Nojoto: Largest Storytelling Platform

Best मुक्ती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मुक्ती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मुक्ती meaning in english, मुक्ती संग्राम दिन भाषण, मुक्ती संग्राम दिन, मिळे ज्याने मुक्ती ऐसे, मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे,

  • 2 Followers
  • 1 Stories

उमा जोशी

बाजार संपला सारा
कोलाहल झाला शांत
घे आवरुन पसारा तू
बघ समीप आला अंत

जगण्याची ओढाताण
केलीस आजवर फार
परि अंतिम क्षणास नाही
गडबड जाण्याची फार

मिळतील तुला जितके ते
ओढून श्वास घे पुढचे
एकदा इथुन गेल्यावर
ना येथे परतायाचे

त्या जगात वरती होतो
ताळा अपुल्या कर्मांचा
जोडून पुण्य पदराला
तू फोड घडा पापांचा

देवास विनवुनी सांग
हा जन्म असो शेवटचा
बा तूच दाखवी आता
तो मार्ग मला मोक्षाचा

ऐकून विनवणी असली
प्रिय देवाला होशील
फेरा सरेल जन्माचा
अन तुला मुक्ति लाभेल
२०/०४/२०२३ @ २३:३१

©उमा जोशी #मुक्ती #उद्धव_वृत्त


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile