Nojoto: Largest Storytelling Platform

Best केली Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best केली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about भोळे एक बात केली, केली ना, माशी ने केली कमाल, बंद केली, कमाल केली,

  • 19 Followers
  • 60 Stories
    PopularLatestVideo

Gokul Tapadiya

read more
अपघातात लोक मरतात त्या साठी सरकारने हेलमेट ची सख्ती केली 
चला चांगल आहे स्वागत आहे या (नवीन) नियमाच...
पण कर्जामुळे, बाजारभावमुळे शेतकरी आत्महत्या करतात ते थंबवन्यासाठी सरकारने  कोणती उपाययोजना अंमलबजावणी केली

Bhaurao Palekar

विश्वासघात जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु शेतकरी म्हणाला," तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा ! तुला सोडल्यावर तू मलाच खावून टाकशील." चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकर्याने त्याला मुक्त केल

read more
विश्वासघात 

जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु शेतकरी म्हणाला," तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा ! तुला सोडल्यावर तू मलाच खावून टाकशील." चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकर्याने त्याला मुक्त केल

Parivartan Jagzap

#poem

read more
गुंता आयुष्याचा सोडवावं म्हणलं
मग एक-एक गणित मांडत गेलो
प्रत्येक वळणाचा graph काढला
आराखड्याची अंमलबजावणी केली
समीकरणे सखोल पाहिली
समिकरणांची उकल काढली
प्रमेयांची सत्यता पडताळली
सिद्धांतांनी गोची केली
नियमांशी संधी केली
सगळ्यात माजुऱ्या भूमीतील वाकवलं
हवे तसे आकार दिले
गणितांची मांडणी अगदी आखीव-रेखीव झाली
अन, साऱ्या गणितांना एका पटलावर आणलं
अवाक झालो,
बेफिकीर झालो,
बेमालूम उधळलो,
शोधाशोध झाली उत्तरांची
माझा आनंद मिळाला,
आपल्या नात्याचं गणित मांडलेल्या,
हातभरून रंगलेल्या,
तुझ्या मेहंदीत….
हातभरू रंगलेल्या,
तुझ्या मेहंदीत….

vishnu thore

चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण.. अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं. त्यातील रंगनाथचा एक मुलगा श्रीधर डॉक्टर झाला. पण तो बहिरा होता आणि दुसरा मुलगा वेडा होता. श्रीधरचं लग्न झालं. बायको शांता ही अतिशय मनमिळाऊ होती. तिला कवितांची खूप आवड. रंगनाथ-शांताला लग्नानंतर १५ एप्रिल १९३२ रोजी मुलगा झाला. उभयंतांनी मुलानं सूर्यासारखं चमकावं म्हणून हौशीनं नाव ठेवलं सुरेश! हळूहळू सुरेश मोठा होत होता. पण तो अडीज वर्षांचा झाल्यावर त्याला पो

read more
 चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण 
आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण..

        अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं. त्यातील रंगनाथचा एक मुलगा श्रीधर डॉक्टर झाला. पण तो बहिरा होता आणि दुसरा मुलगा वेडा होता. श्रीधरचं लग्न झालं. बायको शांता ही अतिशय मनमिळाऊ होती. तिला कवितांची खूप आवड. रंगनाथ-शांताला लग्नानंतर १५ एप्रिल १९३२ रोजी मुलगा झाला. उभयंतांनी मुलानं सूर्यासारखं चमकावं म्हणून हौशीनं नाव ठेवलं सुरेश! हळूहळू सुरेश मोठा होत होता. पण तो अडीज वर्षांचा झाल्यावर त्याला पो

Pratiksha Rokade

read more
गेले ते दिवस

गेले ते दिवस उरल्या फक्त आठवणी…
पण का जाणे आज त्या दिवसांची
आठवण का आली.
केली होती खूप मजा ,केली होती मस्ती
आठवतेय मला अभ्यास करताना 
आलेली सुस्ती .

गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी...
बारावीच्या अभ्यास करून आला होता 
खूप कंटाळा, स्वप्न पाहिली होती
त्या सुट्टीची, पण कोण जाणे
आज त्या अभ्यासाची आठवण
का आली.

गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी...
शाळा संपली, कॉलेज संपल,
क्लास आमचा संपला.
मित्रांसवे रमण्याचा वेळ आमचा संपला
कोण जाणे मित्र आता पुन्हा येऊन
भेटतील का...?
मैत्रीचा हा गोडवा अतूट टिकवून
ठेवतील का ...?

गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी...
पुन्हा त्या क्लास मध्ये जाऊन बसावस वाटतंय
हातातून गेलेले क्षण पुन्हा अनुभवाव वाटतय
कोण जाणे पुन्हा त्या आठवणी आम्हाला त्या
दुनियेत घेवून जातील का ?
कारण, गेले ते दिवस उरल्या फक्त आठवणी...

Govinda Polad

read more
रक्त झटकत वर्दीवरचे जरा देशात पाहिले त्याने 
आसार देशाच्या गर्दीवरचे धर्मवेशात पाहिले त्याने 

ही दंगल कसली जातनारेबाजी मला विचारले त्याने
नक्सलवादी की आतंकवादी शोकात उच्चारले त्याने

मी म्हटले तू सीमेवरती जेव्हा बाहू लढवत होता
तेव्हा मंदीर-मस्जिदचा नारा इथे दंगल घडवत होता 

मंत्रीजंत्री आश्वासनांची तो आठवण काढत होता 
लोकशाहीवर निडर सैनिक आज अश्रू गाळत होता 

तो म्हटला मग शवास माझ्या तिरंग्यात का आणले तुम्ही
जातीवादी असूनही स्वतःला भारतीय का मानले तुम्ही

धर्मनिरपेक्ष गणराज्याचे पाठीवरचे दफ्तर काढले तुम्ही
जातीवादी नाळेपायी माणुसकीचे लक्त्तर फाडले तुम्ही 

मग जाता जाता त्याने संपूर्ण भारतीयांना विनंती केली
सर्वास सुरक्षित जागा देऊन त्याने बेवारस भ्रमंती केली

 
                 - गोविंद अनिल पोलाड

shivraj Mule

read more
आज सकाळ पासून सरी झिम झिम बरसत होती ।
वातावरण पण धुकं धुकं पडल्यागत झालं होतं।
या चीक चीक क ने थोडा चिखल पण घाण केला होता।
अश्या अवस्थेत लोणावळा-पुणे लोकल पण 10-15 मिनिटे उशीरा येत होती
वाट पाहण्या बरोबर गर्दी  वाढत होती।
आणि त्या अश्या गर्दि मध्ये 7-8 वर्षाचा एक मुलगा  भीक मागताना दिसला।
मनात विचार आला की आपण याच थोडं निरीक्षण कराव।
मग तो मुलगा पैसे मागत मागग माझ्या जवळ आला ।
मी बसलेल्या ठिकाणी आणि कुजबुजल्या गत मला पैसे मागू लागला।
त्याचे कपडे जुने फाटलेले, महिन्या भराचा मळ साचलेले,
अंघोळ तर नाहीच केलेली 

आणि माझ्या हाताला हात लावत म्हणाला ।
तो लहान आवाजात म्हणत होता दादा,भैय्या मला थोडे पैसे द्या । खूप भूक लागली  काल रात्री पासून काहीच खाल्लेले नाही ।अश्या शब्दात तो उत्तरला आणि पोटाला हात सतत हात लावतं चालत होता
आणि विचित्र अशे त्याच्या चेहऱ्यावरील हावं भाव दिसू लागले ।
त्याला काही लोक हात दाखवत तर काही जण त्याचावर हात उगारत,
 तर काही जण पुढे जाऊन माग, डोळे मोठे करत । काही जण सुट्टे पैसे देत।
 आणि तो घाबल्यागत पुढे हात पसरवत असे ।
 त्याला कदाचित  लोकांच्या हिसकण्याने स्वतः चोरी केल्यागत वाटत असेल।
 माझं लक्ष त्या मूला कडे वेधल करण बरेच तरुण, वृद्ध, महिला पहिल्या होत्या भीक मागताना आणि मी काही वेळा देत असे तर काही वेळा माने नं नाही म्हणून सांगत असे। 
 अगोदरच माझे निरिक्षण करून झाले होते।
 पैसे मागताच मनात विचार आला की
 आपण त्या मुलाला पैसे न देता काही तरी खाऊ घालूयात । आणि लोकल ला पण अजून 15 मिनिटे वेळ आहे आणि इथं जवळच जात येईल ।
 मी त्याला विचार काय खाशील । तर त्याने उत्तर दिले दादा मी वडापाव खाईल । चल मग आपण दोघे पण खाऊया आणि पैसे नाही देत मी तुला, मग त्यावर त्याने उत्तर दिले,  खायला नको तुमि पैसे द्या,
 खायला नको पैसे द्या । पण मी विचार केला की याच्या सोबतीनं मला खाता येईल आणि त्या च्या बरोबर थोडा वेळ संवाद साधता येईल, त्याची माहिती आनि त्याला थोडं काही तरी सांगण्याचा प्रयत्न करता येईल ।
 पण परत तो मान हलवत नाही नाही म्हणत 
 खायला नको, पैसे द्या म्हणत लहानश्या आवाज उत्तरऊ लागला । आणि पुढे निघू लागला त्यावढ्यात माझ्या फोन ची बेल वाजली आणि मी फोन वर पप्पांन सोबत बोलत काही क्षण व्यस्त झालो आणि तो मुलगा पुढे मागत-मागत निघू लागला। माझे आणि त्याचे बोलने आटपून गेले ।लगेच माझ्या मनामध्ये विचार येऊ लागले हा मुलगा तर आताच बोल ला की भुक लागली आणि आता पैसे द्या म्हणतो का बरं अस।
 त्याला खरंच भूक लागली नसलं, का त्याला फक्त पैसे हवे असतील । का त्या मुलाचा वापर होत असेल एखाद्या दलालाकडून असच काही तरी असावं असं वाटू लागलं । कारण भारतात खूप सारे असे दलाल आहे की जे लहान मूलांचे अपहरण करून सामान्य लोकांचे आर्थिक शोषण करतात। आणि काही जण लहान मुलांचा वापर करून 1एक व 2दोन नंबर चा धंदा, व्यवसाय करतात,
 त्यांना भीक अन्य अशी काही कामे करायला सांगतात 
 जस की दहशतवादयांन प्रमाणे प्रशिक्षण दिले जाते।
या प्रवृत्तीचे लोक भारतात लाखांवरून जास्त आहेत।
अश्या लोकांना सरकारने ताब्यात घेऊन यांचे असे चोरटे व्यवसाय कडकडीत बंद करायला पाहिजेत ।
त्यांच्या वर कठोर कारवाई केली पाहिजे आणि भ्रष्टाचार पण होयला नको । पण हे पहायला आपल्याला फक्त टी.व्ही. मधेच पाहायला बार वाटतं । पण असं जात अस्तित्वात आणलं गेलं तर 2020 ऐवजी आजचं भारत महासत्तेच्या उंबरठ्यावर पोहचेल। APJ कलामांचे स्वप्न पूर्ण पण होईल। पण असं लगेच होणं शक्य नाही ना । कारण इथं ठीक ठिकाणावर आपलं च सत्य या प्रवत्ती चे लोक आहेत । उदा, कब्बडी खेळा प्रमाणे आहेत जस की यशाची रेषाला स्पर्ष करण्याचा  प्रयत्न केला की बाकीचे पाय ओढतात । असो।
नंतर तो मुलगा पुन्हा माझ्या दिशेने येऊ लागला म्हटलं आपण त्याला काही तरि पैसे देऊ । तर तो तश्याच अवस्थेत माझ्याडे आला आणि उत्तरला दादा चला आपण वडापाव जाऊन खाऊया । त्याने घाबरत घाबरत म्हणला ।
लगेच आम्ही दोघेहि जवळच्या वडापाव च्या गाड्यावर गेलोत ।मी चालत चालत विचार करत होतो की हा मुलगा वापस का आला आणि आगोदर नको का म्हटला। नंतर 2 वडापाव मागितले वडापाव विकणारा चेहरा मोडत पाहून विचार करत असाल,
थोडं स्मिथ हास्य करून 2वडापाव दिले। 
 खाताना त्याला विचारल नको का म्हणलास रे मणाला न राहता ते निघून गेल। तर तो उत्तरला आता तर गर्दी आहे अजून कोणी देतील का ते पाहत होतो ।
आणि सफाई वाले व कर्मचारी इथं भीक मागू देत नाहीत ।म्हणून पुढे गेलो। कुठे राहतोस? Spine Road ला एक छोटी झोपडी आहे तिथेच राहतो।
शाळेत का जात नाहीस?. असंच मागत पोट भरत हिंडाव लागत वाट नुघेल तिकडे। आणि मला शाळेत मास्तर नी येऊ दिल नाही, दाखला घेतला नाही।
खरंच अश्या ह्या मुलांना शाळेत प्रवेश दिला पाहिजे किंवा स्वतंत्र शाळा तरी ठीक ठिकाणी काढली पाहिजे। पिंपरी चिंचवड च्या महानगर पालिकेने अशी मोहीम चालू केली आहे ते खरंच उत्तम आहे 
 दुसऱ्या पण महानगर पालिकने हे कार्य पुढे नयला पाहिजे, आदिवासी, अस्थायी अश्या लोकांसाठी शाळा उघडायला पाहिजे म्हणजे सर्वानाच नोकरी ची संधी लाभलं आणि शिक्षण ही पूर्ण होईल ।  करण कायमहित हेच उद्याचे उवा तरुण पिढीचे समर्थक, देश चालवणारे असतील तर।
आईबाबा काय करतात? । बाबांना दिसत नाही आणि आई पण असंच मागते । आईला मदत म्हणून मी पण हेच काम हाती घेतल। उत्तर देत असताना खूप घाबरलेल्या अवस्थेत होता। आणि मला असे प्रश्न पडणं सहाजिकच होत।
रात्री झोप काशी येत असेल त्याला। क्षणांत विचार येऊ लागले। माझा पण वडापाव मी त्याला देऊ केला। खूप भूकेलेल्या अवस्थेत होता तो। तो पण खुउन झाल्यावर म्हणलं, अजून घे तर नको पोट भरलं म्हणे। नंतर जाताना एक छान स्मित हास्य करून मला प्रश्नानाच्या कोड्यात सोडून, आनंदाने त्याच्या मार्गावर गेला। 
✍✍✍ शिव दैवशला आत्माराम मुळे🙏🙏

Vinod Maske

Jay bhim

read more
लाखो  देव गेले जन्म घेऊनी
माणसाची किम्मत कुणी केली नाही.....
एकच होता भीमराव आमचे
त्यांच्या शिवाय कुणी हिम्मत केली नाही....     जय--भीम Jay bhim

Pushpanjali Karve

सय येताच त्याची पून्हा जाते बांधली! ❤# #poem

read more
भंगल्या सुखांची  मी घडी केली
अन् आयुष्याच्या उशाशी ठेवत गेली!

दु:खांना दुखावले मी कधीच नाही 
दु:खातही हसण्याची करामत केली !

कितीदा बजावले मी  मनाला तरी
त्यानं पून्हा पून्हा इच्छांची तोरणे बांधली !

माझ्याच वळचणीला मी झाले अनोळखी 
गर्दी कुणा दुस-यांचीच दारात पाहिली !

मुक्त व्हावे त्याच्यातुनी मी  खुपदा ठरवते 
फक्त  सय त्याची येता पुन्हा जाते बांधली!

© पुष्पांजली कर्वे सय येताच त्याची पून्हा जाते बांधली! ❤#

कृष्णभक्ती...

read more
माणसाची ओळख त्याच्या चेहऱ्यावरून जरी केली जात असली तरी ,
त्याची खरी ओळख त्याच्या ठिकाणी असलेल्या गुणांनी आणि त्याच्या कर्तृत्वानेच केली जाते...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile