Nojoto: Largest Storytelling Platform
shankarkamble9141
  • 49Stories
  • 30Followers
  • 458Love
    76.9KViews

Shankar kamble

  • Popular
  • Latest
  • Video
ac9461c1dda07ce84f93f06664054ec9

Shankar kamble

*!!बुद्ध!!** 🌹
 *त्रिसरण अन पंचशीलेचा* 
 *मार्ग दावूनी भला* 
* *करुणा सत्य अहिंसेची* 
 *दीव्य दावली कला* 
 *साऱ्या विश्वात बुद्ध भला* 
 *आज नमितो बुद्धाला!धृ* !

 *शुद्धोधनाचा हा सूत* 
 *जन्माला तो राजकुळात* 
 *सारी सुखं जोडुनी हात* 
 *परी रमला ना तो त्यात* 
 *दुःखाचे हे मूळ शोधण्या* 
 *निघे तो अरण्याला* 
 *साऱ्या विश्वात ....!१!* 

 *पिंपळाच्या झाडाखाली* 
 *बुध्द शांत मुद्रा घाली* 
 *ज्ञानाची पसरली लाली* 
 *दिव्यत्वाची प्रचिती आली* 
 *सिद्धार्थाचा बुद्ध जाहला* 
 *प्रभा आली उदयाला* 
 *साऱ्या विश्वात...!२!* 

 *संसाराच्या भवसागरि* 
 *धम्म बुद्धाचा एकच तारी* 
 *गौतमाला स्मरल्यावरी* 
 *तुम्ही तराल हो नरनारी* 
 *जीवनातले दुःख हरण्या* 
 *जा शरण तथागताला* 
 *साऱ्या विश्वात...!३!*

©Shankar kamble #बुद्ध  #बुद्धपूर्णिमा #गौतम_बुद्ध #गौतम #शांती #बुद्ध_के_विचार 

#BuddhaPurnima
ac9461c1dda07ce84f93f06664054ec9

Shankar kamble

ओळखीच्या खुणां साऱ्या
आज परक्या वाटल्या
ओल सरतां मायेची
भेगां मनांत दाटल्या।१।

घालमेल उंबऱ्याची
जीव झाला कासावीस
सोसवेना होरपळ
डोळां चातकाची आस।२।

शीळ पाखरांची कानी
श्रावणातला हिंदोळा
घुटमळ पानोपानी
गंध दरवळ वेल्हाळा।३।

सये तुटलं माहेर
लेकपणाला पारखी
माझं फाटलं आभाळ
ऊन-सावली सारखी।४।

कसा आवरू हुंदका
किती निरपावं पाणी
कोंब खुडता उमाळा
भळभळ दाटे मनी।५।

नको कोरडा दिखावा
वरवरचं बोलणं
अंग पोळलं उन्हांत
आता कुठलं शिंपण?।६।

©Shankar kamble #माहेर #माहेर_सासर #लेक #मुलगी #सासरी #झोका #आठवण 

#Childhood
ac9461c1dda07ce84f93f06664054ec9

Shankar kamble

वणवण जरी नशीबी असली
का करावा उगाच त्रागा?
कास धरावी माणुसकीची
विणूनि प्रीत धागा धागा

©Shankar kamble #प्रीत #माणुसकी #माणूसकी #प्रेम #प्रीतिप्रभा 

#leaf
ac9461c1dda07ce84f93f06664054ec9

Shankar kamble

शोधतो मी वाट एक ती
माणसांना जोडणारी
वेगळा ना गली मोहल्ला
जात धर्मास खोडणारी

भेदभावना पुसुनी रेषा
नांदू सारे सौख्यभरे
मनीं जागवू माणुसकीला
राग, द्वेष ना कुठे उरे

नको हलाहल वैरत्वाचे
प्रेम, शांतीचा मार्ग खरा
देश भावना ठेवू जागृत
वीरांना त्या नित्य स्मरा

कोंदटलेले धुरकटलेले
मळभ पोसले सभोवरी
गुंतलेली गाठ उकलूनी
हृदये जोडू आता तरी

मातृवेल ती एक आपुली
सुंदर सुमने किती गोजिरी
रंग, गंध जरी असे वेगळा
एकची होती माळ सरी

हवी कशाला चौकट आता
बंधुत्वाला नको उंबरा
उघडून द्वारें बंद मनाची
उजळून जावो मनः गाभारा

©Shankar kamble #देश #देशप्रेमकीभावना #देशभक्ति #भाईचारा #एकात्मता 

#IndiaLoveNojoto
ac9461c1dda07ce84f93f06664054ec9

Shankar kamble

बिलगल्या उन्हाला आज
किती दिसांनी सावल्या
गुंतले क्षण ते हळवे
गोठल्या निमिष जागल्या

स्पंदनांच्या गोड लकेरी
भान देहाचे ना उरलें
दाटले मेघ वळीवाचे
विरहाचे उन्हाळे सरले

मोहरे लता लाजूनी
अंतरात ओढ तरुची
कोशात लपेटून घेता
तृप्त झाली तृषा युगाची

मधुगंध दरवळे ओला
साजरा प्रणय सोहळा
हळदीचा रंग नभाला
मेहंदीस नवा उजाळा

तारकांची शुभ्र लेणी
विलसती अजूनही नभा
साक्ष देती संगमाची
सागरी चांद तो उभा

एकरूप झाले दोन्ही
भेद सारे गळून गेले
हळुवार स्पर्शीता तारा
झंकारून गीत आले

©Shankar kamble #प्रेम #विरह #प्रणय #लव्ह #प्रेमकवि #प्रेम💕 

#together
ac9461c1dda07ce84f93f06664054ec9

Shankar kamble

#सांजवेळ #वळीवाचापाऊस #विरह #प्रेमकवि #प्रेम #जमीन #डोळे 

#WritersMotive
ac9461c1dda07ce84f93f06664054ec9

Shankar kamble

*भुई भेगाळली खोल* 
 *ओलं मातीची सरली* 
 *डोळं कोरडं आभाळ* 
 *एक उदासी भरली...* 

 *वेड्या-वाकड्या वळणी* 
 *उभी एकाकी बाभळ* 
 *सूर व्याकूळ आळवी* 
 *उन्हं कलता कोकीळ...* 

 *वावटळीचा भिंगोरा* 
 *जीव होई कासावीस* 
 *पानं देठाला पारखं* 
 *जीणं बेवारशी कूस...* 

 *निपचीत पहुडल्या* 
 *सांज धूळीत सावल्या* 
 *मागं सरता सरता* 
 *खुणां काहीशा उरल्या...* 

 *गर्द सोनेरी, पिवळा* 
 *पानगळतीचा सडा* 
 *पायाखाली तुडवीता* 
 *आठवणींचा गुताडा...* 

 *भूल कसली मनाला?* 
 *कल्प कुसुमी दाटला* 
 *आस वळीवाची आता* 
 *देही काहूर पेटला...*

©Shankar kamble #माती #जमीन #वळीवाचापाऊस #मातीचे #मातीत #उन्हाळ्यात 

#sand
ac9461c1dda07ce84f93f06664054ec9

Shankar kamble

सुगी सराईचं दिस नाही इसावा पायाला माय माळ तुडविते                   चार मोत्याच्या दाण्याला..   
भर उन्हाचा काहूर भिजं घामानं पदर
 आग पोटात पेटली  चिल्या-पिल्याचा इचार...
  धाटं-धाटं जमवूनी भारा जोंधळ्याचा डोई लयी तापली ढेकळं भार संसाराचा वाही...
  काट्या-कुट्यात चालता देह -मनाला जखमां* 
  *घाली फुंकर स्वतःच चिंधी बांधते त्या कर्मा* ...
    अंग मोडूनियां काम नाही घडीचा आराम* 
   वात तीळ तीळ जळे दिव्यासंग ज्योत ठाम...* 
 *घोट पिऊनिया पाणी दूर सारते भुकेला* 
  शिळ्या तुकड्या संगती पचविते नशिबाला...* 
 सांज ढळता-ढळता रास सरली-सरली* 
 ऊत आला तुझ्या दारी झोळी अर्धी भरली...* 
   मोती झोळीत की डोळा    दोन्ही नाहीत येगळा* 
 * घास भरविते माय सारा अमृत सोहळा...*

©Shankar kamble #सुगीचे #रास #शेतकरी #🎑शेती #शेती 

#SunSet
ac9461c1dda07ce84f93f06664054ec9

Shankar kamble

🌾 *सुगी...* 🌾
 *सुगी सराईचं दिस* 
 *नाही इसावा पायाला* 
 *माय माळ तुडविते* 
 *चार मोत्याच्या दाण्याला...* 

 *भर उन्हाचा काहूर* 
 *भिजं घामानं पदर* 
 *आग पोटात पेटली* 
 *चिल्या-पिल्याचा इचार...* 

 *धाटं-धाटं जमवूनी* 
 *भारा जोंधळ्याचा डोई* 
 *लयी तापली ढेकळं* 
 *भार संसाराचा वाही...* 

 *काट्या-कुट्यात चालता* 
 *देह -मनाला जखमां* 
 *घाली फुंकर स्वतःच* 
 *चिंधी बांधते त्या कर्मा* ...

 *अंग मोडूनियां काम* 
 *नाही घडीचा आराम* 
 *वात तीळ तीळ जळे* 
 *दिव्यासंग ज्योत ठाम...* 

 *घोट पिऊनिया पाणी* 
 *दूर सारते भुकेला* 
 *शिळ्या तुकड्या संगती* 
 *पचविते नशिबाला...* 

 *सांज ढळता-ढळता* 
 **रास सरली-सरली
 *ऊत आला तुझ्या दारी* 
 *झोळी अर्धी भरली...* 

 *मोती झोळीत की डोळा* 
 *दोन्ही नाहीत येगळा
घास भरविते माय
सारा अमृत सोहळा

©Shankar kamble #सुगीचे #रास #शेती #🎑शेती #शिवारात 

#Morning
ac9461c1dda07ce84f93f06664054ec9

Shankar kamble

*गर्द दाटला अंधार सभोवती* 
 *हरवून गेल्या वाटा* 
 *वादळात भरकटे किनारा* 
 *नेती दूर लाटा* 

 *हाती गवसले होते काही* 
 *क्षणांत निसटून गेले* 
 *प्रकाशातले जगणे सरले* 
 *घन अंधारून आले* 

 *क्षणिक सुखाचे रंग फसवे* 
 *मोहवी मन चार क्षणाला* 
 *बहर सरता येई पानगळ* 
 *एकाकी जग भास उद्याला* 

 *नभांगणी तळपती अविरत* 
 *अगणित तेजोराशी* 
 *काळोखाचा श्राप भोगतो* 
 *काजवा मी मंद प्रकाशी* 

 *माझ्याच कोशी गुरफटलो* 
 *विणले अभासी जाळे* 
 *उतरता भोग समाधी* 
 *निवळले गढूळ जळ निळे*

©Shankar kamble #अंधार #काळोख #वाट #वाटा #काळोख😢🖤Fearofdarkness😢काल 

#Moon
loader
Home
Explore
Events
Notification
Profile