Nojoto: Largest Storytelling Platform

Best शब्द_लहरी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शब्द_लहरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 10 Stories
    PopularLatestVideo

vijay jagtap

जशी नवीन वेली वाऱ्यासारखे इकडून तिकडे झुले,
तसेच वाहत जातात ही इवलीशी मुले,
जर वेलीला मार्ग दिला तर कळी पण तिला खुले,
असेच कळी खुलता खुलता बहरू लागतात फुले...

असेल आवड तर कुठेही मिळेल ज्ञान,
मग ती शाखा असो कला किंवा विज्ञान,
शिकणाऱ्याला थांबविणे हेच तर खरं अज्ञान,
शिका व शिकवा हेच आहे सज्ञान...

घडवले ज्यांनी आपणांस ते पालक आहेत महान,
त्यांच्या मुळे मिळालेले शिक्षक ही होते छान,
मित्रांनीही शिकवले दुनियदारीचे गान,
अशा सगळ्या गुरूंचा नक्कीच आहे मला अभिमान... #Teachers_Day #VJ #विज #शब्द_लहरी

vijay jagtap

आठवणी ह्या काहीशा
खोडकरचं असतात .....
त्या येतात तेव्हा
गर्दीत ही एकाकी करतात
आणि जेव्हा एकाकी असतो
तेव्हा गर्दी करतात .......! #आठवणी #शब्द_लहरी

vijay jagtap

सगळीकडे झाली तयारी आणि सगळीकडे होत आहे फक्त एकच गप्पा,
विराजमान झाले आहेत सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा 🙏 #गणपतीबाप्पा #आतुरता #विज #VJ #शब्द_लहरी #मोरया

vijay jagtap

सगळ्या परिवाराला घेऊन पोटी,
जमवावी लागेल त्यांना आयुष्याची रोटी,
जेव्हा तुमची माणुसकी असेल मोठी,
आयुष्यभर राहील तुमचे नाव ओठी 😊

मदत करताना एकच ठेवा भान,
दुखला नाही पाहिजे कोणाचा स्वाभिमान,
माणुसकीच्या नात्याने वाढवा सगळ्यांचा मान,
पण स्वतःच्या नावाचा गजर करून नका घालवू माणुसकीची शान...😑🙏

पूरग्रस्तांना देऊया सगळेजण हमी,
काहीही पडू देणार नाही त्यांना आपण कमी,
ज्यांनी पुढाकार घेतला पुढे व्हा तुम्ही,
सतत मदतीचे हात घेऊन सोबत आहोत आम्ही...🙏 सगळ्यांची साथ,मदतीचे हात #कोल्हापूर #सांगली #पूरग्रस्त #मदतीचे_हात #VJ #विज #शब्द_लहरी

vijay jagtap

पूरग्रस्तांनसाठी प्रार्थना करा #PrayForAll #flood #विज #vj #शब्द_लहरी #देवाक_काळजी_र #poem

read more
देवा कोणत्या गोष्टींचा घेतोय तू सूर,
बेचिराग होतंय माझं सांगली,सातारा,कोल्हापूर,
सगळीकडेच आला आहे महापूर,
कृपया देवा आता तरी कर संकटे दूर...

पिण्यासाठी नाही पाणी आणि खाण्यासाठी मिळेना फळ,
उपासमारीने पोटात यायला लागली कळ,
सगळ्यांना लागली आहे या संकटाची झळ,
जीव वाचवण्यासाठी करावा लागतोय सगळ्यांनाच पळ...

कळत नाही कोणाची आहे चूक,
पण आता जनावरांसारखे सगळे होत आहेत मूक,
आयुष्यभर साठवलेल्या संसाराला मारून फूक,
आता कशी मिटवणार हे  स्वतःची तरी भूक...

देवा दिसते आहे तुला सगळे स्पष्ट,
मग का करतोय हा सुंदर निसर्ग नष्ट,
लोकांना सुखी व सुरक्षित ठेवायचे,
एवढेच कर फक्त आता कष्ट...🙏 पूरग्रस्तांनसाठी प्रार्थना करा #PrayForAll #Flood #विज #VJ #शब्द_लहरी #देवाक_काळजी_र

vijay jagtap

आयुष्याला फुलवणारा तू प्रदीर्घ श्वास,
सतत सोबतीचा एक आनंददायी आभास,
या एकट्या जीवाला घडवणारे,
तुम्ही मित्रच आहात खूप खास...😍😎🕺

आपली मित्रमंडळीच होती भारी,
मस्ती करायचो खूप सारी,
पण फिरायचा विचार झाला की,
निघायची आपली bunk मारून स्वारी...🏍️🛵🚊

कॉलेजला मध्ये असायची सगळ्यांची संगत,
ब्रेक मध्ये लागायची लास्ट बेंचवर पंगत,
वहीवर केलेल्या रेषांची वेगळीच होती रंगत,
कंटाळा आल्यावर तीच असायची गंमत...〰️〽️➖✖️⭕📉

परीक्षेला हुशार मित्राचे महत्व कळे,
notes साठी सगळे मैत्रिणीकडे वळे,
यावरूनच मित्रांची पडली होती एक म्हण,
वेळेला केळे आणि वनवासाला सिताफळे...👫👬👭

कॉलेजनंतर सगळ्यांवर आली कामाची मखरे,
मग भेटण्यासाठी पण आता करायला लागली सगळी नखरे,
नव्या मित्रांच्या व कामाच्या सोबतीत,
हरवून गेली माझी आवडती पाखरे...🕊️🦅🦉

माझ्या पाखरांनो परत फिरा,
आपल्या मैत्रीच्या घरट्यात परत शिरा,
माझ्या हातातील बोट पण शोधत आहे,
तुमच्यासारखा चमकता हिरा..👉💍💎
Happy Friendship Day Happy Friendship Day #VJ #विज #शब्द_लहरी #मैत्री #Friends #Friendship #MissYouFriends

vijay jagtap

जशी झाली रात्रीची प्रहर,
सगळीकडे पसरली शांतीची बहर,
पण त्यातच झाला कहर,
जेव्हा येऊ लागली आठवणींची लहर #लहरी #शब्द_लहरी #आठवण #विज #VJ

vijay jagtap

गुरू तेथेच सगळे सुरू #गुरुपौर्णिमा #गुरू #विज #vj #शब्द_लहरी #poem

read more
शिक्षकांची शिकवण नेहमीच न्यारी,
आई-वडिलांची मेहनत असते नेहमीच प्यारी,
पुस्तके देतात माहिती सारी,
पण मित्रांची शिकवण असते खूपच भारी...

पक्षांकडून शिकतो आकाशात उडणे,
प्राण्यांकडून शिकतो जगभर फिरणे,
झाडांकडून शिकतो आयुष्यभर उभे राहणे,
असेच शिकत राहतो आयुष्य नव्याने...

लहान मुलांकडून शिकतो नकळत रडणे,
मुलींकडून शिकतो लाजिरवाणे हसणे,
मुलांसोबत शिकतो एकमेकांसोबत असणे,
जेव्हा नसतात हे सगळे तेव्हाच कळते गुरूंचे नसणे...

ज्ञान सगळ्यांकडून घेण्यास करा सुरू,
विद्येने आपल्या ओंजळी भरू,
आयुष्यात आपण जिंकू किंवा हरू,
कधीच विसरू नका कोण होते आपले गुरू...🙏 गुरू तेथेच सगळे सुरू #गुरुपौर्णिमा #गुरू #विज #VJ #शब्द_लहरी

vijay jagtap

लेखकाचे शब्द लिहून लेखणी पण हसते,
चुकी करताना ती पण फसते,
तिच्या शब्दांमध्ये ती जादू असते,
ती शोधूनपण कोणाकडे नसते... #लेखणी #pen #चारोळी #विज #VJ #शब्द_लहरी #शब्द #लेखक

vijay jagtap

चंद्रभागेच्या किनारी वारकरी न्हाहली,
आपल्या पाप -पुण्य तुन मोकळी जाहली,
विठूच्या दर्शनाने त्यांना पंढरी पावली,
सगळीकडे एकच जयघोष माझा विठू माऊली...

सगळ्यांवर आहे तुझी छत्र छाया,
तुही लावलीस तुझ्या लेकरांवर माया,
मस्तक ठेवितो मी तुझ्या पाया,
तूच आमचा माय-बाप,तूच आमचा राया...

ज्ञानेश्वरांना दिलास विद्येचा भंडार,
तुकारामांना घडवलेस देऊन अंकुशाचा मार,
इतरांनाही दिलास तू आयुष्याचा सार,
या मातीतून घडलेल्या शरीराचा, तूच आहेस कुंभार...

गजर होत आहे तुझ्या अभंगाचा,
लोकांवरही प्रभाव आहे तुझ्या भारुडांचा,
स्वामी आहेस तू तिन्ही युगांचा,
उठून दिसतोस तू सावळ्या रंगाचा...

पालखी सोबत निघते सगळ्यांची वारी,🚩
घोड्याची पण असते सोबत सवारी,🐎
गोल रिंगणाची तर बातच आहे न्यारी,⭕
सगळ्यांच्या मुखात फक्त पांडुरंग हरी...🙏 माझा विठू माऊली #विज #VJ #माऊली #आषाढी #विठ्ठल #हरी #शब्द_लहरी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile