Nojoto: Largest Storytelling Platform

Download अन् रवी उगवला Status, Shayari, Quotes

अन् रवी उगवला नाही पाहण्यास आज रवीस सजूनी पहाट आली शृंगार वाट पाहे अन् रवी उगवला नाही चमकूनी दवबिंदू ते थबकले पानांवरी भ्रमरही गुंजारव मग करु लागले सुमनांवरी

nisha Kharatshinde

  • 1 Stories
  • Popular
  • Latest
  • Video
941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

अन् रवी उगवला नाही

पाहण्यास आज रवीस
सजूनी पहाट आली
शृंगार वाट पाहे
अन् रवी उगवला नाही

चमकूनी दवबिंदू ते
थबकले पानांवरी
भ्रमरही गुंजारव मग
करु लागले सुमनांवरी

दाट धुक्यात त्या
पहाटही सज्ज होती
नेसुन शालू हिरवा
प्रतिक्षेत उभी होती

प्रसन्नतेचा शुभ्र पिसारा
अतुरता ही वाढलेली
क्रूर मेघ दाटून गडद
वाट रवीची रोखलेली

✍️निशा खरात/शिंदे
(काव्यनिश)

©nisha Kharatshinde अन् रवी उगवला नाही

अन् रवी उगवला नाही #Poetry

loader
Home
Explore
Events
Notification
Profile