Nojoto: Largest Storytelling Platform

White #ओल्या सांजवेळी.... शब्दवेडा किशोर असावी एक

White #ओल्या सांजवेळी....
शब्दवेडा किशोर
असावी एक भावूक ती सांजवेळ
अन् सोबतीस तुझी साथसंगत असावी
रम्य त्या अशा एका छान संध्याकाळी
माझ्या ओठी तुझे नाव अन् हाती माझी लेखणी असावी
जुन्या त्या मोहक अन् न विसरता येणाऱ्या
आठवणी नव्यानं ताज्या करत पुन्हा
तुला कागदावर उतरवावं मोहून टाकणारं रुप ते तुझं
आपसुकपणे मग मी शब्द शब्द गोळा करून कागदावर रेखाटावं
अबोल असावी त्याक्षणी नजर तुझी पण
कविता तुजवरची माझी बोलकी असावी
जितके निखळ कोमल ते हसु तुझे तितकीच अवखळ कवीता माझी व्हावी
अशा काही मनोरम आठवणींचा ठेवा सोबतीस घेऊन
अशीच एखादी छान कविता मज लिहीता यावी
असावीस सोबतीस तु अन् एक रम्य अशी मनोहर संध्याकाळ
पुन्हा एकदा माझ्या नशिबात यावी

©शब्दवेडा किशोर #सांजहीवेडलावी