नवं वलय
राजाराम कंटे
चिंब भिजावे झिम्माड पावसात तुझ्याच सवे तुला पहावे लाजुनी चूर व्हावे रंगुनी जावे तुज सांगावे गूज माझ्या मनाचे तू शहरावे बेधुंद व्हावे तुझ्या आठवणीत तुला स्मरावे @ राजाराम कंटे ©राजाराम कंटे जुनी सय नवं वलय
राजाराम कंटे
आज तुझ्याकडे पाहिल्यावर वाटतं तुझ्या आयुष्यात वैशाख वणवा येईल तसं असेल तर सांग..... तुझ्या आयुष्यातील वसंत पाहण्यासाठी मी कायम श्रावणसरी बरसून राहील @राजाराम कंटे जुनी सय नवं वलय
राजाराम कंटे
तुझी वाट पाहून दिवस काय तो पुरता सरला माझ्या शिणलेल्या डोळ्यांना फक्त तुझाच सहवास उरला @राजाराम कंटे जुनी सय नवं वलय
राजाराम कंटे
ये सखये परत फिरुनी तू कलत्या सांजवेळी वाट पाहती तुझी बहरण्या त्या अबोल पुष्पवेली....... ठिबक चांदणे ओठावर अनं गालावरती खळी पहाटेच्या दवातं न्हाली जणू तू प्राजक्त पाकळी.......... प्राजक्ताच्या देठा परी ओठ तुझे ते टेकविशी मम भाळी तूझ्या चांदण्याच्या हाती घे भरुनी माझ्या काळजातली शहाळी......... शुक्राची चांदणी परी तू स्वप्नांच्या आभाळी रात्रीच्या एकांती बहरलेली तू धुंद अबोल प्रितकळी.... -राजाराम कंटे ©राजाराम कंटे जुनी सय नवं वलय
राजाराम कंटे
आठवतं का तुला? खेळताना तुझा मी हात धरला खेळ संपला पण, खेळाचा रंग मात्र बदलला @राजाराम कंटे जुनी सय नवं वलय
राजाराम कंटे
भावनेच्या सागरात जितकी तू शांत बेभान लाटा आठवणींच्या अनं वादळ मी अशांत @राजाराम कंटे जुनी सय नवं वलय
राजाराम कंटे
हे भारत माते जागी हो...... जागी हो भारत माते जागी हो स्वातंत्र्यदेवते कित्येक सुपुत्र तू जन्माला घातले होतेस आज या क्षणी त्यांचीच उणीव भासते गुलामगिरीच्या जोखडातून मुक्तता करून हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवराय तूच जन्माला घातला होतास पूर्वी एकच सूर्याजी जन्मला,आज पावलो गणिक सूर्याची दिसत आहेत खिंडीला पावन करणारा बाजीप्रभू तू जन्माला घातलास पण आज तुलाच खिंडार पाडणारे पुत्र जन्मले आहेत ते हाती धरतात फक्त वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे पण नाही आठवत त्यांना स्वातंत्र्य देवतेला मुक्त करून हसत-हसत फासावर जाणारे मंगल पांडे नाही आठवत त्यांना शिका संघटित व्हा संघर्ष करा असा मंत्र देणार आंबेडकर नाही आठवत त्यांना स्वातंत्र्य मातेला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करणारे सावरकर दुसऱ्याच्या मांसाचे लचके तोडणाऱ्या गिधाडांच्या तृप्त ओठावर नाही उमटत मायेचे पाझर असत्य मेव जयते हे ज्यांनी ब्रीदवाक्य मानलय त्यांना नाही जमणार अहिंसा .नाही बोलता येणार सत्य अत्याचाराचे तांडव करणाऱ्या कौरवासाठी तू पांडव निर्माण केलेस आज गरज आहे अशा पांडवांची एक तरी पांडव निर्माण कर तेव्हाच त्या लक्षावधी कौरवांचे तांडव संपेल तुझ्याच पोटी जन्मल्या होत्या जौहार करणाऱ्या त्या रजपूत भार्या पण आज सगळीकडे पसरला आहे व्यभिचाराचा दर्या तुफानागत तू जन्माला घातले रामदास ज्ञानेश्वर तुकाराम यासारखे संत पण आज सगळीकडे अशांत अस्थिरता अशा वेळी तुला का नाही जाग येत शपथ तुला या मातीची... जागी हो भारत माते.... जागी हो स्वातंत्र्य देवते आमच्यासाठी.... आम्हा सर्वांसाठी ...उद्याच्या भारतासाठी ,.............राजाराम कंटे जुनी सय नवं वलय