White #फिरुनी नव्याने जन्मेन मी.... शब्दवेडा किशोर मनात माझ्या सवाल अनेक उत्तरे त्यांची मज काही केल्या सहजासहजी मिळेना कुठं हरवला तो माझ्या आयुष्याचा सुर सगळीकडे शोधूनही तो मज गवसेना नव्या दिशेच्या शोधात भटकतोय मी एक दिशा असुनही दिशाहीन बनलेला पक्षी अन् सध्या उगाच रंगहीन गोष्टींना संगतीस घेऊन रंगवत बसतो सहजच हातावर नियतीच्या खेळाची ती रंग असुनही रंगहीन मानली जाणारी नक्षी खुप काहीतरी गमवुन देखील नव्या जगण्याची अपेक्षा मात्र मी अजूनही गमवली नाही फिरनी नव्याने जन्मेन अन् नव्याने हा सारीपाट आयुष्याचा मांडूनी तो जिंकेनच मी हीच एक दृढ आशा मी अजूनही हरवून बसलो नाही ©शब्दवेडा किशोर #आयुष्याचीसंध्याकाळ