Find the Best नवा_अर्थ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
उमा जोशी
हा अवखळ वारा झोंबे माझ्या पदराला गं बाई परतून घरी बघ जाण्याची गं आहे मजला घाई भेटून निघाले सजणाला मी उशीर आहे झाला अंधार पसरला आणि घराचा रस्ता सोपा नाही पाहते कुणी का मनात शंका हजार वेळा येते नजरेस कुणाच्या नको पडाया अशी काळजी घेते पण विचार त्याचा मनात येता लाली चढते गाली इतक्यातच कुठली सखी कशी ती पुढ्यात माझ्या येते पाहून लालसर गाल तिला गं थट्टा सुचते भारी मग गोष्ट मला भेटीची लागे तिला सांगण्या सारी घेऊन वचन मी तिच्याकडोनी निघे घरी जाण्याला मज गोड वाटते प्रीती ही परि मनात भीती न्यारी उंबऱ्यात येता पाय अडखळे पदर सावरुन येते पाहत नाही ना मजला कोणी कानोसाही घेते मी अलगद शिरते घरामधे अन रमते कामामध्ये परि निजायची ती येता वेळा सखयाची सय येते मज स्वप्नी भेटे साजण माझा चढे रंग प्रेमाला आतुर हे होते माझे तनमन सखयाच्या मिलनाला मग लाली चढते अलगद गाली समीप तो येताना भासते मला सापडला आहे नवा अर्थ जगण्याला --- १७/०३/२०२३ @ १६:५० ©उमा जोशी #नवा_अर्थ #भवानी #२/८/८/४
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto