Nojoto: Largest Storytelling Platform

गुढीपाडवा गुढीपाडवा सण मराठी लोकांचा मंगलमय सुर

गुढीपाडवा 

गुढीपाडवा सण 
मराठी लोकांचा
मंगलमय सुरुवात 
सोहळा पवित्रेचा!

चैत्र शुक्ल प्रतिपदेचा 
दिवस तो सोनियाचा !
होते मराठी नववर्षाची 
ती सुरुवात आरंभ सणाचा!

या वर्षी तिथीनुसार 
२२ मार्चला आला गुढीपाडवा! 
सण साजरा करु या सारे
लेखणीतुन वाटू गोडवा.!

मराठी आपण सारे
मराठीची पताका ऊंचवू गगनी
मांगल्याची गुढी उभारू दारी
जिव्हाळा- आपुलकी जपु मनी!

आंब्याच्या पानाचे तोरण दारी
 गुढीला गोड गाठी करु अर्पण !
नवे खण,हार,बेल,फुल चढवू 
तांब्या गुढीवर ठेवून करु पुजन! 

गुढीपाडव्यापासून होई
मराठी नववर्षाची सुरुवात !
मांगल्याचा हा सण आला
लावू तेजाची देवालयात वात!


मनामनात नवा संकल्प करु
गोड बोल जिभेवर ठेवून 
सुजलाम सुफलाम ही धरणी ठेवू
स्नेहभावाचे नवे गीत गाऊन! 


मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar
  #नवरात्री