Nojoto: Largest Storytelling Platform

*अचानक तिची भेट…* बस स्थानकावर गर्दीत उभा होतो, अ

*अचानक तिची भेट…*

बस स्थानकावर गर्दीत उभा होतो,
अनाहूतपणे तिचं नाव घेत होतो…
क्षणभर वाटलं, हसतोय वेड्यासारखा,
आणि अचानक ती समोर दिसली स्वप्नासारखी…

नजरेला नजर भिडली, काळ थबकला,
गर्दीचा कोलाहलही शांतसा वाटला…
हसली हलकसं, जणू संध्याकाळचा गारवा,
त्या हसण्यात अजूनही होतं ते जुनं आपलंसं बावरेपण…

"कशी आहेस?" मी विचारलं नकळत,
ती म्हणाली, "छान! तूही बदलला नाहीस बरं?"
दोघंही गप्प झालो क्षणभर, पण चेहऱ्यावर समाधान होतं,
त्या जुन्या दिवसांच्या आठवणींनी मनही भरून आलं होतं…

विचारणा घेत बसलो, हळुवार गप्पा रंगल्या,
वेळ उलटत होता, तरी आठवणी भूतकाळातच अडकल्या…
भूतकाळ आठवला तरी, वर्तमान हसू लागलं,
भेट काही मिनिटांची, पण आठवणींनी दोघांनाही फुलवलं…

ती निघाली, मीही निघालो, पण मन मात्र मागेच होतं,
गर्दीत हरवूनही, आत कुठेतरी गारवा शोधत होतं…
दोघांनीही मागे वळून पाहिलं एकवार,
आणि समजलं, काही बंध कधीच नसतात विस्मृतीपार...

©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #Moon #kaavyankur #mayurlawate #Love #Life #Poetry #marathi