Nojoto: Largest Storytelling Platform

Best पुढची Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पुढची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपुढची सागर वेणी दाखवा, पुढची सागर वेणी, पुढची कुमकुम भाग्य मालिका, मागची पुढची संख्या, पुढची मेहंदी,

  • 1 Followers
  • 1 Stories

शब्दवेडा किशोर

White #पुढची फेरी....
शब्दवेडा किशोर
अजब अन् निराळा नियतीने आखलेला जीवनप्रवासच तो..सुरू झालाय..संपणार देखील आहे..प्रत्येकजण प्रवासी इथे...प्रत्येकाच्या नियतीने ठरवलेल्या आयुष्य नामक बसच्या फेऱ्या नित्यरोज सुरू आहेत.नवनवीन प्रवासी भेटतात व प्रत्येकाचे मोबदला शुल्क आधीच ठरलेले अन् आपला थांबा आल्यानंतर त्या आयुष्याच्या बसमधून पायउतार होणदेखील आधीच ठरलेले आहे अन् शेवटचा थांबा येईपर्यंत बस पुष्कळशी रिकामी होणार हे ही आधीच नियती कडून ठरलेले..मोजके काही जण शेवटच्या थांब्यापर्यंत वाहकासोबत असणार व तसंही ही फेरी पूर्ण होताच गोळा केलेल्या पैशाची थैली मागे सोडून निर्विकारपणे पुढे निघून जायचंय.
      आपल्या विश्वात आपले घर,आपले जग,आपले राज्य,आपले नगर असतं ते सारं मागे टाकून जिथून या बसफेरीसाठी आपली नियुक्ती झाली त्याच आपल्या त्याच आत्मतत्व असलेल्या जगात आपल्याला पुन्हा विलीन व्हायचंय...
अन् सज्ज व्हायचंय....पुढच्या अज्ञात फेरीसाठी....

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्यापुस्तकात

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile