Find the Best मिठीत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमिठीत तुझ्या कविता, मिठीत, मिठीत घेना,
Pallavi Phadnis
*त्या आभाळाला निरोप* त्या आभाळाला द्या माझे निरोप त्याच्यावर आज खूप झालेयत आरोप किती वाट पाहायची त्याने भरून यायची वाट पाहायची घराच्या दारात , आत्ता येईल आणि गर्द ओल्या मिठीत घेईल मी आपले सावरुन बसायचे आणि ह्याने मात्र मयसभाच उभी करायची मग जरा बागेत जावून ,फुलांवर मोती साठलेत का पाहायचे ,आणि ह्याने मात्र आत्ता येतो सांगून गरगर फिरायचे ह्याला फक्त एक निमित्त असते,यायचे म्हणून गडगडाट करतो,आधी पाठवतो वाऱ्याला आणि त्याच्याशीच भांडतो ह्यात मात्र हे लबाड आभाळ हळूच घर सोडते आणि हळूच पुढे निघून जाते ह्याला कुठे माहितेय ,हे आभाळ दिसले की सगळ्या सृष्टीला येते भरून ,तो चातक बसतो शाखेवर,आणि मयूर फिरतो रानभर, छोट्या छोट्या पाखरांची घरट्यात परतण्याची घाई , पदर सावरुन बसलेलीअसते वनराई , सगळ्यांच्या डोळ्यांची होतात निरांजने, ह्याचे मात्र आगंतुक येणे ह्याच्या खेळात सगळेच सामवतात, आमच्यासारखे ही लेखणी घेऊन कल्पनेत रमतात, किती त्याचे लडिवाळ चालतात चाळे ,सगळीकडे सृष्टीच्या डोहाळपणाचे सोहळे आता ह्या आभाळाला आणखी एक प्रेमळ निरोप , येशील तेंव्हा सुख घेऊन ये नाहीतर तुझ्यावर होतील सावत्रपणाचे आरोप तुझे नी धरतीचे नाते अनोखे आम्ही का ठेवावे तुझे लेखेजोखे तू कधी हि ये पण येताना अनुरागी आनंद घेऊन ये ,तुझ्या भरल्या कृष्णशितल ,शाश्वत मिठीत मला अलगद गोजांरुन सामावून घे पल्लवी फडणीस,भोर✍
Prakash Gore ( Raj )
परी तू माझी विसरशील सारं जग, एकदा माझ्या मिठीत मिठीत येऊन बघ......... राज. राज......
राज......
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited