Nojoto: Largest Storytelling Platform
mohansomalkar7420
  • 194Stories
  • 13Followers
  • 1.2KLove
    5.3KViews

Mohan Somalkar

  • Popular
  • Latest
  • Video
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

#भावनाएं
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

#कविता
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

White रणरागिनी जिवलगच्या 

रणरागिनी वाघिणी
रणरागिनी वाघिणी
प्रतिभाशाली तयांची 
आहे हो किती लेखणी 

जिवलगाची शान
करावा तयांचा मान
प्रतिभावंतांची खाण
पराक्रमी लेखणी छान 

नागपुरची उर्मिला परुळकर 
इतिहास लेखणीतुन घडविला
लेखणीतुन प्रतिलिपीवर लिहिते
लेखणीचा प्रतिलिपीला साठा दिला

मुंबईची मुंबई क्विन 
कृष्णसखी अनघा!
लेखणीतुन व्यक्त होते ती
 लेखणीचा तिचा इतिहास बघा!

पुणे मराठी भाषेची जननी 
स्वाती पाटील लेखिका तिथे गुणी
कथांतून ग्रामीण वसा जपते
वाचक तिच्या कथा वाचून जाई आनंदुनी! 

गडचिरोली आमच्या विदर्भाची शान
तिथून येते सौ. वंदना सोरतेची कथा छान 
स्त्री चरित्रावर ती लिहिते
लेखणीतुन रणरागिनी समान व्यक्त होते.

नाशिकला श्रीरामाचे चरण टेकले
सप्तशृंगी माता तिथे अवतरली 
नाशिक मधुन एक जिवलग
आमची सोनाली वडनेरे ताई आली

लातूरचा झेंडा अटकेपार 
लेखणीतुन पवित्रा नागरगोजे आणते बहार!
जिवलग आहे लेखणीतुन लिहिते
प्रतिलिपीवर कथेतुन दिसते बहार!

या सहाही जिवलग रणरागिनी
लेखणी आहे यांची बहुगुणी 
वाचन करा कथा ह्यांच्या
वेळ गेला नाही अजुनी! 

मोहन सोमलकर नागपूर

©Mohan Somalkar
  #lonely_quotes प्रेम
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

शैलेशला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

जीवन जगता जगता
धावपळीतून वेळ काढावे
जीवनाच्या शर्यतीत 
रोजच का धावत रहावे.!

म्हणूनच प्रत्येक क्षण 
तु धुंद होऊन जगत असतो!
जीवनात किती छंद 
तु जोपासत बसतो..!

दुर अंतरी मित्रांपासून राहुन 
मैत्रीचा धागा तु घट्ट ठेवला!
प्रत्येक मित्राला हृदयी ठेऊन 
ऋणानुबंध मैत्रीचा सदैव जपला!

सारे मित्र करतो तुला सलाम 
जरी आहे तु आमच्यापासून लांब!
आरोग्य सदा सुदृढ राहो
आम्हासाठी तु पृथ्वीवर शंभर वर्ष थांब!

प्रिय मित्र शैलेश तुला इंदिरा गांधी
हायस्कूल 1990 बॅच करुन शुभेच्छा

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar
  #-कविता

108 Views

c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

शैलेशला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

जीवन जगता जगता
धावपळीतून वेळ काढावे
जीवनाच्या शर्यतीत 
रोजच का धावत रहावे.!

म्हणूनच प्रत्येक क्षण 
तु धुंद होऊन जगत असतो!
जीवनात किती छंद 
तु जोपासत बसतो..!

दुर अंतरी मित्रांपासून राहुन 
मैत्रीचा धागा तु घट्ट ठेवला!
प्रत्येक मित्राला हृदयी ठेऊन 
ऋणानुबंध मैत्रीचा सदैव जपला!

सारे मित्र करतो तुला सलाम 
जरी आहे तु आमच्यापासून लांब!
आरोग्य सदा सुदृढ राहो
आम्हासाठी तु पृथ्वीवर शंभर वर्ष थांब!

प्रिय मित्र शैलेश तुला इंदिरा गांधी
हायस्कूल 1990 बॅच करुन शुभेच्छा

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar
  #-कविता

99 Views

c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

स्वातीताई 

नाते ऋणानुबंधाचे
मला हे लेखणीमुळे 
धागे सदा जिव्हाळ्याचे
नित्य जीवनात कळे!

जुळवून घेता मन
एक एक साहित्यिक 
इथे भेटला रुळला
आले लेखणीचे पिक!

अशी एक ताई मला
साहित्यातुन भेटली!
कथाकाव्यातुन ती
सदा इथे प्रकटली!

भरपूर केले लिखाण 
वाचकसंख्या तिची वाढली!
नव नव्या कथा लिहून 
जीवनगाथा तिने लिहली!

अशा ताईचा आज वाढदिवस 
आहे वर्षांचा खास दिवस 
जीवनात तिला सदा 
भेटावे नेहमीच सुयश..!

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

जीभेचे चोचले नाही पुरायचे

जीभेचे चोचले आता कसे जमायचे
अचकल बचकल खातांनी पोटाकडेही बघायचे
पाणीपुरी,भेलपुरी,बर्गर, पिझ्झा, मंच्युरियन
आता खाणे नाही हो जमायचे.!

जिभेचे असतेच नेहमी तोंडाकडे गाऱ्हाणे 
चटपटीत नाही खायला भेटत म्हणुन ओरडायचे
जिभेच्या तालावर नाही कधीच नाचायचे
कधी बिचार्या पोटाचे तर ऐकायचे.!

लागला आता उन्हाळा उन्हाने जीवाने घाबरायचे
नकोच आता तळलेले ते पदार्थ दुर त्याला सारायचे
राब राब राबुन शरिराचे तापमान समतोल राखायचे
ताक,आंब्याचे पन्हं,  ऊसाच्या रसाने दाह शांत ठेवायचे

जिभेचे चोचले जर पुरविले तर
पोटाने कधीना कधी हडताल करायचे..!
म्हणून आता जिभेचे या कानाने ऐकुन 
त्या कानाने हवेत सोडुन द्यायचे...!

मोहन सोमलकर नागपूर

©Mohan Somalkar
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

#happyholi
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

#happyholi #होलीकेहमजोली
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

चाॅकलेट (कविता)

काळ कोस टाकत आहे
जुनाच काळ छान होता!
पेपरमेंट, संत्रागोळी, मैसुरपाकचा 
चवदार आमचा जमाना होता!

खुप आम्ही एकमेकांच्या मागे
दमत पर्यंत धावायचो! 
हृदय पंपींग करायचे 
रस्त्यावर पडुन पुन्हा उठायचो! 

रक्त लागले खरचटले तरी
भिती नसायची कधीच! 
त्या काळातली गुळाची पापडी 
पळवायची सारी शरीरातील व्याधीच! 

सरले ते सोनेरी सारे दिवस 
आता कृत्रिमता जगण्यात आली
कॅडबरी,फाईव्ह स्टार बार ही
पाश्चिमात्य चाॅकलेट उद्यास आली

वरुन आकर्षक मुलामा
चाॅकलेटच्या आत जहर धसले! 
डेरीमिल्क, किटकॅट, नेसले 
चाॅकलेटची नावे ही कसले.!

चांगली आपली संस्कृती सोडुन 
विदेशी संस्कृतीकडे धावतो! 
भारतातला गोरसपाक आमचा
विदेशी लोकांना खुप चवीचा वाटतो!

ता. क. गोरसपाक गावरानी गाईच्या दुधापासून बनलेलं भारतीय चविष्ट खाद्य!

मोहन सोमलकर नागपुर 
शुभ चाॅकलेट दिवस 🚩🔥

©Mohan Somalkar #happyteddyday
loader
Home
Explore
Events
Notification
Profile