Nojoto: Largest Storytelling Platform

Best आलं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आलं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about निलंबन की परिभाषा, आलंबन विभाव के भेद, आलंदी कर कीर्तन, आलंदी हे गांव अभंग, आलंदी हे गांव,

  • 9 Followers
  • 9 Stories
    PopularLatestVideo

राकेश डाफळे...

*पाऊस मात्र पडत होता..* ओढ लागली होती पावसाची, सर्वजण वाट पाहत होते आतुरतेने... एकदा तरी बरसना, अशी विनवणी करत होते... माय अनवाणी फिरत होती पाण्यासाठी, शेतकरी राजा तडफडत होता... अचानक आभाळ भरून आलं, #story

read more
mute video

Jayshree Hatagale

मनमुराद हसता आलं पाहिजे
मनमोकळं रडता आलं पाहिजे
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
सहजतेनं जगता आलं पाहिजे... #हसणं 
#जगणं

Raj Pawar

#poem

read more
वाटणारी प्रत्येक गोष्ट
शब्दांत मांडता आली तर...
मनातली प्रत्येक भावना
बोलुन दाखवता आली तर...
तुझ्यावर प्रेम आहे,
हे सहज सांगता आलं तर..
तुझ्याशिवाय जगुच शकत नाही,
हे पटवुन देता आलं तर...
तुझी खुप आठवण येते
हे विसरुन जाता अलं तर....
तुझ्या पलिकडे सुध्दा आहे
हे जाणुन घेता आलं तर...
माझं सुध्दा अस्तित्व आहे,
हे समजुन घेता आलं तर...
तु फक्त माझीच आहेस,
हे तुला न सांगता कळलं तर..
तु अशिच जवळ रहा,
हे स्पर्शानं सांगता आलं तर...
तु जवळ नसतेस तेंव्हा,
तुझा स्पर्श जाणता आला तर..
किती बरं होईल,
जर मन वाचता अलं तर...
शब्दांपलिकडलं काहीतरी
नजरेनच जाणता आलं तर...
हे सगळेच तर नाहीसे होतील
एकदाच म्हणालीस जर...
मी सुखी होईन,
जर तु माझाच झालास तर..!

drdeoshinde48

aajoba😍

read more
😍##नसलेल्या आजोबांच असणार प्रेम##😍

नेहमी जेवताना आजोबा माझे लाड करत असत 
मला आपल्या ताटातला घास नेहमी भरवत असत
जेवता जेवता मधेच थांबत असत
आणि एक भला मोठा ढेकर देत असत
मी म्हणायची रागवून
आजोबा हे काय करताय तुम्ही
आजोबांचं त्यावर उत्तर असायचं हसून 
अग पोरी मी फक्त ढेकर देतोय
 आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात
 आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात

आजोबांना पडलं होतं भलंमोठं टक्कल 
 मग आजोबा म्हणायचे ज्याला असत टक्कल
त्यालाच असते जास्त अक्कल 
मी खिजवून म्हणायचे आजोबा म्हणजे यमकासाठी तुम्ही आता काहीही लढवणार का शक्कल
 आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात
 आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात

आजोबा आपल्याच नादात नेहमी गात असत
गाता गाता मधेच थांबून स्वतःशीच गोड हसत असत
मी जवळ गेले की मला म्हणत
पोरी मी सांगतो ते ध्यानात ठेव
एकटं एकटं जाता आलं पाहिजे
आणि स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे
  मी गोंधळून जात असे आणि विचारात असे म्हणजे काय
 मग आजोबा मोठ्याने हसत असत आणि बोलत
 म्हणजे काय? म्हणजे काय?
इवलीशी तू आणि इवलेशे तुझे पाय
 आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात
 आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात

 मी म्हणे आजोबा एक गोष्ट विचारु? हा पोरी बोल
आजोबा तुम्हांला मैत्रिणी होत्या का हो?
वा! वा! होत्या म्हणजे होत्याच की 
एक ती अशी होती
दुसरी ती तशी होती 
अशी आजोबाशी नेहमी मस्ती चालत होती
इतक्यात खोलीत आजी यायची,
 आणि आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची 
 आणि आजोबा चटकन विषय बदलायचे
घसा खाकरत म्हणायचे
आता मी तुला शिकवतो गाणे कसे म्हणायचे
आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात
 आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात

आजोबा संध्याकळी अंगणात खुर्चीवर एकटेंच बसत
एकटक डोळे लावून दूर कुठे बघत असत
दूरदूरच्या ढगात असत
कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत 
पाय न वाजवता मी हळूच तिथे जाई
त्यांच्या आरामखुर्ची मागे उभी राही
काय बघत असतील हे मी दूर पाही
मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे
मग मी हळूच हाताने त्यांचे डोळे बंद करत असे
हि आहे माझी परी कारण हे हात आहेत इवलेशे
मग मी हसत असे आणि ते माझी पप्पी घेत असे
आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात
 आणि माझं आठवणीतलं  हसरं जग मूक मूक करून जातात aajoba😍

Priya Tambde

माझी मराठी शाळा 😘😘 #poem #2YearsOfNojoto

read more
#2YearsOfNojoto कोणी आलं होतं रडत तर कोणी आलं हसत
सगळेच आलो होतो शिकायला ...!!
हीच ती शाळा जिथून सुरुवात केली 
आपण आपलं आयुष्य जगायला.........!!!!

पहिली ते सातवी पर्यंत आहे 
आपली मराठी शाळा....!!
लावलाय लळा तिने जशी 
माऊली लावते आपल्या बाळा. ......!!!

मुलांचं न मुलींचं कधीच
नाही एकमेकांशी पटलं....!!
चिडवाचिडवी न भांडण ह्याशिवाय 
दुसरं कोणालाच नाही काही सुचलं........!!

नाही कोणताही इथे 
भेदभाव न जातपात...!!
आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी
मिळते इथे गुरूंची साथ........!!
       Insta@priyatambde

मराठी शाळेचे संपत चाललंय अस्तित्व
याचीच वाटतेय मोठी खंत ..!!
आता सतत भीती वाटतेय 
माझी मराठी शाळा होणार नाही ना बंद......!!

प्रिया तांबडे माझी मराठी शाळा 😘😘

Chetan Savkar

प्रिय मित्र राकेश यांस साष्टांग नमस्कार,
प्रथमतः तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही तुझा वाढदिवस आला.त्यानिमित्ताने तुझ्यासाठी अगदी मनमोकळं लिहावं ह्यासाठी मी वेळ काढला.एरवी लोकांकडे वेळ असतोच कुठे म्हणा!!!अर्थात वेळेचं नियोजन त्यांच्याकडं नसतं.
आयुष्यात प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे.पण त्या शाश्वत आनंदाचं मूळ आपल्या अंतरी वसलेलं असतांना आपण का उगाच बेभानपणे पळत सुटायचं.नाही का?मित्रा आयुष्य असंच निखळ आनंद उपभोगून जगायचं.स्वतःच्या विश्वात मस्त रमायचं.आपण स्वतः आपल्या आनंदाच्या तरंगांवर स्वार व्हायचं.शक्यतो तुझ्या मर्जीप्रमाणेच वाग.लोकांच्या मर्जीने वागायला आपण थोडीच रोबोटची पैदास आहे.पण एक नक्की जगाच्या कल्याणासाठी जगता आलं तर बघं तिथेही थोडाफार आनंद मिळेल.रडक्या चेहऱ्यांना हसव.ते तुला भारी जमतं!!!जळक्या लोकांना विझवता आलं तर बघ बाबा....पृथ्वीचं तापमान फारच वाढतंय रे!!!सोबत तुझीही काळजी घे.
पालकाच्या भाजीत भात हे रँडम असोशिएशन फारचं भारी ये तुझं.गाडीचा स्पीड जरा कमी कर.आपल्या परिवाराची काळजी घे.संध्याकाळी एक काम करशील,एखाद्या गरीब भिकारी व्यक्तिला,शाळेतल्या एखाद्या गरीब विद्यार्थ्याला थोडीफार मदत करता आली तर नक्की कर....
                                                    
                                                    आपला मित्र,
                                                        -चेतन सावकार01

                                                                                   

#आदीHUMAN #chetan#ss

Akshay Tayde.

हसण हसवणं

read more
हसन हसवणं हे रोजच झालं 
या शिवाय आम्हाला दुसरं काय आलं

उदास चेहरे बघून मन आमचं भ्याल
मग याना हसवण्याचं फॅड आपसूकच आलं

हसण्यानं जीवन वाढत जग विसरून गेल
जीवन मागणाऱ्यांना मग आम्हीच जीवन दिल. हसण हसवणं

Mandawad Sambhaji

आयुष्यातील दुख: विसरून आपल्याला # जगता आलं पाहिजे...आणि hurt करणारी व्यक्ती समोर असताना ही आपल्याला हसता # आलं पाहिजे..Dp#

read more
 आयुष्यातील दुख: विसरून आपल्याला # जगता
आलं पाहिजे...आणि
#hurt करणारी व्यक्ती समोर असताना ही
आपल्याला हसता # आलं पाहिजे..#Dp#

ANIL PAWAR

आयुष्यातील दुख: विसरून आपल्याला #जगता आलं पाहिजे...आणि
#hurt करणारी व्यक्ती समोर असताना ही आपल्याला हसता #आलं पाहिजे..


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile