Nojoto: Largest Storytelling Platform

प्रश्न मनाचा मनाशी . . यशस्वी प्रेमीयुगलांचे कौतु

प्रश्न मनाचा मनाशी . .

यशस्वी प्रेमीयुगलांचे कौतुक करावे तेवढे कमीच
शेवटी एक एक पायरी चढून जिंकलाच गढ 
एकनिष्ठ राहून एकमेकांसोबत , जीवनातील चढ उतार स्वीकारत . .
नाहीतर काही जण असेही आहेत जीव तोडला एकासाठी 
तो कधी आपला झालाच नाही अशी आहे केविलवाणी गत . .

शिक्कामोर्तब होईपर्यंत आपल्या नावाचा 
क्षणात व्यक्ती बदलून जाईल याचा काही भरवसा नाही 
म्हणून जीव लावताना ओवाळून टाकण्या आधी करावा विचार . .
होत नाहीत कामं कुठलीच घोकत राहिल्यावर , आई म्हणते 
उगाच जिंकून येण्याआधी नको गावात दिंडोरा नको प्रचार . .

तुम्हा लोकांची कायमची उपलब्धी बघुन
मन येतं कधी कधी भारावून , होऊन हळवं 
काय अशी शक्कल तुम्ही लोकांनी असेल लढवली . .??
जे आमच्या कल्पनेत आहे , स्वप्नात आहे , जोडीदाराची साथ 
ती तुम्ही सत्यात कोणत्या कलेने , कोणत्या जादूने घडवली . .??

कोणत्या देवाची भक्ती करता तुम्ही दोघे मिळून 
ज्याने तुमची रेशीमगाठ बांधली , ते मला सांगाल का 
ज्या मुळे तुमच्या चेहऱ्यावर दिसतं समाधान टवटवीतपणा. . ??
मला आज सांगाल का या मिळकतीचे गुपित मला 
मला परवा नाही हवं तर तुम्ही मला बालिश म्हणा. .

©Mohit Jain मिळेल का मला या प्रश्नाचं उत्तर ??

#standout

mohitkurkut1489

Mohit Jain

New Creator

मिळेल का मला या प्रश्नाचं उत्तर ?? #standout #Quotes