Nojoto: Largest Storytelling Platform

माणसं.. आपल्या आयुष्यात येणारी माणसंसुद्धा घरटं सो

माणसं..
आपल्या आयुष्यात येणारी
माणसंसुद्धा घरटं सोडून गेलेल्या
पाखरासारखीच असतात.
एकदा का त्या पाखराने
आपलं घरटं सोडलं की
ते पाखरू त्या घरट्यात
कधी येत नाही..
कारण
त्या पाखराला
आभाळाची ओढ असते.
आपल्या आयुष्यात येणारी
चांगली माणसंसुद्धा या
घरटं सोडून गेलेल्या
पाखरागतंच असतात.
एकदा का ते माणसं आपल्या
आयुष्यातुन निघून गेले
पुन्हा परत आपल्या
सहवासात येत नाहीत
किंवा ते परतण्याच्या संधी
खूपच नगण्य असतात.

©शब्दवेडा किशोर
  #माणसं