Nojoto: Largest Storytelling Platform

Best सण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about सण एक दिन स्वाध्याय, सण meaning in english, सण समानार्थी शब्द मराठी, सण समानार्थी शब्द, सणाची माहिती मराठी,

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

शब्दवेडा किशोर

#सण आला हो माझ्या गौरी गणपतीचा....
वाजत गाजत आले बाप्पा थाटात सोन पावलांनी गौराईचे आगमन
गौरी गणपती विराजमान मखरात भक्तीभावे षोडशोपचारे होई पूजन....
अंगणी रांगोळी दारी तोरणं  सोनेरी गणेशोत्सवाचा थाटच भारी
नैवेद्याला पंचपक्वानांची रेलचेल आनंदाला उधाण येईल दारोदारी....
विघ्नहर्ता,सुखकर्ता भक्तांचा कैवारी गौराई देई सदा सुख समृद्धी
बाप्पा चरणी एकची ती प्रार्थना राहो तुझी कृपा होवो समाधान वृद्धी....
गणपती पाठोपाठ गौरी आनंदाचा सोहळा भारी स्वागताची जय्यत तयारी
अन् सोबतीस दिव्यतेजलतिकास्वरूप महालक्ष्मीची सजावट न्यारी....
आहे तुझ्यात तो अन् माझ्यात तो जरी नसेल आपणास सोंड त्याची
बोलतो तो करतो तोच तो आहेच बुद्धी आपल्यात त्याची....
वाहतो जरी दुर्वांची जुडी कितीक रंगास भुलतो मी
आवडे मोदक त्याला मला नैवेद्य दाखवून चव घेतो मी....
जगाचे अपराध घेतले पोटी माझ्याच कर्माने का फुगतो मी
वाहन त्याचे पाहतो जेव्हा माझ्यातील हाव संपवितो मी....
मातृभक्ती त्याने दाखविली वृद्धाश्रमाची पायरी गाठतो मी
माझ्याच कर्माचे ओझे घेवून भविष्यात ती गाठ सोडवितो मी....
कितीक नावे तो सार्थकी लावतो मात्र प्रत्येक नावात त्यालाच शोधतो मी
पूजाअर्चा भक्तीभाव मनात साठवून विश्वप्रार्थनेत फक्त त्यालाच पहातो मी..
शुभप्रभाती रूप तेजस्वरूपाचा हा भेद संपला
शुभेच्छा स्वीकारणाऱ्या चेहऱ्यात तो दिसला
भळभळत्या काळजात तव साजिरी मूर्ती ठसली
केविलवाणे जगणे पाहूनी मम अंतरात व्यथा हसली....
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #सण_आला_हा_माझ्या_गौरी_गणपतीचा

yogesh atmaram ambawale

गणपती मंडपात सजावट करताना.. #yqtaai #सण #गणेशोत्सव #गणपती_बाप्पा_मोरया #मराठीलेखणी #yqmarathi #तयारी_गणेशोत्सवाची गणपती मंडपात आमच्या,सध्या खूप धम्माल मस्ती चालते, सजावटीचे काम करत असताना,खूप टिंगल टवाळी चालते. एरवी नेहमी रागीट,पण मंडपात मात्र शांत राहावे लागते, कित्येकांमध्ये मतभेद,तरीही सारे विसरून एकत्र काम करावे लागते. मंडळात आमच्या कित्येक असे,ज्यांची अंगी चांगलेच गुण आहेत,

read more
गणपती मंडपात....!!
गणपती मंडपात आमच्या,सध्या खूप धम्माल मस्ती चालते,
सजावटीचे काम करत असताना,खूप टिंगल टवाळी चालते.
एरवी नेहमी रागीट,पण मंडपात मात्र शांत राहावे लागते,
कित्येकांमध्ये मतभेद,तरीही सारे विसरून एकत्र काम करावे लागते.
मंडळात आमच्या कित्येक असे,ज्यांची अंगी चांगलेच गुण आहेत,
सजावट कार,रंगाडी तर वायरमेन ही आमचेच आहेत.
सर्वांची सजावटीची कल्पना वेगळी,पण एकत्र येऊन आकारावी लागते,
रोज नवे नवे काम होत असतानाही,काहीतरी अपूर्णच राहते.
विसरला कुणी एखादी वस्तू,की सर्वांची बोलणी ऐकावी लागते,
दहा रुपयांच्या वस्तूसाठी,वीस रुपये खर्च करून बाजारी जावे लागते.
घोळका खूप मोठा,दोघे तिघे कामात,बाकीच्यांची नुसतीच वटवट चालते,
कामाचे तर काहीच नसतात,पण चहा मागवा ची मात्र मागणी असते.
काम चालू असता मंडपात,कुणीही आले की नव्या कल्पना सांगतात,
ह्या वर्षी अजून आगमन ही नाही,आणि पुढच्या वर्षाची आखणी सांगतात.
पूजेला कोण बसणार,मंडळात हा विषय ही खूप चर्चेचा असतो,
ज्याचे लग्न चालू वर्षी झालेले असते,त्याला मात्र हा मान असतो.
मंडळाच्या आमच्या एकमात्र बरे आहे,वर्गणी साठी कुणाकडे जात नाही,
स्वखुशीने जे देतात त्यांची स्वीकार,जबरदस्तीने कुणाकडे मागत नाही. गणपती मंडपात सजावट करताना..
#yqtaai
#सण #गणेशोत्सव #गणपती_बाप्पा_मोरया #मराठीलेखणी #yqmarathi #तयारी_गणेशोत्सवाची
गणपती मंडपात आमच्या,सध्या खूप धम्माल मस्ती चालते,
सजावटीचे काम करत असताना,खूप टिंगल टवाळी चालते.
एरवी नेहमी रागीट,पण मंडपात मात्र शांत राहावे लागते,
कित्येकांमध्ये मतभेद,तरीही सारे विसरून एकत्र काम करावे लागते.
मंडळात आमच्या कित्येक असे,ज्यांची अंगी चांगलेच गुण आहेत,

yogesh atmaram ambawale

रक्षाबंधन.. #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #रक्षाबंधन #भाऊबहिण #राखीपौर्णिमा #सण गोड अतूट असे ऋणानुबंध ज्या नात्यात असते, जगात एकमेव असे ते भाऊ-बहिणीचे नाते असते. कितीही भांडणे झाले तरी जे कधी नाते संपत नसते, असे एकमेव नाते हे भाऊबहिणीचे असते.

read more
गोड अतूट असे ऋणानुबंध ज्या नात्यात असते,
जगात एकमेव असे ते भाऊ-बहिणीचे नाते असते.
कितीही भांडणे झाले तरी जे कधी नाते  संपत नसते,
असे एकमेव नाते हे भाऊबहिणीचे असते. रक्षाबंधन..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #रक्षाबंधन #भाऊबहिण #राखीपौर्णिमा #सण 
गोड अतूट असे ऋणानुबंध ज्या नात्यात असते,
जगात एकमेव असे ते भाऊ-बहिणीचे नाते असते.
कितीही भांडणे झाले तरी जे कधी नाते  संपत नसते,
असे एकमेव नाते हे भाऊबहिणीचे असते.

Yogesh Ambawale

#आवडती_व्यक्ती#सण#खरी_मजा आवडती व्यक्ती जो पर्यंत आपल्या आवडत्या व्यक्तीचा कॉल येत नाही किंवा मेसेज येत नाही, तोपर्यंत सण साजरे करायला काही मजाच येत नाही.

read more
आवडती व्यक्ती

जो पर्यंत आपल्या आवडत्या
व्यक्तीचा कॉल  किंवा 
मेसेज येत नाही,
तोपर्यंत सण साजरे करायला काही
मजाच येत नाही. #आवडती_व्यक्ती#सण#खरी_मजा
आवडती व्यक्ती

जो पर्यंत आपल्या आवडत्या
व्यक्तीचा कॉल येत नाही किंवा 
मेसेज येत नाही,
तोपर्यंत सण साजरे करायला काही
मजाच येत नाही.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile