Nojoto: Largest Storytelling Platform
mohitkurkut1489
  • 417Stories
  • 33Followers
  • 3.5KLove
    64.3KViews

Mohit Jain

लोगो के नुक्स निकालने ने से अच्छा , खुद को तराशते तो खुदा बन जाते. ☝🏻

  • Popular
  • Latest
  • Video
93746a802a1d666c7ab9ccefd9fb3a2b

Mohit Jain

#outoflove

108 Views

93746a802a1d666c7ab9ccefd9fb3a2b

Mohit Jain

#loV€fOR€v€R

loV€fOR€v€R #Love

117 Views

93746a802a1d666c7ab9ccefd9fb3a2b

Mohit Jain

#MereKhayal
93746a802a1d666c7ab9ccefd9fb3a2b

Mohit Jain

1986 ला आजच्या मुहूर्तावर 
जन्मला एक नायाब असा हिरा . .
जो आहे थोडा मनमौजी 
जो आहे आमचा आसमंत सारा . .

पटकन कोणाशी जोडला जात नाही 
एकदा पटलं तर हात सोडला जात नाही.  .
जीव लावला तर शेवटपर्यंत लावतो जीव 
दगा दिलाच , तर आयुष्यभर तोंड पाहत नाही . .

होऊ दे तुझ्या मनासारखं , आयुष्यभर 
पाच ही बोटं तुपात असावेत तुझी ही सदिच्छा . .
रुबाबदार अश्या माझ्या , भाऊ व्यक्तिमत्त्वाला 
जन्मदिनाच्या आभाळ भरून , शुभेच्छा . .

©Mohit Jain

8 Love

93746a802a1d666c7ab9ccefd9fb3a2b

Mohit Jain

1986 ला आजच्या मुहूर्तावर 
जन्मला एक नायाब असा हिरा . .
जो आहे थोडा मनमौजी 
जो आहे आमचा आसमंत सारा . .

पटकन कोणाशी जोडला जात नाही 
एकदा पटलं तर हात सोडला जात नाही.  .
जीव लावला तर शेवटपर्यंत लावतो जीव 
दगा दिलाच , तर आयुष्यभर तोंड पाहत नाही . .

जागच्या जागेवर लागतं सगळं काही 
पाच ही बोटं तुपात असावेत तुझी ही सदिच्छा . .
रुबाबदार अश्या माझ्या , भाऊ व्यक्तिमत्त्वाला 
जन्मदिनाच्या आभाळ भरून , शुभेच्छा . .

©Mohit Jain

18 Love

93746a802a1d666c7ab9ccefd9fb3a2b

Mohit Jain

*आता मला निवांत राहायचंय*

नको कोणाची निंदा नालस्ती 
नको कोणाशी , निराशावादी तुलना  
मला आता स्वतः ला जिंकायचंय 
आता मला निवांत राहायचंय 

नको सोबतीची जबरदस्ती 
हिरमोड करणाऱ्या अपेक्षा नको . .
जे समोर आलं ते स्विकारायचंय
आता मला निवांत राहायचंय. .

पुरे झालं इतरांसाठी स्वतः च मन मारणं 
पुरे झालं मनात नसताना देखील हो म्हणणं . .
स्वतःच्या इच्छेला प्राधान्य देऊन जगायचंय 
खरंच आता मला निवांत राहायचंय . .

एका चौकटीत राहून गेले आर्धे आयुष्य 
आपलीच हद्द वाढवून , स्वतःला पारखायचंय. .
जबाबदारी पूर्ण करून , परिपूर्ण व्हायचंय 
खरंच आता मला निवांत राहायचंय . .

©Mohit Jain

11 Love

93746a802a1d666c7ab9ccefd9fb3a2b

Mohit Jain

एक अक्षर तिने लिहिले 
एक अक्षर मी लिहिले . .
बघता बघता हिशोब केला 
दोघांनी सुंदर काव्य पाहिले . .

मी एक पाऊल पुढे आलो
ती एक पाऊल पुढे आली . .
बघता बघता डोळ्या समोर 
स्वप्न पूर्ण झालेले पाहिले . .

मी एकदा ओरडलो जोरात 
तिने शांततेने ऐकून घेतले . .
तिचा समंजसपणा लेखण्याजोगा
तिने माझे पूर्ण आयुष्य व्यापले . .

मी एक शब्द बोललो 
तिने हळवार सुर छेडले . .
बघता बघता , जगण्यात रस आला 
सोबतीने , सोबतीचे प्रेम गीत गायले . .

©Mohit Jain

18 Love

93746a802a1d666c7ab9ccefd9fb3a2b

Mohit Jain

तु विचारात आहेस 
तु मनात आहेस 
फक्त नाहीस जीवनात . .
तु शब्दात आहेस 
तु ओळीत आहेस 
फक्त नाहीस हस्तरेशात. .
तु गावात आहेस 
तु शहरात आहेस 
फक्त नाहीस माझ्या देशात . .

©Mohit Jain

11 Love

93746a802a1d666c7ab9ccefd9fb3a2b

Mohit Jain

तु विचारात आहेस 
तु मनात आहेस 
फक्त नाहीस जीवनात . .
तु शब्दात आहेस 
तु ओळीत आहेस 
फक्त नाहीस हस्तरेशात. .
तु गावात आहेस 
तु शहरात आहेस 
फक्त नाहीस माझ्या देशात . .

©Mohit Jain #Valley

17 Love

93746a802a1d666c7ab9ccefd9fb3a2b

Mohit Jain

हात किती सहजपणे सुटतो हातातून 
क्षणात बदलतात जगण्याचे मार्ग . .
आज नाव घेतले तरी होते चीड 
जिची सोबत वाटत होती स्वर्ग . .

स्वप्नवत चार गोष्टी सजवून ठेवलेल्या
क्षणात होतात , कायमच्या मातीमोल . .
मी जे भोगतोय ते फिरून जाणार 
कारण ही दुनिया आहे गोल मटोल. .

अनोळखी असल्याचा स्वर पडतो कानी 
वाटतं मग हरवला तो प्रत्येक सहवासक्षण. .
ज्या गोष्टींना अविस्मरणीय समजले मी 
ते होते फक्त विरंगुळ्याचे संसाधन . .

गुंतून जाऊ नका कोणात इतके 
की गुंता होईल पूर्ण आयुष्य . .
आज वेळ भागली की संपलं हो
इथे किमतीने शून्य आहे मनुष्य . .

©Mohit Jain #Missing

12 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile