Nojoto: Largest Storytelling Platform

मी कवी तू कविता त्या कवितेतला शब्द मी अर्थ तू !!

मी कवी तू कविता
त्या कवितेतला 
शब्द मी अर्थ तू !!

मी गीत तू संगीत
त्या गाण्यातील
भाव मी भावार्थ तू !!

मी आरसा तू प्रतिबिंब
त्या प्रतिबिंबाचा
भास मी आभास तू !!

मी पाकळी तू फुल
त्या फुलातला
गंध मी सुगंध तू !!

मी जीव तू श्वास
त्या श्वासातला
आस मी ध्यास तू!!

मी..मी न रहावे तू..तू न रहावे
तू अन मी मधला
तू व्हावे मी अन मी व्हावे तू !! तू अन मी
मी कवी तू कविता
त्या कवितेतला 
शब्द मी अर्थ तू !!

मी गीत तू संगीत
त्या गाण्यातील
भाव मी भावार्थ तू !!

मी आरसा तू प्रतिबिंब
त्या प्रतिबिंबाचा
भास मी आभास तू !!

मी पाकळी तू फुल
त्या फुलातला
गंध मी सुगंध तू !!

मी जीव तू श्वास
त्या श्वासातला
आस मी ध्यास तू!!

मी..मी न रहावे तू..तू न रहावे
तू अन मी मधला
तू व्हावे मी अन मी व्हावे तू !! तू अन मी

तू अन मी #poem