Nojoto: Largest Storytelling Platform

Best उडवला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best उडवला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसर्व उडवला, सर्वांनी उडवला, उडवला कार्टून, कावळा उडाला, उडवला,

  • 1 Followers
  • 1 Stories

Bhimrao Tambe

#river

read more
#बुद्ध_दिसेल_बुद्ध.

मूर्तीच्या अंगावरील वस्त्र एकदा उतरून बघा
मूर्तीच्या हातातलं शस्त्र एकदा उतरून बघा
बुद्ध दिसेल बुद्ध.
मूर्तीच्या अंगावरील शेंदूर पुसून बघा
स्वतःचा मेंदू स्वतः तपासून बघा
बुद्ध दिसेल बुद्ध
साऱ्या देशाचं करा उत्खनन,सारा देश खोदून बघा
चराचरात भेटतील तथागताची शिल्प जरा शोधून बघा
बुद्ध दिसेल बुद्ध
डोंगरदऱ्यात,कड्याकपारीत कोरून ठेवलीत लेणी
सम्यक संबोधी अवस्थेत तो बसला असेल ध्यानस्थ
कोणी करेल विद्रुपीकरण तू तुझं अंतर्मन प्रजलवित कर
बुद्ध दिसेल बुद्ध
सम्राट अशोकाने बांधलेल्या 84000 स्तुपांची चोरी झाली आहे या देशात 
तपासून पहा एकदा या देशाचा सातबारा
बुद्ध दिसेल बुद्ध
कपटाने केली होती हत्या इथल्या भिक्कु संघाची,
बौद्ध साहित्याची जाळून करून टाकली राख
तरीही एकदा जगाकडे टाक करुणेचा कटाक्ष
सर्वत्र बुद्ध दिसेल बुद्ध.
त्रिसरण,पंचशील पारमितात बुद्ध देत आहे धम्मदेसना
तू परिव्रजा धारण कर,
माणसा माणसात शोध मैत्री प्रेम करूणा.
सर्वत्र बुद्धच बुद्ध दिसेल.
"बुद्धाच्या मूर्तीवर कोणी रंग #उडवला बाई,
देवदेवता करून माझा बुद्ध दडविला बाई".
                          ----भिमराव तांबे. #river

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile