#MessageOfTheDay खुर्ची नेमके नेटके शब्द मी गुंफतो... माहिती हे मला रोज तू वाचतो! अंगणाची मला राहिली ना भिती... वाकडे ते जरी आपला नाचतो! आदळा आपटा रागवा की चिडा... मी तरी आपला साखऱ्या पेरतो! संग केला असंगासवे मी जरी... चांगली खोड त्यांच्यातली शोधतो! सुंदरी भासते आज खुर्ची जरी... टोचते सारखी एवढे सांगतो! जयराम धोंगडे ©जयराम धोंगडे #Messageoftheday