Nojoto: Largest Storytelling Platform

Best अन् Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अन् Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about अन् उपसर्ग से शब्द, अन् से उपसर्ग, अन् का अर्थ, अन् का उपसर्ग, अन् upsarg se shabd,

  • 25 Followers
  • 71 Stories

ISHWARI HASE

#अन्

read more
__आपण काय मिळवलं यापेक्षा...
__आपल्यामुळे इतरांनी काय मिळवलं, हे महत्त्वाचं...!💯
चला तर मग.......
माणूस होऊनी माणुसकी जपुया...
#अन् एकमेकां सहाय्य करून अवघे सुपंथ धरुया......!!

Swati Mahendra Jadhav

माझी आई नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल

read more
चार दिसाची पाहुनी म्हनून आलीस माझ्या घरी 
बघता तुजला डोळा टचकन पाणी माझ्या भरी
 तूच का ती दिसली नाही तर जीव कासावीस होई
 रूप तुझे आठवते अजूनही ही का नाही मनात आनंदले तुला पाहून 
दुःख वाटे तुझा चेहरा मी पाहते मनात माझ्या कालवाकालव होते तू कुठे गेलीस की वाट तुझी मी पाहात होते
 तुझ्याशिवाय कुठेच मी कधीच राहात नव्हते 
पण एक दिवस असा आला तुला सोडून जावे लागले 
तुझ्या डोळ्यातील काळजी आणि अश्रू मी पाहिले 
आज जेव्हा तू घरी माझ्या आलीस
 कीती दमलीस अन् किती थकलीस
 तेज तुझ्या चेहऱ्यावरचे उडून गेले कुठे 
शोधत होते तुझ्या चेहऱ्यावरचे ते भाव जुने
 शाळेतून मी येत होते जेव्हा
 तू समोर दिसलीस की मनात आनंद वाटे तेव्हा 
तुझ्या ताटातला घास ठेवीत होतीस तू 
आठवते मजला आज हि असे कुणीच करत  नाही आता
 पण तू इतकी थकालीस पाहून मन माझे आतून रडते 
 वाटते मजला जुने ते दिवस परत यावे 
तुला बिलगुनी सारे सुख घ्यावे
एक दिवस तू म्हणालीस तुझ्या घरी कधी आलो तर पोह्याचा घास तरी करशील का 
तुझे बोलणे माझे हसणे यावे परत दिवस ते 
काय दिसत होतीस टवटवीत अन् गोजिरवाणी 
आज मग तू अशी का आजारी तीच तू ग सुंदर अन् माझी खरी तुझे भाव मजला सारे कळत होते तुझ्या चेहऱ्यावरचे सारे हसू खोटे चार दिवस आलीस तू माझ्या घरी पाहूनी  
गेलीस माझ्या मनी चुटका देऊनी
पण जन्मोजन्मी तूच मिळावी तुझ्याच उदरी मी जन्म घ्यावा
अन् तू सदैव अशीच राहावी माझ्यासाठी माझी आई...........
(कवीयत्री : स्वाती महेंद्र जाधव)
          🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 माझी आई नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल

शब्द शृंगार 9359164650

#poem

read more
नको असतो प्रत्येक वेळी मला तुझा पैसा, तुझं स्टेटस, तुझी संपत्ती तुझ पद मग काय हवं असतं मला.... नक्की काय अपेक्षित असतं मला आपल्या नात्यांला.... काय पाहीजे असतं मला तुझ्याकडून नक्की मला ही सांगता येणार नाही पण हवे असतात तुझे दोन शब्द जिव्हाळ्याचे.... हवी असते ती एक नजर प्रेमाची.... हवा असतो तो एक नजरेचा कटाक्ष खट्याळपणाचा.... तुझ्या केसात गुंतलेल्या मनाला तो गुंता ही आवडतो कारण तो असतो तुझ्याच विचारांचा.... थकलेलो असताना हवी असतात तुझ्या हातांची बोटे माझ्या केसात अन् तो हात माझ्या डोळ्यांच्या पापण्यावर.... कधी कधी घाबरतो मी या निर्दयी जगाला वाटतं तु म्हणावं अरे मी आहे ना तुझ्यासोबत आणि मग हवा असतो तो हात मला माझ्या खांद्यावर, धीर देण्यासाठी खूप एकाकी वाटत कधी, हिरमुसायला होतं, रडायला येतं तेव्हा मात्र हवा असतो तो हात माझ्या हातात आधारासाठी, चालायचं असतं तुझा हात हातात घेऊन त्या शांत रस्त्यावरून, अनुभवायची असते तुझी सोबत त्या झाडाखाली बसून.... कधी तरी एकांतात अनावर होणाऱ्या भावनांना पाहिजे असतो तुझा तो अलवार स्पर्श जो मोहरून टाकतो मनासोबतच शरीरालाही.... मला ही गरज असते तुझी, मला ही हवे असतात ते धुंद मंतरलेले क्षण तुझ्या सहवासाचे, तुझ्या सानिध्याचे मग हळूच शिरावेसे वाटते तुझ्या मखमली कुशीत अन् हरवून जावं वाटतं स्वतः ला.... काही क्षण हवे असतात आपल्या फक्त आपल्या जाणिवांचें.... त्या विलक्षण अनुभुतिचे.... जगाला विसरुन तुझ्यातच गुंतायच असतं, विरघळायचं असतं पण नाही व्यक्त करता येतं मला माझ्या भावनाना शब्दात.... वाटतं तु समजून घ्यावसं मी काहीच न बोलता.... ओळखावसं मनातलं फक्त नजरेतूनच.... कधीतरी घे ना मला ही समजून.... कधीतरी दे ना मला ही ती आश्वासक नजर मला बघून... तु ही विसर ना कधीतरी या जगाला.... ये ना कधी तरी मोकळ्या मनाने आणि हो ना एकरूप माझ्याशी.... माझ्या विचारांशी.... माझ्या भावनांशी.... कधीतरी माझ्यातल्या माझ्याशी....

-निल इमरोझ

शब्द शृंगार 9359164650

love #poem

read more
मनातल कधी तरी तुझ्या गुलाबी ओठांवर यावं आयुष्याची सरणारी प्रत्येक संध्याकाळ तुझ्या सहवासात सरावी अन् रोजच्या दिवसाची सुरवात तुझा मनमोहक तेजस्वी चेहरा पाहून व्हावी.... तुझ्यासोबत तासन तास गप्पा माराव्यात अन् अलगद तुझ्या खांद्यावर डोक ठेवून अलवार तुझ्या कुशीत शिरावं.... मंद अश्या एखाद्या संध्याकाळी समुद्र किनारी तुझ्या कमरेभोवती हातात हात गुंफून बसावं अन् त्या लाटांना पाहत तुझ्या मोकळ्या कुरळ्या केसात मी भान विसरून गुंतून जावं.... त्या बेभान धडकणार्या किनार्यापासून लाटांना दूर जाताना होणाऱ्या वेदना तू बघाव्यात पण चुकून कधी त्या विरहदायक वेदना तु मला देऊस नकोस हे मी प्रत्येक श्वासातून तुला सांगावं कारण तूच माझा श्वास तूच माझा आत्मा तूच माझं सर्वस्व तूच माझं आस्तित्व तुझ्याविना माझं आयुष्य म्हणजे फक्त आणि फक्त शुन्य.... love

SK

आयुष्य Rutuja Tambe Isha Kharat_24 #poem

read more
नुकतीच कुठे आयुष्याची सुरुवात होती
पुस्तकाच्या पहिल्याच पानावर शेवटाची बात होती

सुर्य डोक्यावर आलेला अन् लख्ख उजाडलेले
मनाच्या गाभाऱ्यात मात्र अवसेची रात होती

आयुष्याची लक्तरे अन् जीवनाची झालेली दशा
खडतर या वाटेवरती फक्त दुःखाचीच साथ होती

आयुष्याच्या या दिपामध्ये काठोकाठ तेल भरलेले
मिणमिणनाऱ्या या दिपामधली संपलेली वात होती . आयुष्य Rutuja Tambe Isha Kharat_24

Roshan Sagar

महापूर

read more
मानावेसे तुजला हे कृष्णा
     अन् पंचगंगा
दाखविलीसी माणसाला 
      त्याची जागा....
 
          लयं मातला हा सारा
   माणूस जाती-जातीत वाटला..
      केली असेल त्याने प्रगती
नाही सोडलाविला त्याने जातीचा खटला..

        देवाने माणसाला धर्मात 
             वाटून द्यावे..
       काय तुझी कमाल आज
 साऱ्या जाती धर्माला वाहून न्यावे....

         देवाला न कधी जमले
    ते ना कधी त्याला जमणार..
        तुझ्या पाण्याचा  प्रवाहाने
माणसाने देवाची नाही सैनिकाचे पाय पडावे....

   तुला ह्या पावसाचे तांडव
       करणं गरजेचं होतं..
त्यामुळेच तर जाती-धर्म
    एकत्र तुला करणं  होतं....

       जेव्हा जेव्हा या भूतलावर
  माणसे जातीमध्ये वाटले जातील..
          मला वाटते तेव्हा तेव्हा
 तू त्यांना त्यांची दया दाखवशील ....

कृष्णा माये आज कोल्हापूर
        पाण्यात मात्र आहे..
 बकरी ईद अन् गणपती पूजा
      पण दस्तावले  आहे....

     नको देऊ हे सणासुदीचे
          क्षणीकचं सुख;..
          दे आम्हाला वाटून
     माणुसकीचे सुख असो की दुःख.... महापूर

©शब्दगंध™

तू असावी सोबतीला...

सळसळता रिमझिम पाऊस
हिरवाईने नटलेले माळरान
अन् तू असावी सोबतीला

थंडगार बोचरा वारा
स्पर्शाने अंगी शहारा
अन् तू असावी सोबतीला

खळखळतं निखळ पाणी
रोमांच भरला मनी
अन् तू असावी सोबतीला #NojotoMarathi #Marathikavita
#कविता #शब्दगंध

SHRAVANTI HABLE

#OpenPoetry

read more
#OpenPoetry जेव्हा तू होतीस..
पहिला दिवस तो कॉलेज चा ...
न कळत जेव्हा सोबत बसलो..
अन् नवीन मैत्रीचा ऋतु सुरू झाला...
तेव्हा तू होतीस..
कॉलेज च्या अड्यावर सोबत जेव्हा मस्ती करायचो..
अन् तास न तास गप्पा मारायचो..
तेव्हा तू होतीस..

माझ पहिल प्रेम मी जेव्हा व्यक्त केलं...
आणि हरवलं सुद्धा..तेव्हा सावरायला..
तू होतीस..
विरहाच्या त्या दुःखा मधून,
एकमेकींना सावरत जेव्हा अतूट नातं निर्माण झाल...
तेव्हा ही तू होतीस..

तास न तास पेपर लिहीत असताना 
एकमेकीं साठी थांबायचो..
तेव्हा तू होतीस...
परीक्षां मधल्या KTया पण एकत्र मिळून सोडवल्या..
त्या प्रत्येक कष्टात साथ दिली...
तेव्हा तू होतीस..

प्रत्येक वेळी भांडून जेव्हा पुन्हा एकत्र यायचो..
तेव्हा तू होतीस..
जेव्हा जगलो तो सोनेरी काळ आयुष्याचा..
त्या प्रत्येक प्रवासात सोबतीला..
फक्त तूच होतीस..

माझ्या हसण्यात,माझा राडण्यात.. 
नेहमी जिची आठवण येत राहिली..ती तूच होतीस..
कोणापुढे ही व्यक्त ना होणारी मी..जीच्याकडे व्यक्त व्हायचे..
ती तू होतीस...

अन आज आयुष्याच्या एक वळणावर..ना तू माझा सोबत..
ना मी तुझा सोबत..
तुला कळलं नसेल कदाचित माझा साठी तू कोण होतीस..
अन आता सगळे आहेत सोबतीला..
पण फक्त तूच जवळ नाहीस नेहमी सारखी....
             -श्रावंती

kalpesh nagpure

#marathi#mitr

read more
"मित्र"
इवल्या इवल्याशा समुद्रकिनारी
वसलेलं "आयुष्य" नावाचं एक गाव
त्यात नेहमीच मदत करणारी
"मित्र"नावाची एक नाव

मित्र म्हणजे जीवलगा
मित्र म्हणजे सोबती
मित्र म्हणजे प्रेम, जिव्हाळा अन् 
सुखदुःखांत आठवणही
मित्र म्हणजे ओळख,विसावा अन् 
मनांत जुन्या मैफिलींची साठवणही

लिहितांना थरथरले हात माझे
आणि शाईतून तुझंच नाव सांडल
अन् काही अक्षरांत का होईना
मी मैत्रीला सर्वांपुढे मांडल #marathi#mitr

Samruddhi Langade

क्षितिजावरच्या मावळणाऱ्या सूर्याला आज उगाच न्याह्याळत होते अनुत्तरीत प्रश्नांचे उत्तर आज पुन्हा चाळत होते अबोल त्या प्रितीची ओढ नकळत कशी वाढली? बावरणाऱ्या ह्या मनाला तुझी नशा कशी चढली?

read more
अनुत्तरीत प्रश्न क्षितिजावरच्या मावळणाऱ्या सूर्याला 
आज उगाच न्याह्याळत होते 
अनुत्तरीत प्रश्नांचे उत्तर 
आज पुन्हा चाळत होते
अबोल त्या प्रितीची ओढ 
नकळत कशी वाढली?
बावरणाऱ्या ह्या मनाला 
तुझी नशा कशी चढली?
loader
Home
Explore
Events
Notification
Profile