Nojoto: Largest Storytelling Platform

Best कुठे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कुठे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आई कुठे काय करते, मेल्यावर आत्मा कुठे जाते, ते दिवस आता कुठे, मुलतानी माती कुठे तयार होते, आता कुठे,

  • 17 Followers
  • 14 Stories
    PopularLatestVideo

Vin's Bansode

#कुठे आहे #poem

read more
अजूनही कुठे हरवले मी सखया शोधत आहे

मी प्रश्न मांडून उत्तर हे कुठे आहे

असे रुसून बसने चांगले नाही वाटत

तुझे हसणे हे कुठे आहे #कुठे आहे

Swati Mahendra Jadhav

माझी आई नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल

read more
चार दिसाची पाहुनी म्हनून आलीस माझ्या घरी 
बघता तुजला डोळा टचकन पाणी माझ्या भरी
 तूच का ती दिसली नाही तर जीव कासावीस होई
 रूप तुझे आठवते अजूनही ही का नाही मनात आनंदले तुला पाहून 
दुःख वाटे तुझा चेहरा मी पाहते मनात माझ्या कालवाकालव होते तू कुठे गेलीस की वाट तुझी मी पाहात होते
 तुझ्याशिवाय कुठेच मी कधीच राहात नव्हते 
पण एक दिवस असा आला तुला सोडून जावे लागले 
तुझ्या डोळ्यातील काळजी आणि अश्रू मी पाहिले 
आज जेव्हा तू घरी माझ्या आलीस
 कीती दमलीस अन् किती थकलीस
 तेज तुझ्या चेहऱ्यावरचे उडून गेले कुठे 
शोधत होते तुझ्या चेहऱ्यावरचे ते भाव जुने
 शाळेतून मी येत होते जेव्हा
 तू समोर दिसलीस की मनात आनंद वाटे तेव्हा 
तुझ्या ताटातला घास ठेवीत होतीस तू 
आठवते मजला आज हि असे कुणीच करत  नाही आता
 पण तू इतकी थकालीस पाहून मन माझे आतून रडते 
 वाटते मजला जुने ते दिवस परत यावे 
तुला बिलगुनी सारे सुख घ्यावे
एक दिवस तू म्हणालीस तुझ्या घरी कधी आलो तर पोह्याचा घास तरी करशील का 
तुझे बोलणे माझे हसणे यावे परत दिवस ते 
काय दिसत होतीस टवटवीत अन् गोजिरवाणी 
आज मग तू अशी का आजारी तीच तू ग सुंदर अन् माझी खरी तुझे भाव मजला सारे कळत होते तुझ्या चेहऱ्यावरचे सारे हसू खोटे चार दिवस आलीस तू माझ्या घरी पाहूनी  
गेलीस माझ्या मनी चुटका देऊनी
पण जन्मोजन्मी तूच मिळावी तुझ्याच उदरी मी जन्म घ्यावा
अन् तू सदैव अशीच राहावी माझ्यासाठी माझी आई...........
(कवीयत्री : स्वाती महेंद्र जाधव)
          🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 माझी आई नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल

Aniket Dhamdhere

Manmohan Singh 71साली गुदमरलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी दिली,
सुशिक्षीत पंतप्रधान म्हणून जगात ख्याती मिळवली,
प्रकाड पण्डित विद्वान अर्थशास्त्री बनून मोट हाकली,
इतिहासाच्या पानावर मनमोहनसिंग ह्या व्यक्तित्वाने एक अनोखी मोहोर उमटवली.

High comand च्या तालावर नाचणारे प्यादे म्हणून ज्यांची अवहेलना करता,
स्वतच्या नेत्याला दादा म्हणून हांजी हांजी करणारे कुठे स्वतच आत्मसन्मान विसरता,
मान अपमानाच्या एककल्ली राजकारणात कुठे अपमान करता,
अहो, ज्यानी अर्थपूर्ण भारताचा आलेख रेखाटल त्यांचा केवळ एक पक्ष-एक high comaand वरुन कुठे महानता विसरता.
-aniket #DrManmohanSingh

Sona jaybhaye

आयुष्याचा प्रवास💃💃💃💃💃

read more
💃जन्मापासून च्या 
पहिल्या श्वासापासुन तर..,
मरना जवळीक च्या
शेवटच्या श्वासापर्यंत चा हा 
आयूष्याचा प्रवास.........
सुरुवात कुठून?????
विश्रांती कुठे?????
आनंद कुठे?????
अन...,
शेवट कुठे?????
असा हा ...,
आयुष्याचा प्रवास ...........💃 आयुष्याचा प्रवास💃💃💃💃💃

Sagar_09

असेच असते जीवन कधी पदरी सुख तर दुसऱ्या क्षणी दुःख . #जीवन #आयुष्य #मराठी

read more
काही ढग काळे
तर काही पांढरे
कुठे आहे ऊन
तर कुठे सावली असेच असते जीवन
कधी पदरी सुख 
तर दुसऱ्या क्षणी दुःख  .


#जीवन #आयुष्य #मराठी

उनाड बोरकर

#poem

read more
काही नाही मागण्यासारखं तुझ्याकडे, 
आता एवढंच मागायचं आहे....
  नको रुक्मीणीची जागा मला 
  तुझी मीरा होऊन जगायचं आहे..... 

     नको मानू तू सत्यभामा 
     नको म्हणूस राधा 
     तुझ्या चरणी अर्पिली काया 
     हिशेब सरळ साधा 
नाही अधिकार सांगत तुझ्यावर, 
फक्त दासी म्हणून वागायचं आहे.... 
  नको रुक्मीणीची जागा मला 
  तुझी मीरा होऊन जगायचं आहे..... 

     कुठे तुझे ते गोकुळ अन्.... 
     कुठे तुझी ती मथूरा 
     माझ्यासारखी अभागीन मीच 
     माझा प्रवास हा अपुरा 
तुझं हे राजवैभव मला 
या पायरीवरूनच बघायचं आहे.... 
  नको रुक्मीणीची जागा मला 
  तुझी मीरा होऊन जगायचं आहे.... 

     तुझ्यासाठी अतुर मन 
     माझी प्रित तुला कळली नाही 
     हजारो वसंत उभे पाठीशी 
     तरीही बाग माझी फुलली नाही 
कधी विचारशील मला रे....?
तुला खुप काही सांगायचं आहे.... 
  नको रुक्मीणीची जागा मला 
  तुझी मीरा होऊन जगायचं आहे..... 

                      कवि : - उदय (विरसिंह) बोरकर

PrAtik Kanagi

#Quote

read more
विषय किती वाढवायचा, कुठे थांबायच आणी कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमत तो कुठल्याही परीस्थितीवर मात करू शकतो.

Mujaheed Jamadar

देवा तुझ्या गाभार्याला हुम्बराच नाही
सांग कुठे ठेउ माथा कळेनाच काही

वाहून गेली शेती,तूटला घर ही।
परत उभारेल सगळ त्याची काळजी नही।
वाहून गेले आपले,वाहून गेली नाती,
शोधू कुठे त्यांना देवा कळेनाच काही।

जीवंत वाचलो ह्या महापुरेत जर ही,
वाहून गेल सगळ काही। 
जीवंत असून ही मी आज, जीवंत रहिलो नही।
काय सांगू व्यथा जगाला,सांगन्यासाठी काही उरलच नाही। #मराठी #कोल्हापूर #व्यथा #nojotomarathi #kolhapurflood #floodvictims #कविशाला #मराठीकविता #mimarathi #मिमराठी #घर #nojoto #marathipoetry #kavishal  प्रियजीत प्रताप Umar Shaikh Princesslappi Renu Renu

Narendra Zadekar (Ek NOOR)

read more
*ते कोल्हापूर गाव कुठे गेले*।                                       दुःखात नांदणारे , आज ते रंक अन् राव कुठे गेले।           नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले|।          राधानगरी तालुका असे, देणगी ही निसर्गाची|।               महालक्ष्मी हे देवस्थान , रुपे दिसेही स्वर्गाची।             वाट वळणाची , दाटी वनाची, सारे हे ‘ प्रभाव ' कुठे गेले        नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले|।         राधानगरी धरणादुरी, दिसे जागा बरी, तिथे घरे बांधिली पूरग्रस्त होता, जीवन कंठिता , सुखे ही शोधिली।             मॄत्यूचे थैमान , होई बेभान, कैक देहांची झाली माती।      बायको, मुले, बहिण - भाऊ मायेची तुटली अतूट नाती।     कंठ दाटूनी , धीर सुटला , काळजाचे हे घाव कुठे गेले।   नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले ।        बघता बघता निसर्ग कोपला, निसर्गाचा आंधळा धड़ा।    होत्याचे नव्हते झाले, ढळता ढळता डोंगरकडा।            गांव हे शोधता , दुःख हे भोगता देहाचे ठांव कुठे गेले       नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले|।         ‘आदित्य  ’करतो प्रार्थना , हे मेघराजा घे विसावा फार झाले , सुकलेल्या माळराणी , ज्या ठिकाणी दुष्काळाचे वार झाले।                                                                                     ✍🏻- *आदित्य सिताराम पारखे।         विक्रोळी पार्क साईट  मुंबई*

Mahesh Lokhande

उन्हाळा #poem

read more
उन्हाळा

थंडगार वार्‍याची झूळूक कुठे गेली
गरम गरम हवेने भूमीही तप्त झाली
चिंब भिजण्याची आस पाखराला
थंडगार वारा सांगा कुठे गेला

करपली पाने वाढला उन्हाळा
दाहीदिशा धावे मृग मृगजळा
अंग सारे झाले घामाघूम
व्याकूळ झाला जीव तहानेन

पाण्यासाठी झाली सूरू वणवण
आटल्या विहिरी तलाव पाण्यावीण
आहे ते पाणी वापरा जपून
पाणी आहे जीवन अमृतासमान

पंखा लावुनीही गरम हवा येते
लाईट गेल्यावर घालमेल होते
कोकम सरबत ज्युस लस्सी थंडावा
लिंबूपाणी थंड हवा गारवा

थंडगार सावली गुरे शोधू लागली
झुळझुळ झर्‍यालाही किंमत आली
द्रोणपाणी भरूनी ठेव पाखराला
पाणीदान करूनी जप मानवतेला उन्हाळा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile