Nojoto: Largest Storytelling Platform

ठरले जर आहेच तुझे, चालणे या वाटेवरती, सोडूनि मग अस

ठरले जर आहेच तुझे, चालणे या वाटेवरती,
सोडूनि मग असं मागच्या मागे पळ का काढतोस।
ठाऊक जर तुला ही आहे की वाट ही अवखळ,
तर पुन्हा मजला या वाटेची गळ का घालतोस।
हा लपंडावाचा खेळ खेळुनी असा अवेळी
आस लावून उगा जीवाचा छळ का मांडतोस।
थट्टा म्हणावी की चेष्टा म्हणावी तुझी हि अशी ,
भुकेल्या मुखासमोरुनी असा कवळ का चोरतोस।
धरला हात झिडकारणे, हे वागणे शोभे ना तुला,
युगायुगांची भक्तभारास्तव बांधलेली चुंबळ का सोडतोस।

काय म्हणावे सांग आता, तुझ्या अश्या वागण्या 
होते आजवर , सुटले सारे, झाल्या कथा पुराण्या,
निसंग झाले मन माझे आता,अनन्यपणे तुझ्या दारी येता,
तुझ्या विटेवर ठेविता माथा, मुरलीवर प्राण ओवाळीता,
साऱ्या जगाचा विसर पडता , पुन्हा जगाशी तूच जोडतोस।
असे मोडून पडल्यावर सारे, पुन्हा उभारण्याचे बळ का देतोस।  #talks #yq_gns