Nojoto: Largest Storytelling Platform

Best शेवटी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शेवटी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आयुष्यात शेवटी आठवणी राहतात, आयुष्याच्या शेवटी आठवणीच राहतात, पुस्तकाच्या शेवटी, शब्दाच्या शेवटी, आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात,

  • 9 Followers
  • 9 Stories

Er S.P. Gambhir

"ती" किती ग्रेट असते... 

ती किती निरागस असते 
ती किती प्रेमळ असते 
ती किती काळजी घेणारी असते 
ती किती आतुरतेने वाट पाहणारी असते 
ती किती सकारात्मक असते 
ती किती समाधानी असते 
ती किती संयम ठेवणारी असते 
ती किती सहनशील असते 
ती किती त्याग करणारी असते 
ती किती भावनिक असते 
ती किती नाती जपणारी असते 
ती किती समजून घेणारी असते 
ती किती समजून सांगणारी असते 
ती किती विचार करणारी असते 
ती किती मदत करत असते 
ती किती वेदना सहन करत असते 
ती किती आनंद देणारी असते 
ती किती दुःख लपवणारी असते 
ती किती सांभाळून घेणारी असते 
ती किती व्यवहारी असते 
ती किती निष्ठावान असते 
ती किती सुस्वभावी असते 
ती किती मनातलं जाणणारी असते 
ती किती लवकर व्यक्त होत असते 
ती किती परंपरा जपणारी असते 
ती किती सावरून घेणारी असते
ती किती मनं वाचणारी असते 
ती किती संसारी असते 
ती किती व्यवस्थापन करत असते 
ती किती आधार मय असते 
ती किती हसतमुख असते 
ती किती आकांक्षा जोपासणारी असते 
ती किती समस्या सोडविणारी असते
ती किती स्वप्न पाहणारी असते 
ती किती आशावादी असते 
ती किती पारदर्शी असते 
ती किती जीव जाणणारी असते 
ती किती प्रेम करणारी असते 
ती किती आपुलकीने वागत असते 
ती किती आठवण काढत असते 
ती किती स्वतःत बदल करणारी असते 
ती किती शांत असते 
ती किती ध्येयवान असते 
ती किती यश शिखरं सर करत असते 
ती किती संवेदनशील असते
ती किती चपळ असते
ती किती हुशार असते
ती किती एकाग्र असते 
ती किती जबाबदारी निभावत असते 
ती किती मनानं सुंदर असते 
ती किती चंचल असते 
ती किती दुरदृष्टी ठेवणारी असते 
ती किती सामर्थ्यवान असते 
ती किती कष्टाळू असते 
ती किती स्पष्टवक्ती असते 
ती किती आव्हान स्वीकारणारी असते 
ती किती संकट झेलणारी असते 
ती किती बलवान असते 
ती किती 'अष्टपैलू' असते 
ती किती खरंच ग्रेट असते 
#शेवटी ती ही तीच असते, 
आपलं घर - कुटुंब सोडून विश्वासाने 
नवीन घरात शुभ पाऊल टाकत असते... 

👆🏻संपूर्ण नारी शक्तीस माझा सलाम व त्यांना ही विशेषण रुपी कविता समर्पित 🙏🏻

- Er S.P.Gambhir ✍🏻

RK Raj Chaure

read more
शेवटी खेळ भावनांचा,
काही वेळेची आपुलकी,
थोडा प्रेमाचा देखावा,
सगळी काही ओढाताण,
फक्त वेळ निभावून नेण्याचा,
शेवटी खेळ भावनांचा.
काही क्षणात आकाशी झेप,
स्वप्न रंगवत बसून,
ध्यास भरारी घेण्याचा.
पण रंगाचे बेरंग होताच,
शेवटी प्रयत्न राहतो तो ,
धडपडत का होईना जगण्याचा.
शेवटी खेळ भावनांचा.
या सगळ्यातून मुक्त होता,
शेवटी साठा उरतो तो फक्त आठवणींचा,
जुन्या जखमा पुन्हा उकरत,
नव्याने खेळ खेळतोच.
पण कधी प्रयत्न नाही करत,
पुढच्याला समजून घेण्याचा,
शेवटी खेळ भावनांचा.



 #NojotoQuote

Er. Govinda Polad

read more
एकटा बरा मी फिरतोच फार आहे 
नासुर पावलांना काट्याचा मार आहे

मी काय सांगू त्या दुःखाची कहाणी 
आठवणी जिवंत सगळ्या स्वप्ने ठार आहे

माझ्याच सरणाला चार माणसांची चिंता 
शेवटी मिळेल तेतूके जगण्याचा सार आहे

बोचली ही दुनिया आजन्म आलो जेव्हा
जाण्यास बंद सगळे परतीचे दार आहे 

रंगमंची नाटकांचे जरी नगमे गायीले मी
आयुष्यातल्या स्वरांचा शेवटी विचार आहे

किम्मत सरली जरीही दिलात आप्तीकांच्या
जगण्यात संघर्ष माझ्या हिम्मतीत धार आहे

                   - गोविंद अनिल पोलाड
                     मो:-८०८०१६६०११

rajesh pol

मी कावळा ज्याच्या कर्कश आवाजाने जन्मभर त्रास होतो ज्याच्या काळ्या रंगाचा तुम्हाला जन्मभर विटाळ होतो पण विसरता, तुम्ही जिवंत असेपर्यंतच तुमचा राष्ट्रीय पक्षी मोर असतो माणसाने जीवंत असताना कधी घास ठेवलाय का हो कावळ्याला ? आणि माणूस मेल्यावर मी घास शिवल्यावरच मोक्ष मिळतो असं कोणत्या ग्रंथात लिहलय हे माहित तरी असत का हो कावळ्याला ? हो ,तरी शेवटी असतो मान मला घाटावर कावळ्यांची गर्दी पाहून तुम्ही मात्र सुखावतात शेवटी कावळा शिवला की मोक्ष तुम्ही समजता .

read more
 मी कावळा
 ज्याच्या कर्कश
आवाजाने जन्मभर त्रास होतो 
ज्याच्या  काळ्या रंगाचा   तुम्हाला जन्मभर विटाळ होतो  
पण विसरता, तुम्ही  जिवंत असेपर्यंतच तुमचा राष्ट्रीय  पक्षी मोर असतो 
माणसाने जीवंत असताना कधी घास ठेवलाय का हो कावळ्याला ?
आणि माणूस मेल्यावर मी घास शिवल्यावरच मोक्ष मिळतो असं कोणत्या ग्रंथात  लिहलय हे माहित तरी असत का हो कावळ्याला ?
हो ,तरी शेवटी असतो मान मला घाटावर कावळ्यांची  गर्दी पाहून तुम्ही मात्र  सुखावतात शेवटी कावळा शिवला की  मोक्ष तुम्ही समजता  .

Sandesh Ganeshkar

करणार म्हणजे करणार

read more
*करणार म्हणजे करणारचं* !

संकटांना बघून डगमळणार नाही
घेतला वसा सहजा सहजी सोडणार नाही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार !

जरी सोडलं आज वाऱ्यावर आम्हास तुम्ही
 बालशिक्षणाचे स्वप्नं ह्रदयातून काढणार नाही आम्ही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणारच !
 
शिकण्यास नवी प्रेरणा मिळाली ताई तुमच्याकडून 
जगण्यास खरी दिशा मिळाली ताई तुमच्याकडून
 या उर्जेतूनच बालशिक्षणाचे स्वप्न साकार करणार म्हणजे करणारच !

वेड लागले बालशिक्षणाचे ताई आम्हास 
या वेडपणातच उद्या इतिहास घडवू आम्ही
  बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण  करणार म्हणजे करणारच !

करणार म्हणजे करणारच हे ब्रीद वाक्य आमुचे ताई ,
जरी कोलमडलो आज आम्ही, दिलेला शब्द नाही कोलमडनार ताई....

        शेवटी करणार म्हणजे करणारच या वरच ठाम राहू आम्ही 
    शेवटी करणार म्हणजे करणारच ताई.......

*संदेश गणेशकर* 
*ग्राममंगल* करणार म्हणजे करणार

Vinayak Das

#Involvement is needed

read more
गुंतण महत्वाचं.कळतयं पण... 😊 पण आलाचं ना. हो, कळतयं पण भीती वाटते.. नाहकच असेल कदाचित पण आहे. आजच पहिल्यांदा भेटलो आणि गुंतलो.. खुप बोलावं वाटतं अश्या वेळी, पण विषय सुचतं नाहीत. तसे मला सावरायला जुने प्रश्न दिमतीला येऊन उभे होतेच या ही वेळी. 'तिला काय वाटेल?''काही गैरसमज तर नाही ना करुन घेणार ती?''हि पहिलीच भेट खरं तर, ही योग्य वेळ आहे का?' आणि तोच जुना प्रश्न 'खरंच आहे का आपली पात्रता,त्या योग्यतेची?' आणि या सर्वांसोबत एक नवाच प्रश्न आज नव्याने आला, 'तू पुन्हा प्रेमात कसं काय पडू शकतोस, काय ही तुझ्या पहिल्या प्रेमाची प्रतारणा तर नाही ना?' (खरं तर हा प्रश्न निरर्थक, पण तरीही आपलं अस्तित्व सिद्ध करून गेला)

प्रश्न, पहिलेही मला निशब्द करायचे आणि आज ही त्यांनी तेच केलं.ती मात्र निर्भिडपणे माझ्याशी संवाद साधत होती. शेवटी आपलंच मन आपली गोची करतं हे मात्र खरं. मी फक्त तिच्या प्रश्नांना उत्तर करत होतो. तिच हसणं न्याहळत होतो, कदाचित ती माझ्या अवघडलेपणावरचं तर हसंत नाहिये ना, असं ही वाटुन गेलं. पण छे हो, इतक नितळ, निरागस हास्य ते, त्यावर इतका कोता संशय घ्यावा.. माझीच मला लाज वाटली. मी निर्धाराने भावनांना सावरून होतो. भीत सुध्दा होतो... काय सांगव, हा बांध कधी तुटेल ही. बराच काळ या सुख वर्षावा भिजत असतांना, वेळ आपलं कार्य साधतचं होती, अविरत वाहण्याचं. खरं तर ज्या वेळी वाटंत असत, वेळ जरा काळ थांबावा तो तेव्हाच इतक्या लवकर निघुन जातो ना.... असो, दोन तासच ते, फक्त तिच सोबत असणंच, मनाला उधाण देणारं होतं... गुतांयच नाही अस मनाशी ठरवलेलं असतांना ही, तिच्यात नकळत गुंतत जाणं, अनोखं होतं, विस्मयातीत करणारं होत,

बाकी सगळं विसरायला लावणारं होतं. आज हे सगळं तुला सांगायच ठरवुनच आलो होतो, शेवटी तुच तर हक्काची मैत्रिण आहेस ना माझी...

माझ्या प्रिय डायरीस्

तुझा 'राही औरंगाबादी' #involvement is needed

Rani Salunke

read more
थांबावं थोडं चालता चालता कधीतरी. आणि करावा विचार साऱ्याच गोष्टींचा. मग आवडत असो किंवा नसो.शेवटी किती टळणार स्वतःच स्वतःला. गुंता सुटत नाही म्हणून त्या गुंत्यासोबतच जुळवून घेणं हे कितपत योग्य आहे..? कधीतरी त्रास होणारच. आज न उद्या जे व्हायचंय ते होणारच. शेवटी कर्माचा खेळ आहे महाराज आज न उद्या फळ मिळणारच. गुंता सोडवायचा म्हणजे काय..? भांडायच स्वतःच स्वतःशी…? की पळून जायचं…? छे…! अगदीच नाही. मग नेमकं काय..? तर संवाद साधायचा स्वतःच स्वतःशी. वेडेपणाचे लक्षण म्हणतील लोक. पण स्वतःशी बोलायचं राहून गेलं तर अनेक प्रश्नांची उत्तरं शोधून देखील सापडणार नाही. एकांतात म्हणे स्वतःच शोध लागतो. शेवटी काय चुकीचं आणि काय बरोबर हे ज्याने त्याने ठरवावं. आपलं कस आहे गुंता सुटला म्हणजे झालं नाहीतर सवय व्हायची नको असलेल्या गोष्टींची.
                                               -राणी साळुंके

Krishna Rathod

नशीब व माझे प्रेम

कदाचित होतं मलातिच्या बद्दल वाटलं
समजेल सारं काही ती माझ्या मनातलं 
पण नाही कळालं तिला माझ्या मनातलं 
शेवटी मी परत माझ्या माझ्या नशिबाला गाठलं 

जेव्हा आली होती ती माझ्या जीवनात 
तेव्हा मीच बोललो काय असते या प्रेमात 
रूदय तिने तोडले प्रेमाच्या या खेळात 
शेवटी परत मी धावलो नशिबाच्या घरात 

जेव्हा कळालं मला काय असते प्रेम 
तेव्हा मला लागला होता तिचाच वेड
तेव्हाही तिच्याकडे माझ्यासाठी नव्हता वेळ 
शेवटी नशिबाने रंगवला माझा जीवनाचा खेळ 

उलटले दिवस वर्ष ती नाही गेली मनातून 
जाईल आयुष्य तरी ती नाही जाणार ध्यानातून 
एकदा कुणाचा तरी ओ ऐकला आतून 
शेवटी नशिबाने आमचे भाग घेतले वाटून 

गाठली पन्नाशी तेव्हा म्हटलं कुणीतरी 
का तुम्ही लग्न केले नाही आजवरी 
मी बोललो जी होती माझ्यासाठी बाबरी 
तिला नशीबाने दुसऱ्याकडे नेउन ठेवली #written in 2015 #forfullpoem visit #krishnarathod.wordpress.com
#krishnarathod #marathipoem #marathi #poem

D Ravindra

read more
शेवटी ,सत्याचाच  विजय होतो,

पण सत्याचा विजय नेहमी शेवटी च

का होतो?


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile