Nojoto: Largest Storytelling Platform

Best रोही Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best रोही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about रोहित शर्मा, रोहित पवार वाढदिवस, रोहित पवार, रोहित, रोहीत दादा पवार,

  • 2 Followers
  • 13 Stories
    PopularLatestVideo

Rohini Pande

इक सुखा फूल, इक तेरी तस्वीर और बहोत से खत 
ये निशानियाँ तेरी मुझे उदास कर दे हर वक़्त

©Rohini Pande #रोही

#Flower

Rohini Pande

••असे कसे..!••

तुझ्या विना मुळात मी, जगायचे असे कसे
उन्हास सावली तुझी ,म्हणायचे असे कसे

उदास वाटते मला,  नसेल तो  जिथे जिथे
उधाण आठवातले, जपायचे असे कसे

तरारते धरा अशी, सहून गर्भ वेदना
तृणात प्राण ओतता, फुलायचे असे कसे

मला न आवडे तुझा,उदास चेहरा असा
हसून दाखवीत मी, बघायचे असे कसे
 
मलाच ठेच लागते ,उगाच नेमकी तिथे
भरून घाव तू तिथे, दिसायचे असे कसे

हसायचे रडायचे, तुझ्या कुशित आज ही
तुझ्या शिवाय माउली, जगायचे असे कसे

उनाड पावसात त्या, शहारले किती किती
मिठीत स्पर्श जागता, झुरायचे असे कसे

अजाण भावना तिची, हुशार नाटकी सखा
सुरेख जाल टाकले,निघायचे असे कसे

अनाम साद सावळी, तुझीच येतसे मला
अधीर होत आज ही,पळायचे असे कसे

शब्दनक्षत्र

©Rohini Pande #रोही

#freebird

Rohini Pande

#रोही

read more
गंधात कामिनीच्या, भरला वसंत आहे
वेडावते दुरूनी,भलतीच खंत आहे

सांभाळ बालिके तू, आता जरा स्वतः ला
शृंगार मांडण्याला..थोडी उसंत आहे

गर्वात सुंदरी ती,जाई निघून कोठे..?
मोहात पाडण्याची , इच्छा अनंत आहे

  गालावरी सखीच्या, गर्वात तीळ शोभे
   राहे समीप इतका, तो भाग्यवंत आहे

   निष्ठूर रूपगर्वी, ती चंचला दिवानी
  हृदयात खोल इतकी, का शोभिवंत आहे

टेकून नित्य माथा, भक्तीत रंगले मी
कळले मला न तेव्हा, खोटा  महंत आहे

  नासून जात आहे..हापूस कोकणाचा
   राजा जरी फळांचा... तो नाशवंत आहे

©Rohini Pande #रोही

Rohini Pande

#रोही

read more
तेज मनाचे मज लाभू दे काळोखाच्या आधी
मनातल्या मज अंधाराने छळावयाच्या आधी

गालावरची खळी खुलावी तू हसताना  राणी
अधरावरची गोडी चाखू उजडायाच्या आधी

कुणीतरी मज आवडले... हे कधीच नव्हते  झाले
बरा दुरावा काही भलते घडावयाच्या आधी

उंच उडावे नभी फिरावे असे ठरविले होते
पंख  छाटले कोणी माझे उडावयाच्या आधी

मैत्री केली माझ्यासोबत थोड्या  स्वार्थासाठी 
विश्वासाच्या  तुटल्या तारा जुळावयाच्या आधी

हसणे  रडणे  दोन्ही नाणे आयुष्याचे येथे
हसून घ्यावे पुष्कळ मनभर रडावयाच्या आधी


पाया मध्ये पाय घातले कित्येकांनी माझ्या
तरी पांगळी झाले नाही चालायाच्या आधी

दान मिळाले आयुष्याचे आनंदाने जगण्या
 जगून घेऊ चल, मृत्युला भेटायाच्या आधीc

©Rohini Pande #रोही

Rohini Pande

#रोही पंचाक्षरी#

read more
रोही पंचाक्षरी

नभ हर्षला
तुज दिधला
रंग आकाशी
वस्त्रे भरला..

नेत्र झुकले
लज्ज जाहले
मौन अधरी
तरी बोलले

मॉडर्न जरी
लाजली खरी
झुकले नेत्र
अबोल जरी

कानात डुल
मनास भूल
गोड गोजिरी
तुझी चाहूल

    रोहिणी पांडे #रोही पंचाक्षरी#

Rohini Pande

#रोही पंचाक्षरी#

read more
का रे दुरावा?
°°°°°°°°°°°°°°°°
दुरावा छळे
तुज न कळे
हे विरहाचे
नाते आगळे..
कसे सांगावे
मन गुंतावे
तुझ्या स्मरणे
प्रीतीत न्हावे..२
   तुझी शांतता
जरा व्यस्तता
मन अस्वस्थ
असे गुंतता..३
प्रेम भावना
मनी यातना
कोण करेल
अरे सांत्वना..४
सोड ना राग
रे अनुराग
प्रीत धुंदीत
मनाची बाग..५
    रोहिणी पांडे #रोही पंचाक्षरी#

Rohini Pande

#रोही पंचाक्षरी#

read more
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
रोही पंचाक्षरी
°°°°°°°°°°°°°°
दीप पेटले
मनी हसले
उत्सवात या
तेज सांडले..

   रोहिणी पांडे #रोही पंचाक्षरी#

Rohini Pande

#रोही पंचाक्षरी# #poem #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz रोही पंचाक्षरी
°°°°°°°°°°°°°°°
पहाट वारा
अंगी शहारा
राधा तंद्रीत
वेणु पुकारा
     रोहिणी🌹 #रोही पंचाक्षरी#

Rohini Pande

#रोही#

read more
कवी ही जात माझी
कविता हा धर्म आहे,
शब्दांचे अमृत हेच
जगण्याचे मर्म आहे..१

नसानसात वाहतो
भावनांचा गहिवर,
शब्दातून उमटतो कधी
अव्यक्तसा कहर..२

जाती धर्म पाहून का
भावना कल्लोळतात,
असा कोणता झेंडा आहे
ज्यांना भावना कळतात..३

सारेच रंग तर कवितेत मग
काव्यधर्मच पाळावा,
सुंदर सुगंधी शब्द योजून
शब्दसुमनी गजरा माळावा..४

प्रत्येक मनामनात मग
फक्त स्नेह अंकुरेल,
तरल अश्या अनुभूतींनी
सारंच जग हसेल-बहरेल..५

     रोहिणी पांडे
      ९/१०/१९ #रोही#

Rohini Pande

#रोही पंचाक्षरी# #poem #nojotophoto

read more
 #रोही पंचाक्षरी#
loader
Home
Explore
Events
Notification
Profile