Nojoto: Largest Storytelling Platform

#मी आहे तुझ्या पाठीशी मी म्हणालो स्वामींना तुम्ही

#मी आहे तुझ्या पाठीशी
मी म्हणालो स्वामींना तुम्ही माझे आहात कोण ?
स्वामी म्हणाले वत्सा तू आणि मी नाही दोन 
मी म्हणालो जीवनाची वाट माझ्या असेल कशी ?
स्वामी म्हणाले भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठीशी......
मी म्हणालो स्वामींना सांगा तुम्ही कुठे असता ?
जाते माझी नजर जिथे तिथे तुम्हीच कसे दिसता ?
स्वामी वदले मी वसतो भक्तांच्या हृदयापाशी
कधी ही भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठीशी......
मी म्हणालो स्वामी माझा हात हाती घ्याल का ?
चुकलो मी जरी कधी साथ मला द्याल का ?
नामस्मरण करत राहा मग चूक होईलच कशी ?
स्वामी म्हणाले चालत राहा मी आहे तुझ्या पाठीशी......
मी पुसले प्रकट दिनाचा सोहळा कसा करावा ?
कशी करावी सेवा तुमची काय बेत आखावा
वदले स्वामी नको सोहळा तू स्मरशी मजला मनाशी
भिऊ नकोस सदासर्वदा मी आहे तुझ्या पाठीशी......
कळली मला चूक माझी मी उगा प्रश्न पुसले
या जीवनी क्षणोक्षणी स्वामी सामोरे दिसले
मी तुझा नी तू माझा स्वामी वदले मजसी
भिऊ नकोस क्षणोक्षणी मी आहे तुझ्या पाठीशी......
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #श्री_स्वामी_समर्थ