Find the Best स्वप्नातली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutस्वप्नातली तू परी, स्वप्नातली राणी तू, स्वप्नातली तू, स्वप्नातली माझ्या परी, स्वप्नातील रानी,
Arun Chinchangi
#स्वप्नातली परी... वाटतं...मलाही असावं कोणी जीवाभावाचं तो भाव माझ्या जीवाचा तूच असशील का ? सांग, माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...? घालतोय साद तुला... ती साद माझ्या हृदयाची तु ऐकशील का ? रंगवायचंय चित्र आयुष्याचं मलाही... त्या चित्रातील ते रंग आयुष्याचे तू बनशील का ? सांग, माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...? गायचंय बेभान होऊन प्रेमगीत तुझ्यासवे... त्या गाण्यांचा माझ्या आवाज तू होशील का ? व्हायचंय लिहतं तुझ्याचसाठी... ते शब्द तु माझे होशील का ? सांग, माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...? बांधायचीय न सुटणारी कधीही... ती गाठ जीवनाची तु बनशील का ? पहायचंय...अन् पाहतच तुला रहायचंय... मग ती नजर तु माझी होशील का ? सांग, माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...? घुसमटलेत श्वास तुझ्या अाठवांनी... त्या घुसमटल्या श्वासांना मोकळे तु करशील का ? निर्जीव झालाय हा देह सखे... या देहात तु प्राण नवा फुंकशील का ? सांग, माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...? निरर्थक आहे हे जगणं तुझ्यावाचून... आता या जगण्याला अर्थ तु नवा देशील का ? तुझ्याशिवाय नाहीच जगायचं... जगण्याचं माझ्या ते कारण तु बनशील का ? सांग, माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...? बुडायचंय आकंठ प्रेमात तुझ्या... साथ आयुष्यभर तु मला देशील का ? मी म्हणजे तु अन् तु म्हणजेच मी... समीकरण हे जीवनाचे माझ्या तू बनशील का ? सांग, माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...? वाट पाहतोय अगदी वेड्यासारखा... प्रेमवेड्याची या ती वाट स्वर्गीय तु बनशील का ? सांग, सखे माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...? ✍ - अरुण शि.चिंचणगी. माणगांव ता.चंदगड जि.कोल्हापूर २३/१०/२०१९ #स्वप्नातली_परी...
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited