Nojoto: Largest Storytelling Platform

काही नाही मागण्यासारखं तुझ्याकडे, आता एवढंच मागाय

काही नाही मागण्यासारखं तुझ्याकडे, 
आता एवढंच मागायचं आहे....
  नको रुक्मीणीची जागा मला 
  तुझी मीरा होऊन जगायचं आहे..... 

     नको मानू तू सत्यभामा 
     नको म्हणूस राधा 
     तुझ्या चरणी अर्पिली काया 
     हिशेब सरळ साधा 
नाही अधिकार सांगत तुझ्यावर, 
फक्त दासी म्हणून वागायचं आहे.... 
  नको रुक्मीणीची जागा मला 
  तुझी मीरा होऊन जगायचं आहे..... 

     कुठे तुझे ते गोकुळ अन्.... 
     कुठे तुझी ती मथूरा 
     माझ्यासारखी अभागीन मीच 
     माझा प्रवास हा अपुरा 
तुझं हे राजवैभव मला 
या पायरीवरूनच बघायचं आहे.... 
  नको रुक्मीणीची जागा मला 
  तुझी मीरा होऊन जगायचं आहे.... 

     तुझ्यासाठी अतुर मन 
     माझी प्रित तुला कळली नाही 
     हजारो वसंत उभे पाठीशी 
     तरीही बाग माझी फुलली नाही 
कधी विचारशील मला रे....?
तुला खुप काही सांगायचं आहे.... 
  नको रुक्मीणीची जागा मला 
  तुझी मीरा होऊन जगायचं आहे..... 

                      कवि : - उदय (विरसिंह) बोरकर
काही नाही मागण्यासारखं तुझ्याकडे, 
आता एवढंच मागायचं आहे....
  नको रुक्मीणीची जागा मला 
  तुझी मीरा होऊन जगायचं आहे..... 

     नको मानू तू सत्यभामा 
     नको म्हणूस राधा 
     तुझ्या चरणी अर्पिली काया 
     हिशेब सरळ साधा 
नाही अधिकार सांगत तुझ्यावर, 
फक्त दासी म्हणून वागायचं आहे.... 
  नको रुक्मीणीची जागा मला 
  तुझी मीरा होऊन जगायचं आहे..... 

     कुठे तुझे ते गोकुळ अन्.... 
     कुठे तुझी ती मथूरा 
     माझ्यासारखी अभागीन मीच 
     माझा प्रवास हा अपुरा 
तुझं हे राजवैभव मला 
या पायरीवरूनच बघायचं आहे.... 
  नको रुक्मीणीची जागा मला 
  तुझी मीरा होऊन जगायचं आहे.... 

     तुझ्यासाठी अतुर मन 
     माझी प्रित तुला कळली नाही 
     हजारो वसंत उभे पाठीशी 
     तरीही बाग माझी फुलली नाही 
कधी विचारशील मला रे....?
तुला खुप काही सांगायचं आहे.... 
  नको रुक्मीणीची जागा मला 
  तुझी मीरा होऊन जगायचं आहे..... 

                      कवि : - उदय (विरसिंह) बोरकर