Nojoto: Largest Storytelling Platform
viratpatil7021
  • 151Stories
  • 26Followers
  • 2.2KLove
    0Views

शब्दवेडा किशोर

  • Popular
  • Latest
  • Video
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

Unsplash #कधी कधी....
शब्दवेडा किशोर
कधी कधी..
बेभान जगावं एकांतात 
मनमुराद हसावं एकांतात
मोकळेपणानं रडावं एकांतात
स्वतःला पूर्णपणे सावरावं एकांतात 
आसवांना आवरावं एकांतात
स्वतःला ओळखावं एकांतात
दुखावलेल्या जुन्या नव्या जखमांचा सारा
हिशोब सुद्धा मांडावा एकांतात
स्वतःच्या आयुष्याचं पुस्तक लिहावं एकांतात
स्वतःला जगवावं एकांतात
नवी स्वप्नं पाहून बघावी एकांतात
आयुष्याचा सारीपाट खेळून बघावा एकांतात..
एक एकट्याचा एकट्यासाठीचा एकटा एकांत
शिकवतो आपणास धडे आयुष्याचे....एकांतात.... 
कधी कधी....

©शब्दवेडा किशोर #कधीतरीवाटते
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White #मायबोली मराठी....
शब्दवेडा किशोर 
माझी मायबोली भाषा मराठी लाविते मनास अभिलाषा मराठी 
संवाद साधता होत नसे निराशा ती असे माझ्या महाराष्ट्राची शान मराठी 
असे आम्हांस सदैव अभिमान तिचा दुर सर्व देशी होई सन्मान
अशी ती महान माझी राजभाषा भाषा मराठी
मला असते तिची आस अन् आहे तिच माझी सुखाची रास व माझ्या जगण्याचा विश्वास माझी मायबोली मराठी 
काना मात्रा वेलांटी आकार ऊकार रस्व व दिर्घ विराम स्वल्पविराम
पुर्णविराम उदगारवाचक अशा अनेक चिंन्हानी बहरलेली खुललेली माझी मायबोली मराठी
खरंच..जरी मावशी म्हणून स्वतःस जगी मिरविते
इंग्रजी भाषा माझ्या मायबोलीची
तरी शपथ तुम्हाला आहे सात समुद्रापल्याडदेखील
सन्माननिय वंदनीय अशी माझी लाडकी मराठी भाषा आहे 
धन्य झाले प्राक्तन माझे झाली माझी मायमाऊली मराठी
गर्व वाटतो सदा मलाच माझा बोलतो मी माझी मायबोली मराठी
माझे बोल माझे शब्द माझे गीत माझे बालकडू मराठी
माझे शिक्षण माझे मनन माझे वतन माझे आत्मचिंतन माझे राष्ट्र मराठी
माझी शांतता माझा विद्रोह माझं व्यक्तपण माझं कर्तेपण मराठी
माझं तत्व माझं सत्व माझी मायबोली मराठी
अजि म्या धन्य जाहलो जन्माने घेतले मी स्वरूप मराठी
जाहला माझा देह पावन दास जिचा जाहलो जन्माने मी
अशी अगाध लीला जिची ती सर्वसुवर्णसंपन्न
भाषा माझी मायबोली मराठी

©शब्दवेडा किशोर #माझीलेखणी
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White #एक वादळाची वाट......
शब्दवेडा किशोर
      आयुष्यात अचानक उठणारी ही वादळं
फार भयंकर असतात.घोंगावत्या या वादळात
विचारांचा कचरा होतो अन् मनातला हा पालापाचोळा
आपल्या भोवती आपल्यालाच गरागरा फिरवतो.
        जेव्हा ही वादळं क्षमतात तेव्हा आपलं
सारं अस्तित्व तुटलेलं,भंगलेलं अन् पूर्णपणे विखूरलेलं असतं
अन् मग आपसूक मन पुन्हा नव्यानं तोच पालापाचोळा वेचायला लागतं..

        आयुष्यात नव्याने येणाऱ्या वादळांच्या तयारीसाठी....

©शब्दवेडा किशोर #वादळवाट
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White #रित्या मनाची ओंजळ....
शब्दवेडा किशोर
खुप सारं साठवून ठेऊन मात्र अखेर एकदा आभाळ बरसलं
भावनांनी मनाचा उंबरठा ओलांडावा असं म्हणलं
नभीच्या धारांना त्या धरेची अतृप्त ओढ होती
उंबऱ्यातल्या मनाच्या मोकळ्या आकाशाची जणू त्यांना आस होती
जव अतृप्त त्या ओढीनं आलेला एक गच्च मिठी मारून मनीचा तो ऊंबरठा ओलांडला तव अनाहूतपणे भावनांच्या सरी बेभान होऊन मुक्त झाल्या अन् दोघांचीही अशांत मनं पुरती क्षमली होती
आताच कुठंतरी दोघांचीही ती रित्या मनाची ओंजळ
छान सुखांच्या सरींनी पूर्ण भरली होती

©शब्दवेडा किशोर #रित्यामुठीतमाझ्या
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White माझ्या आयुष्यात मला सगळीच
चांगली माणसं भेटलीय..
मी सोडून 
कुणीच
इथं कधीच चुकत नाही....
शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White #नात्यांची जहरी नाळ....
शब्दवेडा किशोर 
रोज माझ्या उशाला शापित अन् विखारी
माझ्याच भूतकाळाच्या आठवांचा काळ
सावळीसम माझ्या संगतीस आहे
ओठावर नात्यांच्या ओळखीचे नाव अन्
डोळ्यात विरहजाळासोबत अजूनही
हा गर्दीमय एकटेपणाचा अवघड असा शाप आहे
जगण्यासोबतच आता झोपही माझी
विझूनी गेलीय तरीही हाती अजूनही
स्वप्नांचा तोच लाजिरवाणा सांभाळ आहे
हक्काची नाती आयुष्यातून झाली
काही काळाआधीच वजा
विरली ती त्याला चांदण्यात जरी
माझे अजूनही आतुरलेले फाटके
अन् रिते कोरडे ते आभाळ आहे
नाते सारे भावनांचे इतके सुलभ नसतात
हे शिकवणारं माझं दरिद्री भाळ आहे 
अन् अजूनही कुठंतरी एक अंधुकशी
शापित माझ्याशी जोडलेली या साऱ्याची
एक जहरी नाळ आहे

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White #जावे देवाच्या गावा....
शब्दवेडा किशोर 
जावे देवाच्या गावा मनी धरुनी सुखाचिया आस 
आर्त भावनेनं करावा तयाचा धावा
धरावी आयुष्य पंथाची चांगली कास 
अपुल्या सुखदुःखास तोच कारण असे
तयामुळे आयुष्यात चांगल्या भावना वसे
तोच घडवितो इथं सर्व काही कर्ता करविता तोच असे 
तयाच्या पायी आपण माथा ठेवावा
जव मनोभावे करता भक्ती तयाची
तव तोचि हरवितो सर्व चिंता कारणासी
तयामुळे जाती सर्व विघ्ने लयासी 
तोचि असे अपुला आदि अन् अंत
तयामुळे नसे अपुल्या जीवासी कुठली खंत
तोचि देतसे आपणास सर्वशक्तीरत्न
तयाच्या दर्शनमात्रे होई मन हे पावन
तयामुळेच लाभे आपणास खरे जीवनधन
तयामुळेच होई आपले आयुष्य चंदन

©शब्दवेडा किशोर #जावे_देवाच्या_गावा
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

Unsplash #जिंदगी क्या कहतीं हैं....
रुठती तो हमेशा खुशियाँ ही हैं
दुखों के कहाँ इतने नखरे होते हैं
जिंदगी में पराये लोग
काफ़ी अच्छे तरिके से रिश्तें निभातें हैं
दुखों की चुभन भी तो हमेशा
अपनों की कुछ कही अनकही
बातों से हीं होतीं हैं
शब्दभेदी किशोर

©शब्दवेडा किशोर #खुशी_और_गम
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White #हा खेळ नियतीचा....
रोज इथं चाले
मरणाचा खेळ
नाही कुणाचा कुणाला
कसलाच मेळ
खोटं वागणाऱ्याची इथं
भरली जातात पोती
खऱ्यांची मात्र ठरते
भ्रमिष्ठ अन् कमनशिबी मती

©शब्दवेडा किशोर #हा_खेळ_नियतीचा
6eba8317591585b173256f8b07ab169e

शब्दवेडा किशोर

White #हा खेळ आयुष्याचा....
प्रेम अन् मृत्यु हे आपल्या जिवनातील
अनाहूतपणे येणारे दोन पाहूणे..
ते कधी येतील सांगता येत नाही....
पण
काम मात्र दोघांचेही सारखेच..
एक हृदय चोरतो
तर
दुसरा त्या हृदयाचे ठोके....

©शब्दवेडा किशोर #प्रेमाची_जादू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile