Nojoto: Largest Storytelling Platform

मराठी कविता | 100+ Best Marathi Kavita 2022

Find the Best मराठी कविता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 148 Followers
  • 8504 Stories

Stories related to मराठी कविता

Keshav

poems छोटी कविता मराठी

read more
White आता कुठे कविता

आता कुठल्या कविता, कवितेसाठी 'मन' लागतं,
जे हल्ली 'उडून' गेलंय...

थोडासा 'जीव' लागतो चवी पुरता,परंतु तो ही आता 'बेचव' झालाय...

थोड्या 'वेदना' लागतात,*पण त्या ही 'भांड्यात पडल्यात..

*आता कुठल्या कविता, *कवितेसाठी 'मन' लागतं,
*जे हल्ली 'उडून' गेलंय...

कांहीसा निवांत क्षण लागतो,  शब्दांच्या प्रेमळ स्पर्शासाठी...

'आसवे' लागतात जे शाई सरशी
अलगद कोरीत असतात मुलायम
*पानांचे बारीक धागे....
*पण हल्ली* *ते पण सुकून गेलेत....

आता कुठल्या 'कविता'...
कवितेसाठी 'वय' लागत...
अन थोडंसं 'शब्दांच भय' लागतं...
किंचितसे 'मोती' लागतात,
भावनांचा 'गुलकंद' लागतो...

आता...जीवन 'कविता' नाही
*'सारांश' आहे..*
*यमकाच्या गाठोड्यातील,*
*विंचवाचा दंश' आहे...

©Keshav poems  छोटी कविता मराठी

काव्यात्मक अंकुर

नमस्कार मी आदित्य दळवी आपलाच काव्यात्मक अंकुर🌱 जागतिक कविता दिनानिमित्त मी आज आपल्यासमोर माझ्या पहिल्या Open Mic🎤 चे सादरीकरण आपल्यासमोर मांडतो आहे. नक्की सांगा कसा वाटला ते..!! जागतिक कविता दिनाच्या सर्व रसिक आणि कविवर्यांना शुभेच्छा..🌱🙏🏻✍🏼😇❤️ #माझीकविताअसतेती #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱

read more

काव्यात्मक अंकुर

नमस्कार मी आदित्य दळवी आपलाच काव्यात्मक अंकुर🌱 जागतिक कविता दिनानिमित्त मी आज आपल्यासमोर माझ्या पहिल्या Open Mic🎤 चे सादरीकरण आपल्यासमोर मांडतो आहे. नक्की सांगा कसा वाटला ते..!! जागतिक कविता दिनाच्या सर्व रसिक आणि कविवर्यांना शुभेच्छा..🌱🙏🏻✍🏼😇❤️ #माझीकविताअसतेती #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱

read more

शब्दवेडा किशोर

Unsplash #कधी कधी....
शब्दवेडा किशोर
कधी कधी..
बेभान जगावं एकांतात 
मनमुराद हसावं एकांतात
मोकळेपणानं रडावं एकांतात
स्वतःला पूर्णपणे सावरावं एकांतात 
आसवांना आवरावं एकांतात
स्वतःला ओळखावं एकांतात
दुखावलेल्या जुन्या नव्या जखमांचा सारा
हिशोब सुद्धा मांडावा एकांतात
स्वतःच्या आयुष्याचं पुस्तक लिहावं एकांतात
स्वतःला जगवावं एकांतात
नवी स्वप्नं पाहून बघावी एकांतात
आयुष्याचा सारीपाट खेळून बघावा एकांतात..
एक एकट्याचा एकट्यासाठीचा एकटा एकांत
शिकवतो आपणास धडे आयुष्याचे....एकांतात.... 
कधी कधी....

©शब्दवेडा किशोर #कधीतरीवाटते

शब्दवेडा किशोर

White #मायबोली मराठी....
शब्दवेडा किशोर 
माझी मायबोली भाषा मराठी लाविते मनास अभिलाषा मराठी 
संवाद साधता होत नसे निराशा ती असे माझ्या महाराष्ट्राची शान मराठी 
असे आम्हांस सदैव अभिमान तिचा दुर सर्व देशी होई सन्मान
अशी ती महान माझी राजभाषा भाषा मराठी
मला असते तिची आस अन् आहे तिच माझी सुखाची रास व माझ्या जगण्याचा विश्वास माझी मायबोली मराठी 
काना मात्रा वेलांटी आकार ऊकार रस्व व दिर्घ विराम स्वल्पविराम
पुर्णविराम उदगारवाचक अशा अनेक चिंन्हानी बहरलेली खुललेली माझी मायबोली मराठी
खरंच..जरी मावशी म्हणून स्वतःस जगी मिरविते
इंग्रजी भाषा माझ्या मायबोलीची
तरी शपथ तुम्हाला आहे सात समुद्रापल्याडदेखील
सन्माननिय वंदनीय अशी माझी लाडकी मराठी भाषा आहे 
धन्य झाले प्राक्तन माझे झाली माझी मायमाऊली मराठी
गर्व वाटतो सदा मलाच माझा बोलतो मी माझी मायबोली मराठी
माझे बोल माझे शब्द माझे गीत माझे बालकडू मराठी
माझे शिक्षण माझे मनन माझे वतन माझे आत्मचिंतन माझे राष्ट्र मराठी
माझी शांतता माझा विद्रोह माझं व्यक्तपण माझं कर्तेपण मराठी
माझं तत्व माझं सत्व माझी मायबोली मराठी
अजि म्या धन्य जाहलो जन्माने घेतले मी स्वरूप मराठी
जाहला माझा देह पावन दास जिचा जाहलो जन्माने मी
अशी अगाध लीला जिची ती सर्वसुवर्णसंपन्न
भाषा माझी मायबोली मराठी

©शब्दवेडा किशोर #माझीलेखणी

सचिन

#lost मराठी कविता

read more
हृदयावर कोरलेल्या आठवणी
काही साध्या नसतात 

त्या लिहिलेल्या नसतात 
पण वाचता जरूर येतात 

रचना _सचिन राजमाने

©सचिन #lost  मराठी कविता

शब्दवेडा किशोर

White #एक वादळाची वाट......
शब्दवेडा किशोर
      आयुष्यात अचानक उठणारी ही वादळं
फार भयंकर असतात.घोंगावत्या या वादळात
विचारांचा कचरा होतो अन् मनातला हा पालापाचोळा
आपल्या भोवती आपल्यालाच गरागरा फिरवतो.
        जेव्हा ही वादळं क्षमतात तेव्हा आपलं
सारं अस्तित्व तुटलेलं,भंगलेलं अन् पूर्णपणे विखूरलेलं असतं
अन् मग आपसूक मन पुन्हा नव्यानं तोच पालापाचोळा वेचायला लागतं..

        आयुष्यात नव्याने येणाऱ्या वादळांच्या तयारीसाठी....

©शब्दवेडा किशोर #वादळवाट

VIJAY MAMDAPUR

#Ganesh_chaturthi मराठी कविता प्रेम

read more

शब्दवेडा किशोर

White #रित्या मनाची ओंजळ....
शब्दवेडा किशोर
खुप सारं साठवून ठेऊन मात्र अखेर एकदा आभाळ बरसलं
भावनांनी मनाचा उंबरठा ओलांडावा असं म्हणलं
नभीच्या धारांना त्या धरेची अतृप्त ओढ होती
उंबऱ्यातल्या मनाच्या मोकळ्या आकाशाची जणू त्यांना आस होती
जव अतृप्त त्या ओढीनं आलेला एक गच्च मिठी मारून मनीचा तो ऊंबरठा ओलांडला तव अनाहूतपणे भावनांच्या सरी बेभान होऊन मुक्त झाल्या अन् दोघांचीही अशांत मनं पुरती क्षमली होती
आताच कुठंतरी दोघांचीही ती रित्या मनाची ओंजळ
छान सुखांच्या सरींनी पूर्ण भरली होती

©शब्दवेडा किशोर #रित्यामुठीतमाझ्या

शब्दवेडा किशोर

White माझ्या आयुष्यात मला सगळीच
चांगली माणसं भेटलीय..
मी सोडून 
कुणीच
इथं कधीच चुकत नाही....
शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile