Nojoto: Largest Storytelling Platform

Best आत्ता Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आत्ता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआत्मा मीनिंग इन हिंदी, आत्ता चक्की मशीन price, आत्ताचे भारताचे राष्ट्रपती कोण, आत्ता चक्की मशीन, आत्ता मटका,

  • 3 Followers
  • 3 Stories

Pallavi Phadnis

read more
*त्या आभाळाला निरोप*
त्या आभाळाला द्या माझे निरोप
त्याच्यावर आज खूप झालेयत आरोप
किती वाट पाहायची त्याने भरून यायची
वाट पाहायची घराच्या दारात ,
आत्ता येईल आणि गर्द 
ओल्या मिठीत घेईल
मी आपले सावरुन बसायचे आणि
ह्याने मात्र मयसभाच उभी करायची
मग जरा बागेत जावून ,फुलांवर मोती
साठलेत का पाहायचे ,आणि 
ह्याने मात्र आत्ता येतो सांगून 
गरगर फिरायचे
ह्याला फक्त एक निमित्त असते,यायचे
म्हणून गडगडाट करतो,आधी पाठवतो
वाऱ्याला आणि त्याच्याशीच भांडतो
ह्यात मात्र हे लबाड आभाळ हळूच 
घर सोडते आणि हळूच पुढे निघून जाते
ह्याला कुठे माहितेय ,हे आभाळ दिसले
की सगळ्या सृष्टीला येते भरून ,तो 
चातक बसतो शाखेवर,आणि 
मयूर फिरतो रानभर,
छोट्या छोट्या पाखरांची घरट्यात परतण्याची घाई ,
पदर सावरुन बसलेलीअसते वनराई ,
सगळ्यांच्या डोळ्यांची होतात निरांजने,
ह्याचे मात्र आगंतुक येणे
ह्याच्या खेळात सगळेच सामवतात,
आमच्यासारखे ही लेखणी घेऊन 
कल्पनेत रमतात, किती त्याचे
लडिवाळ चालतात चाळे ,सगळीकडे
सृष्टीच्या डोहाळपणाचे सोहळे
आता ह्या आभाळाला आणखी
एक प्रेमळ निरोप ,
येशील तेंव्हा सुख घेऊन ये 
नाहीतर तुझ्यावर होतील 
सावत्रपणाचे आरोप 
तुझे नी धरतीचे नाते अनोखे
आम्ही का ठेवावे तुझे लेखेजोखे
तू कधी हि ये पण येताना अनुरागी 
आनंद घेऊन ये ,तुझ्या भरल्या
कृष्णशितल ,शाश्वत मिठीत मला 
अलगद गोजांरुन सामावून घे
                   पल्लवी फडणीस,भोर✍

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile