Nojoto: Largest Storytelling Platform

Best रंगीबेरंगी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best रंगीबेरंगी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about रंग बिरंगी, रंगीबेरंगी फुलपाखरे, रंगीबेरंगी फुले, रंगीबेरंगी प्राणी, रंगीबेरंगी पक्षी,

  • 2 Followers
  • 2 Stories

Sujata Darekar

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात... निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात कस हरवुन जावसं वाटतं. वाटतं ना? चला तर आजच्या दिवसाची सुरुवात निसर्गाच्या प्रेमात पडुन होऊ द्या. रंगीबेरंगी रचना करा.

read more
सारेच हसत खेळत जगू या
*********************

मोग-यास कदापी नसे गर्व गंधाचा
म्हणूनच खरा मानकरी तो सुगंधाचा

गुलाबास जरी चढला ताज मानाचा
तरी त्यास नाही माज अहंकाराचा

रातराणीच्या परिमलाने सगळेच धुंद मस्त
कधीही न पाहिली तिला झालेली त्रस्त

प्राजक्तालाही वेगळाच बहर येतो
जेव्हा तो अंगणी सडा पसरतो

जाई-जुईच्या मायेस उपमेचे लोभ नाही
मुक्या कळयांसवे ती सर्वस्व दान देई

झेंडूच्या फुलांचा सोनेरी दरवळ
सुखवितो नेत्रास झटकून मरगळ

जास्वंदाचे लेणेच भारी माळुणी तुरा
सोज्वळ, सुंदर, प्रसन्नतेने डोले अंबरा

निशीगंधाने किती जागाव्या रात्री
किती उमलावे तुझ्या-माझ्यासाठी

आणि येडाच तो फुलोरा सदाफुलीचा
विडाच उचलला जणू सदा हसण्याचा

अशी ही फुले दोन घडीचे आयुष्य ल्यालेली
जीवनाचा मंत्र कुठेही कधीही न शिकलेली

तरीही पुरेपूर जगण्यास ती किती समर्थ
आपणच का लावावा प्रत्येक गोष्टीचा अर्थ

शिकू या आपणही या फुलांकडून काही
फिरूनी पुन्हा जन्म नवा मिळणे नाही

आयुष्य अनमोल हे सुखकर बनवू या
एकमेकांसवे सारेच हसत खेळत जगू या नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात...
निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात कस हरवुन जावसं वाटतं.
वाटतं ना?
चला तर आजच्या दिवसाची सुरुवात निसर्गाच्या प्रेमात पडुन होऊ द्या.
रंगीबेरंगी रचना करा.

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात... निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात हरवुन जावसं वाटतं. वाटतं ना? चला तर आजच्या दिवसाची सुरुवात निसर्गाच्या प्रेमात पडुन होऊ द्या. रंगीबेरंगी रचना करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात...
दरवळणाऱ्या सुगंधात मन होते धुंद.
असा करी बेधुंद फुलांचा हा गंध,
प्रत्येक फुलात मन गुंतते लागतो वेगळाच छंद. नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात...
निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात  हरवुन जावसं वाटतं.
वाटतं ना?
चला तर आजच्या दिवसाची सुरुवात निसर्गाच्या प्रेमात पडुन होऊ द्या.
रंगीबेरंगी रचना करा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile