पुस्तक दिन निमित्ताने अनुप्रासअलंकाराचे हे उदाहरणः वाचता वाचता वाचाल. वेगवेगळे वाचा. वाचाळवीर वदले वानर विचारी व्हा. वनराईला वस्तू वस्तू व्यवस्थित वहा. वतन, व्यवहार विशिष्ट वेळी वजनदार वाटतो. वानप्रस्थी वस्तू विनाकारण वाटतात. विकासासाठी विश्वासाचा वापर विविध वेळी विविध वस्तीत वस्तुतः वाजतगाजत वठवावा. वैरभाव वडीलांसी विशेषकरून वाताहत वाढवतो. विचार, वाचन, वाणी, वहिवाट, वलय, वतन, वचन वस्तुतः वागणूकीत वठवावे. वाचतांना वयभान विसरावे. वाचलेले विचार वाईट वगळून वाचकांना वाटावे.. वाटता वाटता वाटून विभागावे. विचारांचे विशेष वेगळे वास्तविक वरदान वाडी वाडीत वसवावे. //दिबा// ©Dileep Bhope #अनुप्रासअलंकार