Nojoto: Largest Storytelling Platform

कलगीतुरा....‌.‌‌. ढंग पांढरा,काळी दाढी,माथी टिक्

कलगीतुरा....‌.‌‌.

ढंग पांढरा,काळी दाढी,माथी टिक्का लाल तुऱ्याचा
पाठीवरती वार तरीही हृदयामध्ये घाव सूऱ्याचा !

मातोश्रीला तडे पाडले असतील आधी कुणी कधी
एक पांढऱ्या कबुतराने चिराच नेला चबुतऱ्याचा !

सामान्यांचे देणे घेणे कुठे आहे हो या बंडाला ?
ठाण्यामधल्या ढाण्याला या लळा आहे का शेतकऱ्याचा ?

' गाठ पडे ठकाशी ठका ' बोलून गेले तुकारामही
बोंबाबोंबी झाली आणि खेळ रंगला कलगीतुऱ्याचा !

                             कवी - सतीश दिलीपराव देशमुख
                                       शेंबाळपिंप्री,ता.पुसद 
                                        जि.यवतमाळ.

©Satish Deshmukh कलगीतुरा
#JusticeForNikitaTomar