Nojoto: Largest Storytelling Platform

Best बघ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बघ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about बघतात का, मौसम बघुनिया, बघताय काय, बघून माझं बघा, चालून आले बघता बघता,

  • 22 Followers
  • 46 Stories
    PopularLatestVideo

विनू...

#बघ माझी आठवण येते का #poem

read more
mute video

Rohit Aher

read more
एक फुल खुडून बघ, 
केसात तुझ्या माळून बघ !

अप्सरा ही वाटेल फिकी, 
जरा आरशात निरखून बघ !

रोहित !!

Geeta Darakhe❣️

read more
कामाला कामाची गरज नको                 😌पुरावा माणुसकीचा
माणुसकीला स्वार्थाची ओढ नको
जग वेळया थोडं बेभान होऊन
माणुसकीला थोडं हृदयात ठेऊन
   
                       निस्वार्थ तू कधी होऊन तर बघ
                         आनंद त्या क्षणाचा घेऊन तर बघ
                      जग कधीतरी त्या खारुताई सारखा
                     सोड स्वार्थ तू त्या पछाडलेल्या प्राण्यासारखा

माणुसकीला तुझ्या कधी नको देऊ दुरावा
माणूस म्हणून जगतोय याचा कधी तर दे पुरावा
सूर तुझ्या जीवनाचा तूच पकडू शकतोस
माणुसकीला माणसाच्या तूच ओळखू शकतोस
स्वार्थ तुझ्या जीवनातला तूच टाळू शकतोस…❣️geet❣️

vaibhav padmakar Dharmadhikari

read more
तू मुक्त आहेस....

भावनांचं गाठोडं घेऊन जातांना
कधी थकली तर विसावा घे
त्या आठवणींच्या झुल्यावर
बघ मन शांत होईल....
दुरावलेल्या वाटा शोधतांना होतेच
दमछाक तर कधी येतं नैराश्य
तेंव्हा तो अस्ताला गेलेला सूर्य बघ
 उद्या  उगवण्यासाठी बुडालेला 
क्षणात दूर होईल ते मळभ अन 
पेटशील तू नव्याने त्या निरागस पण
संपण्यासाठी पेटलेल्या दिव्यासारखं...
सुखाला शोधावं वाटलंच कधी तर 
तो नभात हरवलेला चंद्र बघ 
म्हणजे तुला तुझ्या दुःखाची 
खंत वाटणार नाही ....
तू मुक्त आहेस त्या हरणी सारखी
चपळ अन चाणाक्ष सुद्धा
तेंव्हा विसावा घेऊन उठली ना 
तर उधळू दे तुझ्या भावनांचे वारू
चौफेर अन घुमूदे तो जल्लोष
जो तुला बंधनात ठेऊ पाहत होता....

वैभव धर्माधिकारी

R.K.

#poem

read more
विणवुनी थकलो तुला तरी तू ऐकलं नाहीस,
अशी काय चूक केली मी की माझ्याशी बोलत नाहीस,
या वेड्या प्रेमविराचे एकदा ऐकून बघ,
ऐक ना अग एकदा परत माझ्याशी बोलून बघ।
R.K.

Pragati Meshram

आयुष्याची वाट

read more
Path चिन्धी चिन्धी घलावत , वाट सरता सरना ...
आयुष्याला उत्तर नाही...प्रश्न सरता सरना ।
वाट पाहता पाहता झाला अंधार अंधार ...
आंधरच्या पुढं जाव ..अशी आयुष्याची वाट ।।
मिढे दोन घास... माये च्या पदरी पदरी ...
ओ जडित घेत बघ... माय दुःख च्या लहरी...।
माय बाप माझे बघ ..आहे देवाच ग रूप .. 
पय पय जोड़ून चालवे संसाराची ज्योत ।
जीवनाची दोरी आणि.... आहे प्रेमाची ग भूक 
द्यावे थोड़ प्रेम साऱ्या .. मिढे जगनयात सुख आयुष्याची वाट

drdeoshinde48

always be@ positive👍

read more
Success  जन्म घेऊन आलीस तू जरा मनासारखं जगून बघ
सुख तर कोणालाही हवे हवे वाटते
 दुःखाचे पहाड हि कधी तू सर करून बघ
तू अनेक यशाचे सुख अनुभवले असेल
पण अपयशाला तू कधी निरखून बघ
जगणं कठीण असत मरण सोप असत
कधी दोन्हीमधल्या वेदना हि जरा झेलून बघ
जीवन हे एक मोठं कोड आहे
तुही जरा त्याला सोडवण्याचा प्रयन्त करून बघ always be@ positive👍

Narendra Zadekar (Ek NOOR)

read more
घे विसावा ,मेघराजा फार झाले,थांब थोडा बघ घराचे हाल झाले,पाहिले  मी  रूप  येथे पावसाचे, बघ धरेचे अंग आता गार झाले, रौद्र केले रे  नदीला  तू जलाने, थांब आता  सर्व हाहाकार झाले, ये म्हणालो तर असे का यायचे रे, घर कसे हे आज बुडते पाल झाले, जोडतो मी  हात माझे, घे विसावा आसवांनी आज डोळे लाल झाले, जा तिथे तू  सूकलेल्या  माळराणी, 
दुष्कळाचे ज्या ठिकाणी वार झाले




                              Aditya Parkhe

Mahesh Lokhande

नमो पर्जन्यदेवता #poem

read more
पर्जन्यदेवता

नमो पर्जन्यदेवता
नमो दयासागरा
लक्ष करांनी वृष्टी करी
येऊ दे महापूरा

थांब म्हणणार नाही
मनसोक्त पडून घे
पण पाण्याविना आम्हा
मारू नको रे

रोपे तहानेने सारी
बघ व्याकूळ झाली
का सांग दुष्काळाची
ही पाळी आणली

तृणअंकुरांचा काय
झाला गुन्हा
का रे फुटत नाही
आज तुला पान्हा

पाने पाने तहानेने
बघ रे सुकली
ममतेची भीक
मागूनी थकली

आता तरी फुटू दे
प्रेमाचा झरा
नमो पर्जन्यदेवता
नमो दयासागरा नमो पर्जन्यदेवता

Bharati2 Sawant

read more
चित्रचारोळी

        मंद झुळूक वाऱ्याची
        गंधित करून बघ गेली
        मोगऱ्याच्या परिमळाने
        काया माझी धुंद झाली

          बगीचाही गंधाळला
          मोगर्‍याच्या सुगंधाने
          सर पावसाची येताच 
          कळ्या उमलतील नव्याने

            हा खट्याळ रानवारा
            भिरभिरतोय या काना
            सखीला माळ हा गजरा
            सांगतोय का या सजना

             घालूनी फूंकर कळ्यांना
             घुमतोय बघ हा धुंद वारा
             माळून गजरा सखीला
             फुलवतोय बटांचा पसारा

                  सौ.भारती सावंत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile