Nojoto: Largest Storytelling Platform

White आयुष्य जगतांना आयुष्य जगतांना आयुष्यच घेते

White आयुष्य जगतांना

आयुष्य जगतांना
आयुष्यच घेते परिक्षा 
मन आपले मजबूत ठेवा
स्वतःला देऊ नका शिक्षा! 

आयुष्य जगतांना
आयुष्याच्या वाटेवर काटे असतात 
त्या काट्यांना फुल बनवा 
जे असे करतात तेच खरे जीवन जगतात 

आयुष्य जगतांना
डगमगून जाऊ नका!
इथे प्रत्येक वळणावर 
मिळे धोकाच धोका!

आयुष्य जगतांना
मनात सकारात्मक विचार ठेवा!
चाला आपल्या मर्जीनुसार 
करु नका कुणाचा हेवा!

आयुष्याला द्या हसतमुखाने तोंड 
संघर्षाशिवाय जीवन नाही!
तडजोड आयुष्यात करा
अडचणीचा करा बिमोड

मोहन सोमलकर नागपूर

©Mohan Somalkar
  #कविताई