*खळखळ होवून मुक्त झऱ्याची* *आयुष्याचे गाणे गावे* *रंग बेगडी खोडून सारे* *आत्मरंगी रंगून जावे* *पंख देवूनी मनःपाखरा* *स्वच्छंदी गगनात फिरावे* *गुरफटून कोशात स्वतःच्या* *भार प्रौढी उगा वहावे* *आव्हानांना भिडवीत डोळे* *तुफानांना तुडवीत जावे* *निधड्या छातीवरती झेलीत* *संकटावरी कोरीत नावे* *विखुरलेल्या स्वप्नांचे* *मोती-मोती वेचीत जावे* *सर गुंफूनी स्वयें तयांचे* *भार कंठी मिरवीत गावे* *कशास चिंता व्यर्थ उद्याची* *मृगजळी का उगा फसावे* *रीती ओंजळी क्षण निसटती* *शल्य शेवटी काय असावे?* *ताल-सूर जरी आज हरवले* *गीतं तरी ते मनीं ठसावे* *आळवून त्या रंम्य लकेरी* *कैक मैफीली सूर सजावे* ©Shankar kamble #आयुष्य #जगणे #जीवन #आयुष्य_जगताना #Thoughts