Nojoto: Largest Storytelling Platform
yashvantkcarvi9560
  • 28Stories
  • 1.2KFollowers
  • 3.6KLove
    38.2KViews

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

🏰⃝⃚⃧⃡͢🇲a͛🅈υͫ ͓ℜ ⃪༎͢ 𝆺𝅥😍 फक्त मैत्री जिवलगाची

www.yashvantkc.blogspot.com

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

Unsplash आज तरी समजून घे...

तिला वाटतं मी तिला सोडून गेलोय,
माझं प्रेम संपलंय, माझ्या मनात काही उरलं नाही,
पण तिला रे का कळत नाही,
मी तिच्याशिवाय खरंच राहू शकत नाही…

तिला वाटतं मी विसरलो असेल सगळं,
मला आठवतही नसेल काल परवाचं काही,
पण तिला रे का कळत नाही,
मी तिच्या नावाचा पासवर्डही कधी बदलला नाही…

तिला वाटतं मी खूप झगडतो, नेहमी रडवतो,
पण माझ्या प्रेमाची खोली तिला का दिसत नाही?
तिला वाटतं नातं फक्त तिच एकटी जपते,
मी मात्र नात्यात काहीच सहभाग देत नाही…

सगळं काही दूरदृष्टीने सांभाळायचं स्वप्न बघतोय मी,
तिला का माझं रडणारं काळीज दिसत नाही?
सगळं काही फक्त तिला माझं करावं याचीच धडपड,
तिला का माझं निःशब्द प्रेम दिसत नाही…?

नाती नुसती दोन शरीरांची नाही, तर दोन काळजांची असतात…
पण तिला कसं रे हे कळत नाही,
सगळा आटा पिटा तिच्याच साठी चाललाय
पण तिला अजूनही माझं प्रेम का कळत नाही???

©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #library
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

White *"शुभेच्छांच्या सरींनी भिजलो"*

शब्दांचे सुगंधीत फूलं तुमच्याकडून आली,
मनाच्या बागेत सर्वत्र गंधाळून गेली...

प्रत्येक ओळीत मायेचा ओलावा दडला होता,
त्या स्नेहाच्या सरींत हृदय चिंब भिजत होता…

शुभेच्छांची ती ऊब मनाला लागली,
आनंदाची लहर काळजात दाटली...

प्रत्येकाच्या भावना मनाशी बोलल्या,
आठवणींच्या कुंडीत सुंदर फुलल्या…

तुमच्या शब्दांनी माझा दिवस खास बनला,
माझ्या आनंदाला एक नवा अर्थ मिळाला...

त्या शुभेच्छारुपी भावना मी उराशी जपतो,
मनःपूर्वक आभार… असं मनापासून म्हणतो…!

आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा यासाठी मनःपूर्वक धन्यवाद...

©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #shayari #Life #Love #poem

shayari Life Love #poem #Poetry

27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

White *"तिने पाहिलं स्टेटस, पण…"*

तिने पाहिलं माझ्या वाढदिवसाचं स्टेटस,
डोळ्यांनी वाचलं, पण मनाने सोडलं वाटंस...
मनात ओलावा नव्हताच आता तिच्या,
आठवणीत सावल्या मात्र अजूनही माझ्या…

क्षणभर वाटलं, एखादा शब्द तरी तिचा येईल,
त्या शुभेच्छांच्या ओठांवर जरा तरी ती थांबेल...
पण नाही… तिने फक्त पाहिलं आणि गप्प बसली,
जणू माझ्या अस्तित्वाला नजरेनेच झिडकारली…

कधीकाळी माझ्या नावाने रुसून बसणारी ती,
आज माझ्या वाढदिवसालाही बोलत नव्हती...
शब्दांतली माया तिच्या कधीच होती विरली,
आणि माझ्या आठवणीतली जागा गप्पच राहिली…

तिने स्टेटस पाहिलं, पण चटकन नजर फिरवली,
कधीकाळची नाती तिने एका नजरेनेच मिटवली...
मी वाट पाहत राहिलो, एक मॅसेज तरी येईल,
बोलेल वाढदिवसाच्या शुभेच्छा, निदान इमोजी तरी देईल...

पण तिच्या शांततेनेच मला, खूप काही सांगितलं,
आता जरा दूरच राहा, तिच्या अबोल्याने मागितलं...
ठीक आहे, चुकी तुझी नाही, असेल कदाचित माझी,
बोल्ली नाही तरी ठीक, पण आठवण म्हणून राहा तेवढी माझी...

©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #Thinking #Life #love

#Thinking Life love #Poetry

27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

White *✨ लाल परी आणि माझे UPSC चे दोन वर्ष ✨*

रोज सकाळी ती लाल परी बस स्टॅंडवर मला भेटायची,
कधी वेळेत, कधी लवकर, कधी खुप उशीर करायची...
डोळ्यात स्वप्न घेऊन मी तिच्या मागे धावत राहायचो,
तिची वाट बघायचो, आणि तिच्याच शोधात राहायचो...


ती गाडी झटके घेत पुढे, माझं मन मात्र विश्रांती घ्यायचं,
रोज तिच्या कुशीत मनमोकळे पणे समदं जग फिरायचं...
आधी तिचा करकर आवाज डोक्याला ताण वाटायचा,
पण नंतर, तिच्या आवाजाचा गारवा काळजाला भिडायचा…

पहिल्या वर्षी ती केवळ एक गाडी वाटायची,
पुस्तकांच्या डोंगराखाली लपलेली माझी स्वप्ने दिसायची...
इतिहास, भूगोल, राजकारणाच्या गल्ल्यांत मी हरवायचो,
आणि ती लाल परी, रोजच्या धावपळीतून माझ्या मनात मी उतरवायचो…

दुसऱ्या वर्षी मात्र ती जणू माझी साथीदार भासायची,
प्रत्येक यश - अपयशाच्या साक्षीला तिच्या इंजिनची सोबत असायची...
रात्रीच्या अभ्यासाच्या थकव्याला तिच्या ब्रेक लाइटचा लाल रंग सोबत असायचा,
 "थांबू नकोस, धावत रहा, मी सोबत आहे" असं तिच्या बोलण्याचा भास व्हायचा...

त्या दोन वर्षांत माझा दिवस तिच्याशिवाय अपूर्ण वाटायचा,
जणू तिचा साथ UPSC च्या प्रवासाचा अविभाज्य घटक वाटायचा...
आणि जेव्हा थकून मन कधी माझे हतबल व्हायचे,
तेव्हा मला तिचे रोज नव्या प्रवासाचे नवे धडे आठवायचे…

लाल परी म्हणजे फक्त गाडी नव्हती,
ती माझ्या संघर्षाची मूक साक्षीदार होती,
परीक्षा देताना मनात एकच विचार “जिंकून परतेन,
आणि त्या लाल परीला पुन्हा एकदा नक्कीच भेटेन… 

कारण लाल परी आणि माझ्या UPSC च्या दोन वर्षांची गोष्ट,
ही फक्त प्रवासाची नव्हती, तर स्वप्नांच्या पाठलागाची होती…

©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #Thinking #Love #Life #kaavyankur #mayurlawate #Poetry #Bus #upsc
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

*भोलेनाथाची वरात...*

डमरूचा नाद, तांडवाची लय,
भोलेनाथाची वरात निघाली घेऊन भय!
नंदीवर स्वार महादेव, भस्मात लिपटले,
गंगामाई जटेतुनी खळखळ ओघळले!

भूत-प्रेत, पिशाच्च ही सगळीच मंडळी सोबतीला,
नाचत, गात, हर हर महादेव करती सारे वरतीला!
कोणी झांज, डमरू वाजवती, कोणी शंख फुंकती,
अघोरी, नागा, भूत सारे मिळून जल्लोष खुप करती!

दाही दिशा दणाणल्या जयघोषांनी,
कैलास सोडला शंभूने वरातीसाठी!
अग्निहोत्री, सिद्ध, साधू, देव अन् गंधर्व,
सारे सामील या अद्भुत वरातीच्या प्रवासात!

पार्वतीचा साज, मखर सुशोभित,
शिवशंभूची माया, रूप मोहक!
वरातीचा राजा, अनादि अविनाशी,
भक्तांसाठी चालले, सृष्टीच्या साथी!

विजांचा गडगडाट, नभातली चमक,
शिवशंकराच्या विवाहाचा उत्सव थरारक!
कधी विरक्त, कधी भक्तांचा आधार,
भोलेनाथच आहेत सर्वांचे उद्धार!

"हर हर महादेव! जय शंकर!"

©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #mahashivratri #Love #kaavyankur #Poetry #mayurlawate #Life
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

कॉलेजच्या कट्ट्यावरची आमची जगावेगळी यारी,
पाच सहा दोस्तांची आमची वेगळीच दुनियादारी...
अभ्यास सोबत, गोंधळ सोबत, झगडाही कधी व्हायचा,
कितीही काही झालं तरी दुरावा कधी न यायचा...

उन दिनों की बातें भी यार बडी याद आती हैं,
क्या खूब थे वो दिन, लगता कल परसो की बातें हैं |
"Colony of Nagadchappu" where bonds never expire,
Crazy minds, endless laughter, and dreams set on fire!!!

©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #Likho #college #Life #Love #Poetry
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

*"मानवता हिच खरी जात..."*

जातपातिच्या या जंजाळात,
माणुसकी कुठं हरवली?
मनामनांत भिंती उभ्या,
ही दुनिया कुठं भरकटली?

ना रक्त वेगळं, ना श्वास वेगळा,
ना दुखं कुणाची कमी-जास्त,
पण तरीही भेद उराशी घेऊन,
का लावतो आपण धर्म, जात?

एकच सूर्य तापतो इथे,
एकच चंद्र शीतलता देतो,
एक माणुस दुसऱ्या माणसाला,
का वेगळ्या ढाच्यात मांडतो?

कोण आपला, कोण परका,
हे ठरवायला इथे कोण आले?
मानवता हाच खरा धर्म आपला,
हे जग कधी समजून घेईल का भले?

हात जोडून एकच तुम्हां मागतो,
खरा माणूस म्हणून मोठं व्हा,
जात-पात, धर्म विसरून सारे,
माणुसकीचं एक बीज बना!

"धर्म अनेक, विचार अनेक, पण माणुसकी एकच असावी,
जात नको, पात नको, फक्त प्रेम आणि शांतता वाढावी!"

©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #SushantSinghRajput #kaavyankur #mayurlawate #Poetry #Love #Life
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

White *एकतर्फी प्रेमाची व्यथा…*

तिला पाहताच मन भरून येतं,
ती हसली की आयुष्य सुंदर होतं…
तिला काहीच कळत नाही,
पण माझं हृदय मात्र वेडं होत जातं…

तिच्यासाठी लिहिले कित्येक शेर, कित्येक लिहिल्या कविता,
तरीही राहिलो कायम एकटा एक शब्दही न बोलता…
ती ओळखतही नाही माझ्या मनातल्या भावना,
मी मात्र तिच्या आठवणीत हरवत राहतो या जीवना…

रोज तिचीच वाट त्या काठावर पाहत असतो,
तिच्या एक स्मित हास्यासाठी मी जगत असतो…
ती समोर आली की हा काळ अचानक थांबतो,
आणि ती निघून गेली की जीव हा कासावीस होतो…

तिने कधी वाचले नाही डोळ्यातले शब्द,
कधी समजून घेतले नाही मनातले प्रश्न…
ती माझी कधी नव्हती, कधी होणारही नाही,
पण तिच्या आठवणींची साथ कायम सुटणारही नाही…

एकतर्फी प्रेम म्हणजे वेड्या मनाचा असतो खेळ,
भावना खरी असली तरी नशिबाचा फसवा मेळ…
ती सुखात असली तरी त्यात आनंद माझा,
तिच्या सावलीतही मी जगेन हसत,
हिच माझ्या एकतर्फी प्रेमाची सजा...
हिच माझ्या एकतर्फी प्रेमाची सजा...

©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #Sad_Status #Love #SAD #Life #Poetry
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

*अचानक तिची भेट…*

बस स्थानकावर गर्दीत उभा होतो,
अनाहूतपणे तिचं नाव घेत होतो…
क्षणभर वाटलं, हसतोय वेड्यासारखा,
आणि अचानक ती समोर दिसली स्वप्नासारखी…

नजरेला नजर भिडली, काळ थबकला,
गर्दीचा कोलाहलही शांतसा वाटला…
हसली हलकसं, जणू संध्याकाळचा गारवा,
त्या हसण्यात अजूनही होतं ते जुनं आपलंसं बावरेपण…

"कशी आहेस?" मी विचारलं नकळत,
ती म्हणाली, "छान! तूही बदलला नाहीस बरं?"
दोघंही गप्प झालो क्षणभर, पण चेहऱ्यावर समाधान होतं,
त्या जुन्या दिवसांच्या आठवणींनी मनही भरून आलं होतं…

विचारणा घेत बसलो, हळुवार गप्पा रंगल्या,
वेळ उलटत होता, तरी आठवणी भूतकाळातच अडकल्या…
भूतकाळ आठवला तरी, वर्तमान हसू लागलं,
भेट काही मिनिटांची, पण आठवणींनी दोघांनाही फुलवलं…

ती निघाली, मीही निघालो, पण मन मात्र मागेच होतं,
गर्दीत हरवूनही, आत कुठेतरी गारवा शोधत होतं…
दोघांनीही मागे वळून पाहिलं एकवार,
आणि समजलं, काही बंध कधीच नसतात विस्मृतीपार...

©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #Moon #kaavyankur #mayurlawate #Love #Life #Poetry #marathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile