Nojoto: Largest Storytelling Platform

Best एका Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best एका Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about एका पायावर हो म्हणणे, एका पेक्षा एक, एका पाणी ने चाली, प्रश्नाचा अर्थ एका ओळीत होता, एका तळ्यात होती,

  • 17 Followers
  • 35 Stories
    PopularLatestVideo

somnath gawade

#एका पायावर

read more
कोणत्याही प्रसंगी
 'एका पायावर'
तयार असणाऱ्या
मंडळींना दूरच्या
'पदयात्रे'साठी पाचारण
करावे.😁😀😂 #एका पायावर

♥️Raj Kamble♥️

#एका वयानंतर निस्वार्थ मैत्री का हरवून जाते?? #alone

read more
वय वाढलं ,सज्ञान झालो

पण माणुसकी भरकटुन गेली

मित्र होत आहेत खूप सारे

पण 'मैत्री' हरवू.......... न गेली!

                           -राज

©♥️Raj Kamble♥️ #एका वयानंतर निस्वार्थ मैत्री का हरवून जाते??

#alone

priyanka

read more
स्कंदमाता स्तुती

ममतामयी जगदंबा
पुत्र तुझा सेनापती l
त्याची तू कार्तिकेय माता 
तूच स्कंदमाता आदिशक्ती ll१ll

चतुर्भुज धारिणी 
निर्भया सिंह तुझे वाहन l
पद्मासना देवी तू
भक्ता शक्ती देई संचालन ll२ll

बालक स्कंद एका हातात
कमल पुष्प दोन हाती l
एका हस्ते वरद मुद्रा
तव कृपा देई शुभदा शांती ll३ll

शृंगार तुला अति प्रिय
हिरवा चुडा आवडतो l
पिवळ्या वस्तू प्रिय तुला
साज तुला शोभतो ll४ll

शुभ्र तुझे वर्ण
नयन तुझे लोभस l
सूर्य मंडल अधिष्ठात्री देवी
तू अलौकिक आणि तेजस ll५ll

तुझ्याच कृपेने कालिदासाने
रचले रघुवंशम् महाकाव्य l
मेघदूत रचना साकार
कृपादृष्टी तुझी ग भव्य ll६ll

✍️ प्रियंका सोनवणे

महेश...

विश्वास

read more
आज शोधतोय उत्तर एका प्रश्नाच
या जगात कोणी असत का कोणाच
त्यागा पेक्षा नेहमी पारड का जड स्वार्थाच
आज शोधतोय उत्तर एका प्रश्नाच
महत्व का कमी होत चाललय विश्वासाच
गरज संपली की मह्त्व संपत हो नात्याच
आज शोधतोय उत्तर  एका प्रश्नाच
पुढे चाललेल जग आहे का हे खोट्याच
खऱ्यापेक्षा  महत्व वाढतय हो ईथे दिखाव्याच 
आज शोधतोय उत्तर एका प्रश्नाच
नात हे विश्वासाच का नसत कायमच 
फसवण्यान त्याच्या  हाल होतात हो मनाच  विश्वास

Shubhangi Kolte

जीवन खूप सुंदर असते
ते सुंदरतेनी जगायचं असते
वाईट गोष्टींना दुर सारून
सुखाची वाट शोधायची असते

जीवन खूप सुंदर असते
अपयशानी खचायचं नसते
सु:खदुख:च्या वाटेवर चालून
यशाची वाट शोधायची असते

जीवन खूप सुंदर असते
पावलोपावली जग बदलणारं असते
भाग्यावर‌ अवलंबून न राहता
भविष्याची वाट शोधायची असते

जीवन खूप सुंदर असते
ते एका न सुटणार्या गणिताचं कोडं असते
त्याला एका रितीने सोडवून
आनंदाची वाट शोधायची असते

जीवन खूप सुंदर असते
अपमानानं कधी हरायचं नसते
जिद्दीने बळ वाढवून
जगण्याची वाट शोधायची असते
                                  - $hubh@ngi #जिवन

Utkarsha

#अोढ

read more
#अोढ 

कळेणास झालय...
कामाच्या नादात आयुष्य कस निघतय?
सगळ असुन देखिल अस्वस्थ वाटतय.
या हजारो कामाच्या गडबडीत,
एका गोष्टीचा त्याग करावा लागतोय. 
सगळ असुन देखील, 
एका गोष्टीची कमतरता भासतीय.
अोढ आपुलकीची.. अोढ घराची.. #अोढ

Bhaurao Palekar

नियत एका ब्राह्मणाने एका शेठकडे एक हजार रुपये ठेवायला दिले. या गोष्टीला काही वर्षे उलटून गेली. एकदा ब्राह्मणाला पैशांची गरज लागली तेंव्हा त्याने ते शेठजीकडे परत मागितले तेंव्हा शेठजीने त्याला ते परत करण्यास नकार दिला. कारण शेठजीची नियत बदलली होती. तसेच पैसे ठेवल्याचा कोणताही पुरावा नव्हता. ब्राह्मण त्रस्त होवून राजाकडे दाद मागण्यास गेला. राजाही हि विचित्र परिस्थिती पाहून संभ्रमात पडला. मात्र शेठजीकडून पैसे परत मिळवण्यासाठी राजाने एक युक्ती आखली. राजाने नगरात शोभायात्रा काढायची घोषणा केली. जेंव

read more
नियत 

एका ब्राह्मणाने एका शेठकडे एक हजार रुपये ठेवायला दिले. या गोष्टीला काही वर्षे उलटून गेली. एकदा ब्राह्मणाला पैशांची गरज लागली तेंव्हा त्याने ते शेठजीकडे परत मागितले तेंव्हा शेठजीने त्याला ते परत करण्यास नकार दिला. कारण शेठजीची नियत बदलली होती. तसेच पैसे ठेवल्याचा कोणताही पुरावा नव्हता. ब्राह्मण त्रस्त होवून राजाकडे दाद मागण्यास गेला. राजाही हि विचित्र परिस्थिती पाहून संभ्रमात पडला. मात्र शेठजीकडून पैसे परत मिळवण्यासाठी राजाने एक युक्ती आखली. राजाने नगरात शोभायात्रा काढायची घोषणा केली. जेंव

विशाल मोरया

फक्त तूच

read more
चातकाची तहान भागवून पाऊस खूप दूर निघून गेला होता ....
तिच्यासाठी असलेला तो "आडोसा "
माझ्यासाठी अनेक आठवणी सोडून गेला
 होता,,,

असं होतं माझं प्रेम, जो एका पावसात भेटलेला होता...
प्यासा झालंला हा  वेडा,तुझ्या एका थेंबासाठी तरसला होता... फक्त तूच

Pallavi Phadnis

#poem

read more
त्याने करांची ओंजळ उघडली
नी माझी धरतीशी नाळ जुळली
एका शाश्वत हातातून एका
मायेच्या हाती दोरी आली
पण तो तर ,कायम सोबत होता
कधी दिसत नव्हता पण अस्तित्व
मात्र दाखवत होता, त्याच्या नावाची
आंदोलने,त्यावर माझी स्पंदने
माझी चालणारी पाऊले,त्यावर
त्याच्याच नजरेचे असतात इमले
तो असला की एक आधार असतो
मग दुःखाचा डोंगर हि पार होतो
त्याचा माझ्यातील अंतर म्हणता
म्हणता तो तर अंतरातच राहतो
त्याच्या माझ्यातील संबंध हा तर
माझा अनेक जन्मीचा आहे बंध
त्याच्याकडे जाण्यासाठी अनेक 
वाटा आहेत ,वेळा आहेत पण
तो म्हणतो ,तुझे नी माझे संपेल
अंतर ज्यावेळी तू सोडशील हा 
देह नश्वर,तो माझा नी मी त्याची
हाच तर माझ्या अंतरीचा ईश्वर
   
            पल्लवी फडणीस,भोर✍

....

दादूबंधप्रेमराखी

read more
दादू जन्म तुझा नि माझा
एका नाळेत होता विणलेला
क्षणा क्षणात आयुष्यातला
धागा तुझ्याशी जुळलेला

जन्म घेतांना पुढे येऊन 
मोठा मान तू घेतला
तुला कचऱ्यातून आणलं
अस म्हणून चिडवायला लागला

बोबडे बोलही अस्पष्ट सोबत बोलला
शाळेत एका लेखणीचे दोन 
तुकडे करून लिहायला लागलो
भांडताना मात्र कधीच नाही हरला

शाळेतही पहिला क्रमांक
 नेहमीच पटकावला,
पण माझी बहिण हुशार
असे सांगायला लागला

कळत नाही इतका कसा 
प्रेमळ भाऊ देवाने दिला
की मागच्या जन्मतःच 
मागितले होते मी तुला

कवितेत लिहू कसे शब्द 
आपलं नात पूर्ण व्हायला
हातावरच्या राखीचेही 
पडतील धागे कमी 
प्रेम माझं बांधायला

आज या रक्षाबंधनाच्या 
दिवशी एक बहीण वचन
मागते तुला
हट्ट कधीच करणार नाही
पण लग्ना नंतर घरी बोलवशील 
ना रे मला? दादू#बंध#प्रेम#राखी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile