Nojoto: Largest Storytelling Platform

Download एक बंधन प्रेम Status, Shayari, Quotes

एक बंधन प्रेमाचे,एक बंधन मायेचे एक बंधन आधाराचे, एक बंधन रक्षणाचे अशा अनेक बंधनांनी एकवटलेले बंधन म्हणजे भाऊ बहिणीचे जिथे थोडा रुसवा -फुगवा थोडी मारामारी अश

Roshana Parasharam Yallurkar

  • 1 Stories
  • Popular
  • Latest
  • Video
d60fcdac7675f4398f10608e8324636a

Roshana Parasharam Yallurkar

एक बंधन प्रेमाचे,एक बंधन मायेचे
एक बंधन आधाराचे, एक बंधन रक्षणाचे
अशा अनेक बंधनांनी एकवटलेले 
बंधन म्हणजे भाऊ बहिणीचे

जिथे थोडा रुसवा -फुगवा
थोडी मारामारी 
अशीच असते भाऊ बहिणींची 
दुनिया न्यारी 

जिथे कधी एकमेकांस रडवलं जातं 
तर कधी रडवुन पुन्हा हसवलं जातं 
म्हणूनच ते बंधन अजून खुलत जातं 

कधी एकमकांची तक्रार सांगितली जाते 
तर कधी एकमेकांची बाजु मांडली जाते 
असच तर असते ना भाऊ बहिणीचे नाते 

तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून रमेना
असं काही असतं भाऊबहिणीच नात
म्हणूनच तर ते जगात सुंदर असतं.

नेहमी खुलत रहावं प्रत्येक भाऊबहिणीचं नात 
हिच आहे आजच्या दिवशी ईच्छा 
सर्व भाऊबहिणींना रक्षाबंधनाच्या 
मनापासून शुभेच्छा 🤗♥️

©Roshana Parasharam Yallurkar  brother and sister quotes

brother and sister quotes #Quotes

loader
Home
Explore
Events
Notification
Profile